Advertisements
Advertisements
प्रश्न
‘डोळ्यांत झऱ्याचे पाणी’ या शब्दसमूहातील भावसौंदर्य उलगडून लिहा.
Advertisements
उत्तर
'झाडाच्या मनात जाऊ' या कवितेमध्ये कवी नलेश पाटील यांनी वसंत ऋतूत फुललेल्या निसर्ग घटकाचे लोभसवाणे दर्शन नितांत सुंदर प्रतिमांमध्ये उलगडून दाखवला आहे. रंग व गंधाच्या या उत्सवात आपणही निसर्गाचा घटक होऊन निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेऊया असे ते सांगतात. वसंत ऋतूमध्ये चराचराला लाभलेले हे सौंदर्याची वैभव अनुभवताना कवींना या सौंदर्याची निर्मिती अनोखी व अपूर्व वाटते. या रंगपंचमीमध्ये सारी सृष्टि न्हाऊन निघालेले आहे. हे सृष्टीचे अम्लान सौंदर्य मानवनिर्मित नसून ती ईश्वराची किमया असावी, असे कवी आत्मीयतेने सांगतात. अवतीभवती आलेले हे आनंदाचे उधाण म्हणजे विधात्याची स्वत:ची गाणी आहेत. ही सर्व देवाजीची करणी आहे. हे अनोखे सौंदर्य पाहून कवींच्या डोळ्यांत आनंदाश्रू येतात. ते म्हणतात की, या झऱ्यात वाहणारे पाणी आणि डोळ्यांत तरळलेले पाणी वेगळे नाही. ते एकच आहे. या झर्यातलेच पाणी माझ्या डोळ्यांत तरळले आहे, अशी एकतानता नि अद्वैत घडले आहे. 'डोळ्यांत झऱ्याचे पाणी' या भावपूर्ण प्रतिमेतून कवींनी निसर्गाशी घडलेली एकरूपता सजीव साकार केली आहे. मानव हा निसर्गाचाच अपत्य आहे, याचे प्रत्यंतर या प्रतिमेतून दिसून येते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
पोपटी स्पंदनासाठी म्हणजे -
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
जन्माला अत्तर घालत म्हणजे-
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
भिरभिरणारे तोरण दाराला आणून लावू म्हणजे-
योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा.
मी झाड होऊन तेथे, पसरीन आपुले बाहू म्हणजे -
खालील कृतींतून सूचित होणारा अर्थ कवितेच्या आधारे लिहा.
| निसर्गातील घटकांच्या सोबतीने केलेली कृती |
सूचित होणारा अर्थ |
|
(१) कोकीळ होऊनी गाऊ... |
____________ |
|
(२) गाण्यात ऋतूच्या आपण चल खळाळून रे वाहू... |
____________ |
पुढील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
झाडांच्या मनात जाऊ, पानांचे विचार होऊ.
पुढील काव्यपंक्तींचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
हातात ऊन डुचमळते नि सूर्य लागतो पोहू.
खालील तक्ता पूर्ण करा.
| कवितेचा विषय | कवितेतून मिळणारा एकत्रित अनुभव | कवीने वापरलेली आनंदाची दोन प्रतीके | भाषिक सौंदर्यस्थळे | कवितेतून मिळणारा संदेश |
'पोपटी स्पंदनासाठी, कोकीळ होऊनी गाऊ...' या काव्यपंक्तीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
ऊन आणि सावली यांच्या प्रतीकांतून सूचित होणारे आशयसौंदर्य कवितेच्या आधारे लिहा.
'तुम्ही झाडाच्या मनात शिरला आहात', अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा.
निसर्गातील घटक व मानवी जीवन यांचा परस्परसंबंध स्पष्ट करा.
‘झाडांच्या मनात जाऊ’ या कवितेचे रसग्रहण करा.
