मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

फरक स्पष्ट करा. जलवाहतूक व हवाई वाहतूक

Advertisements
Advertisements

प्रश्न

फरक स्पष्ट करा.

जलवाहतूक व हवाई वाहतूक

फरक स्पष्ट करा
Advertisements

उत्तर १

अ. क्र. जलवाहतूक हवाई वाहतूक
(१)  जलवाहतूक हा एक सर्वाधिक महत्त्वाचा तृतीयक व्यवसाय आहे. वाहतुकीचा सर्वाधिक वेग हा हवाई वाहतुकीचा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे.
(२)  जलवाहतुकीची वहनक्षमता खूप जास्त असते. मूल्यवान तसेच नाशिवंत मालाच्या वाहतुकीसाठी हवाई वाहतुकीचा पर्याय वापरला जातो.
(३) जलवाहतूक ही एकमेव वाहतूक अशी आहे, जी स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत कार्यरत होऊ शकते. फळे, फुले, दागदागिने, हिरे, जीवनावश्यक औषधे आणि उच्च दर्जाचे स्पेअरपार्ट यांची वाहतूक हवाई माध्यमातून केली जाते.
(४) नदीत, तलावात होणारी अंतर्गत जलवाहतूक, सागर किनारी होणारी वाहतूक आणि विशाल महासागराद्वारे होणारी आंतरराष्ट्रीय जलवाहतूक हे जलवाहतुकीचे तीन मार्ग आहेत. खूप उंच पर्वतीय प्रदेश, वेगवान वाऱ्यांचे प्रदेश किंवा ढगाळ वातावरण हवाई वाहतुकीवर मर्यादा आणतात.
(५)  आजच्या घडीला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय व्यापार हा पूर्णपणे जलवाहतुकीवरच अवलंबून आहे. हवाई वाहतुकीचे प्रमाण आता वाढत आहे.
(६)  जलवाहतुकीचा खर्च खूप कमी आहे. म्हणजेच ही वाहतूक खूप स्वस्त आहे. हवाई वाहतूक इतर वाहतूक मार्गापेक्षा खर्चीक असते.
(७) अवजड परंतु टिकाऊ वस्तूंच्या वाहतुकीसाठी जलवाहतुकीला पर्याय नाही. हवाई वाहतुकीचा विकास अनेक भौगोलिक घटकांवर अवलंबून असतो.
(८)  विविध खनिजे, अवजड यंत्रसामग्री, खनिजतेल, कोळसा, धान्य, लाकूड यांच्या वाहतुकीसाठी जलवाहतुकीचा पर्याय वापरला जातो. आर्थिक विकास व हवाई वाहतुकीचा विकास यांचा थेट सहसंबंध आहे.
shaalaa.com

उत्तर २

अ. क्र. जलवाहतूक हवाई वाहतूक
१. जलमार्गांच्या विकासासाठी नैसर्गिक बंदरे, दंतूर किनारे आणि पोषक किनारपट्टीची आवश्यकता असते. हवाई मार्गांच्या विकासासाठी अनुकूल हवामान, प्रगत तंत्रज्ञान आणि विमानतळांसाठी सपाट जमिनीची गरज असते.
२. हा वाहतुकीचा सर्वात स्वस्त पर्याय आहे. हा वाहतुकीचा सर्वात महागडा पर्याय आहे.
३. याद्वारे जड आणि अवजड मालाची वाहतूक केली जाते. उदा. खनिजे, तेल, कोळसा, यंत्रसामग्री इ. याद्वारे हलक्या, नाशवंत आणि मौल्यवान वस्तूंची वाहतूक केली जाते. उदा. इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने, चांदी, मासे, दुग्धजन्य पदार्थ इ.
४. हा वाहतुकीचा मंदावणारा किंवा संत गतीचा मार्ग आहे. हा वाहतुकीचा अतिशय वेगवान मार्ग आहे.
५. याचा वापर प्रवाशांपेक्षा मुख्यत्वे माल वाहतुकीसाठी अधिक केला जातो. याचा वापर माल वाहतुकीपेक्षा प्रामुख्याने प्रवासी वाहतुकीसाठी केला जातो.
shaalaa.com
वाहतूक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: तृतीयक आर्थिक क्रिया - स्वाध्याय [पृष्ठ ६५]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
पाठ 6 तृतीयक आर्थिक क्रिया
स्वाध्याय | Q ५. ३) | पृष्ठ ६५

संबंधित प्रश्‍न

तृतीयक व्यवसाय


ट्रान्स ऑस्ट्रेलिया लोहमार्ग स्थानक


भौगोलिक कारणे लिहा.

हवाई वाहतुकीचे प्रमाण वाढत आहे.


वाहतुकीचा विकास भौगोलिक घटकांवर अवलंबून असतो स्पष्ट करा.


खालील माहिती नकाशात भरा व सूची दया.
१) सागरी वाहतुकीत क्रांतिकारक बदल करणारा एक कालवा
२) दोन खंडांदरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग 
३) भारतातील एक आंतरराष्ट्रीय विमानतळ
४) भारतातील एक महत्त्वाचे बंदर  


साखळी पूर्ण करून उत्तर पुन्हा लिहा.

अ.नं ‘अ’ ‘ब’ ‘क’
1. ग्राहकोपयोगी वस्तू  (i) अटलांटिक महासागर (अ) औषधी उत्पादन
2. पनामा कालवा (ii) सुपीक प्रदेश (ब) परिस्थितीकीय संतुलन 
3. मैदाने (iii) थेट वापरासाठी तयार (क) शेती व्यवसाय विकास
4. अन्नसाखळी (iv) अल्पकालीन (ड) पॅसिफिक महासागर
5. स्थलांतर (v) परिसंस्था (इ) अरबी समुद्र
    (vi) हिंदी महासागर (फ) दीर्घकालीन

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×