Advertisements
Advertisements
प्रश्न
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नाचे सविस्तर उत्तर लिहा.
शीतयुद्धाविषयी सविस्तर माहिती लिहा:
मुद्दे:
(अ) शीतयुद्धाची व्याख्या
(ब) शीतयुद्धाची पार्श्वभूमी
(क) शीतयुद्धाची वाटचाल
सविस्तर उत्तर
Advertisements
उत्तर
(अ) शीतयुद्धाची व्याख्या:
- दुसऱ्या महायुद्धानंतर एका बाजूला भांडवलशाही राष्ट्रे व दुसऱ्या बाजूला कम्युनिस्ट राष्ट्रे यांच्यात सत्ता व प्रभाव यासाठी जो संघर्ष सुरू झाला त्याला ‘शीतयुद्ध’ म्हणतात.
- दुसऱ्या महायुद्धाच्या काळात वॉल्टर लिपमन या वृत्तपत्रात लेखन करणाऱ्या स्तंभलेखकाने सर्वप्रथम ‘कोल्डवॉर’ (शीतयुद्ध) हा शब्दप्रयोग वापरला.
(ब) शीतयुद्धाची पार्श्वभूमी:
- शीतयुद्ध घडून येण्यास दुसरे महायुद्ध कारणीभूत ठरले.
- इंग्लंड व फ्रान्स यांचे महत्त्व कमी झाले.
- या महायुद्धादरम्यान सोव्हिएट रशियाच्या सैन्याने पूर्व युरोप तर अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंड यांनी पश्चिम युरोपवर प्रभुत्व मिळवले.
- यामुळे युद्ध संपल्यावर युरोपचे पूर्व आणि पश्चिम असे विभाजन घडून आले. सोव्हिएट रशियाच्या प्रभावाखाली असलेल्या पूर्व युरोपीय राष्ट्रांनी साम्यवादी विचारप्रणालीचा स्वीकार केला. अमेरिकेच्या प्रभावाखाली असणाऱ्या पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी भांडवलशाही व्यवस्था मान्य केली. यातून शीतयुद्ध आकाराला आले.
(क) शीतयुद्धाची वाटचाल:
- दुसरे महायुद्ध संपल्यावर अमेरिकेने ‘मार्शल प्लॅन’ ची योजना आखून युरोपीय राष्ट्रांना साम्यवादापासून रोखण्यासाठी आर्थिक मदत सुरू केली.
- या योजनेअंतर्गत अमेरिकेने या राष्ट्रांना आर्थिक मदत पुरवण्यास सुरुवात केली.
- सोव्हिएट रशियाने आशिया आणि आफ्रिकेतील स्वातंत्र्य चळवळींना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली.
- युरोपची पूर्व युरोप आणि पश्चिम युरोप अशा दोन भागांत विभागणी झाल्यामुळे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यात राजकीय तणाव निर्माण झाला. जरी त्यांच्यात प्रत्यक्ष युद्ध कधीच झाले नाही, तरीही तिसरे महायुद्ध ओढवण्याची भीती जागतिक पातळीवर सर्वत्र जाणवत होती. तथापि, दोन्ही पक्षांनी अशा प्रकारच्या महायुद्धाची कोणतीही शक्यता परस्पर टाळली आहे.
- साम्यवादी सोव्हिएट रशियाच्या विचारसरणीत उत्पन्नाच्या स्रोतांची सरकारी मालकी हा मध्यवर्ती विचार आहे तर अमेरिकेच्या भांडवलशाही विचारसरणीत उत्पन्नाच्या स्रोतांच्या खासगी मालकीचा विचार मध्यवर्ती आहे.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
