मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

कारगिल येथे एका आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसांच्या तापमानांची नोंद केली. त्या नोंदी अंकगणिती श्रेढीत आहेत असे आढळले.

Advertisements
Advertisements

प्रश्न

कारगिल येथे एका आठवड्यातील सोमवार ते शनिवार या दिवसांच्या तापमानांची नोंद केली. त्या नोंदी अंकगणिती श्रेढीत आहेत असे आढळले. सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज मंगळवार व शनिवारच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा 5° सेल्सिअसने जास्त आहे. जर बुधवारचे तापमान - 30° सेल्सिअस असेल, तर प्रत्येक दिवसाचे तापमान काढा.

बेरीज
Advertisements

उत्तर

समजा, सोमवार ते शनिवार या दिवसांची अंकगणिती श्रेढीतील तापमाने अनुक्रमे

a, a + d, a + 2d, a + 3d, a + 4d, a + 5d ही आहेत.

दिलेल्या पहिल्या अटीनुसार, सोमवार व शनिवारच्या तापमानांची बेरीज मंगळवार व शनिवारच्या तापमानांच्या बेरजेपेक्षा 5° सेल्सिअसने जास्त आहे.

(a) + (a + 5d) = (a + d) + (a + 5d) + 5°

∴ d = - 5°

दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार, बुधवारचे तापमान - 30° सेल्सिअस आहे.

a + 2d = - 30°

∴ a + 2(- 5°) = - 30°

∴ a – 10° = - 30°

∴ a = - 30° + 10° = - 20°

∴ a + d = - 20° - 5° = - 25°

a + 3d = - 20° + 3(- 5°) = - 20° - 15° = - 35°

a + 4d = - 20° + 4(- 5°) = - 20° - 20° = - 40°

a + 5d = - 20° + 5(- 5°) = - 20° -  25° = - 45°

∴ बुधवार सोडून इतर दिवसांची तापमाने अनुक्रमे - 20°C, - 25°C, - 35°C, - 40°C व -45°C ही आहेत.

shaalaa.com
अंकगणिती श्रेढीचे उपयोजन (Applications of A. P.)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: अंकगणित श्रेढी - सरावसंच 3.4 [पृष्ठ ७८]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 3 अंकगणित श्रेढी
सरावसंच 3.4 | Q 5 | पृष्ठ ७८

संबंधित प्रश्‍न

सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमध्ये पहिल्या वर्षी ₹ 5000, दुसऱ्या वर्षी ₹ 7000, तिसऱ्या वर्षी ₹ 9000 याप्रमाणे रक्कम गुंतवली, तर त्याची 12 वर्षांतील एकूण गुंतवणूक किती?


एका गृहस्थाने ₹ 8000 कर्जाऊ घेतले आणि त्यावर ₹ 1360 व्याज देण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा ₹ 40 कमी देऊन सर्व रक्कम 12 मासिक हप्त्यांत भरली, तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती होता?


अंकगणिती श्रेढीच्या m व्या पदाची m पट ही n व्या पदाच्या n पटीबरोबर असेल, तर त्याचे (m + n) वे पद शून्य असते हे दाखवा. (m ≠ n)


207 या संख्येचे तीन भाग असे करा, की त्या संख्या अंकगणिती श्रेढीत असतील व लहान दोन भागांचा गुणाकार 4623 असेल.


5 ने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या किती आहेत?

कृती: –5 ने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या 10, 15, 20 ......... 95., ह्या आहेत.

d = 5 असल्याने दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे.

येथे, , a = 10, d = 5, tn = 95, n = ?

tn = a + (n - 1) `square`

`square` = 10 + (n – 1) × 5

`square` = (n –1) × 5

`square` = (n –1)

म्हणून, n = `square`

5 ने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्या `square` आहेत.


कल्पना दर महिन्याला ठरावीक रक्कम बचत करते. तिने पहिल्या महिन्यात 100रु., दुसऱ्या महिन्यात 150रु., तिसऱ्या महिन्यात 200रु. याप्रमाणे बचत केली, तर किती महिन्यात 1200रु. बचत होईल?

कृती: कल्पनाची मासिक बचत 100 रु., 150 रु., 200 रु. ......... 1200 रु. अशी आहे.

येथे d = 50 रु. आहे. म्हणून, दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेढी आहे.

a = 100, d = 50, tn = `square`, n = ?

tn = a + (n – 1) `square`

`square` =100 + (n – 1) × 50

`square/50` = n - 1

n = `square`

म्हणून, 1200 रु. बचत `square` महिन्यात होईल.


मेरीला दरमहा 15000 रु. पगाराची नोकरी मिळाली, जर तिला दरमहा 100 रु. पगारवाढ मिळत असेल, तर 20 महिन्यांनंतर मेरीचा पगार किती होईल?


शर्वरीने एका महिला बचत गटात महिन्याच्या पहिल्या दिवशी 2 रु., दुसऱ्या दिवशी ४ रु., व तिसऱ्या दिवशी ६ रु. अशा तर्हेने पैसे गुंतवल्यास तिची फेब्रुवारी २०१० या महिन्याची एकूण बचत किती?


एका व्यापाराने 1000 रु. कर्जाऊ घेतले व त्यावरील 140 रु. व्याज व मुद्दल 12 हप्त्यात परत करण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्त्याची रक्कम अगोदरच्या हप्त्यापेक्षा 10 रु. कमी आहे, तर त्याने पहिल्या हप्त्यात किती रक्कम परतफेड केली?


कविताने एका महिला बचत गटात महिन्याच्या पहिल्या दिवशी 20 रुपये, दुसऱ्या दिवशी 40 रुपये व तिसऱ्या दिवशी 60 रुपये अशा प्रकारे पैसे गुंतविल्यास तिची फेब्रुवारी 2020 या महिन्याची एकूण बचत किती?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×