मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

गोलीय आरशामुळे होणाऱ्या परावर्तनासाठी कोणकोणते चिन्ह संकेत वापरतात?

Advertisements
Advertisements

प्रश्न

गोलीय आरशामुळे होणाऱ्या परावर्तनासाठी कोणकोणते चिन्ह संकेत वापरतात?

थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

गोलाकार आरशामुळे होणाऱ्या परावर्तनासाठी चिन्ह संकेत:

कार्टेशिअन चिन्ह संकेतांनुसार, आरशाचा ध्रुव (P) आरंभ बिंदू मानतात आणि मुख्य अक्ष हा संदर्भ चौकटीचा X-अक्ष घेतात.

  1. वस्तू नेहमी आरशाच्या डावीकडे ठेवतात.
  2. मुख्य अक्षाला समांतर असणारी सर्व अंतरे आरशाच्या ध्रुवापासून मोजतात.
  3. आरंभबिंदूच्या उजवीकडे मोजलेली सर्व अंतरे धन मानतात तर डावीकडे मोजलेली अंतरे ऋण मानतात.
  4. मुख्य अक्षाला लंब आणि वरच्या दिशेने मोजलेली अंतरे (ऊर्ध्व अंतरे) धन असतात.
  5. मुख्य अक्षाला लंब आणि खालच्या दिशेने मोजलेली अंतरे (अधो अंतरे) ऋण असतात.
  6. अंतर्वक्र आरशाचे नाभीय अंतर ऋण असते तर बहिर्वक्र आरशाचे नाभीय अंतर धन असते.

shaalaa.com
गोलीय आरशाद्वारे परावर्तनासाठी कार्टेशिअन चिन्ह संकेत
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11: प्रकाशाचे परावर्तन - स्वाध्याय [पृष्ठ १२७]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 11 प्रकाशाचे परावर्तन
स्वाध्याय | Q 2. | पृष्ठ १२७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×