Advertisements
Advertisements
प्रश्न
डॉक्टर होमी भाभा यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
Advertisements
उत्तर
डॉ. होमी भाभा हे प्रख्यात अणुशास्त्रज्ञ होते. त्यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. त्यांच्या या कार्याचा गौरव व्हावा यासाठी 'भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर' या संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. लेखक डॉ. अनिल काकोडकर यांना भाभा अणुसंशोधन केंद्रात काम करत असताना डॉ. होमी भाभा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रचंड स्फूर्ती देणारे होते. 'आपण काय काम करायचं ते आपणच ठरवलं पाहिजे आणि आपलं काम आपणच निर्माण केलं पाहिजे' हा अतिशय महत्त्वाचा व प्रेरणादायी विचार डॉ. भाभांनी डॉ. काकोडकरांच्या मनात रुजवला.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
टिपा लिहा.
बार्क
टिपा लिहा.
डॉ. होमी भाभा
‘स्काय इस द लिमिट’ ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते पाठाच्या आधारे लिहा.
मेटलायझिंग प्रक्रियेवर काम न होण्यामागची कारणे कोणती असावीत असे तुम्हांस वाटते?
‘आधी केले मग सांगितले’, या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा.
‘प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिमाणकारक असते,' हे विधान ‘मोठे होत असलेल्या मुलांनो...’ या पाठाधारे स्पष्ट करा.
डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन मोठे होत असलेल्या मुलांनो या पाठाच्या आधारे करा.
लेखकाचा बार्कमधील अनुभव तुमच्या शब्दांत लिहा.
वैज्ञानिक व विद्यार्थी यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.
'स्काय इज द लिमिट' ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते हे 'मोठे होत असलेल्या मुलांनो' या पाठाच्या आधारे लिहा.
