मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

अंतर्गोल आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमांच्या सारांशावरून (सारणी) त्यांच्या किरणाकृती तयार करा. अंतर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या विविध प्रतिमा अ.क्र. वस्तूचे स्थान प्रतिमेचे स्थान प्रतिमेचे स्वरूप

Advertisements
Advertisements

प्रश्न

अंतर्गोल आरशामुळे मिळणाऱ्या प्रतिमांच्या सारांशावरून (सारणी) त्यांच्या किरणाकृती तयार करा.

अंतर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या विविध प्रतिमा
अ.क्र. वस्तूचे स्थान प्रतिमेचे स्थान प्रतिमेचे स्वरूप प्रतिमेचा आकार
1. वस्तू ध्रुव आणि नाभी यांमध्ये आरशाच्या मागे आभासी, सुलटी वस्तूपेक्षा मोठा
2. वस्तू नाभीवर अनंत अंतरावर वास्तव, उलट खूपच मोठा
3. वस्तू वक्रता केंद्र आणि नाभी यांच्यामध्ये वक्रता केंद्राच्या पलीकडे वास्तव, उलट वस्तूपेक्षा मोठा
4. वस्तू वक्रता केंद्रावर वक्रता केंद्रावर वास्तव, उलट मूळ वस्तूएवढा
5. वस्तू अनंत अंतर व वक्रता केंद्र यांदरम्यान वक्रता केंद्र आणि नाभी यांच्यामध्ये वास्तव, उलट वस्तूपेक्षा लहान
6. वस्तू अनंत अंतरावर नाभीवर वास्तव, उलट वस्तूपेक्षा लहान
थोडक्यात उत्तर
Advertisements

उत्तर

  1. वस्तू ध्रुव आणि नाभी यांमध्ये:

    P: ध्रुव, C: वक्रता केंद्र, F: मुख्य नाभी, PF: नाभीय अंतर (f), PC: वक्रता त्रिज्या (R), AB: वस्तू, A'B': प्रतिमा, PB: वस्तूचे अंतर (u), PB': प्रतिमेचे अंतर 
    येथे प्रतिमा आरशाच्या मागे तयार होते. ती आभासी, सुलट व वस्तूपेक्षा मोठी असते. (येथे विशालन धन असते.)
  2. वस्तू नाभीवर:

    C: वक्रता केंद्र, F: मुख्य नाभी, PF: नाभीय अंतर (f), PC: वक्रता त्रिज्या (R), AB: वस्तू, PB: वस्तूचे अंतर (u) येथे प्रतिमा अनंत अंतरावर तयार होते. ती वास्तव, उलट व वस्तूपेक्षा खूपच मोठी असते.
  3. वस्तू वक्रता केंद्र आणि नाभी यांच्यामध्ये:

    C: वक्रता केंद्र, F: मुख्य नाभी, PF: नाभीय अंतर (f), PC: वक्रता त्रिज्या (R), AB: वस्तू, A'B': प्रतिमा, PB: वस्तूचे अंतर (u), PB': प्रतिमेचे अंतर (v) येथे प्रतिमा वक्रता केंद्रापलीकडे तयार होते. ती वास्तव, उलट व वस्तूपेक्षा मोठी असते. (येथे विशालन ऋण असते.)
  4. वस्तू  वक्रता केंद्रावर:

    C: वक्रता केंद्र, F: मुख्य नाभी, PF: नाभीय अंतर (f), PC: वक्रता त्रिज्या (R), AB: वस्तू, A'B': प्रतिमा, PB: वस्तूचे अंतर (u), PB': प्रतिमेचे अंतर (v)
    येथे प्रतिमा वक्रता केंद्रावर तयार होते. ती वास्तव, उलट व वस्तूएवढी असते. (येथे विशालन ऋण असते.)
  5. वस्तू अनंत अंतर व वक्रता केंद्र यांदरम्यान:

    C: वक्रता केंद्र, F: मुख्य नाभी, PF: नाभीय अंतर (f), PC: वक्रता त्रिज्या (R), AB: वस्तू, A'B': प्रतिमा, PB: वस्तूचे अंतर (u), PB': प्रतिमेचे अंतर (v)
    येथे प्रतिमा मुख्य नाभी आणि वक्रता मध्य यांदरम्यान तयार होते. ती वास्तव, उलट व वस्तूपेक्षा लहान असते. (येथे विशालन ऋण असते.)
  6. वस्तू अनंत अंतरावर:

    C: वक्रता केंद्र, F: मुख्य नाभी, PF: नाभीय अंतर (f), PC: वक्रता त्रिज्या (R), AB: वस्तू
    येथे प्रतिमा अंतर्गोल आरशाच्या मुख्य नाभीवर तयार होते. ती वास्तव, उलट व वस्तूपेक्षा खूपच लहान असते.
shaalaa.com
अंतर्गोल आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 11: प्रकाशाचे परावर्तन - स्वाध्याय [पृष्ठ १२७]

APPEARS IN

बालभारती Vigyan and Tantragyan [Marathi] Standard 9 Maharashtra State Board
पाठ 11 प्रकाशाचे परावर्तन
स्वाध्याय | Q 3. | पृष्ठ १२७
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×