मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएचएससी कला (मराठी माध्यम) इयत्ता १२ वी

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्‍नाचे सविस्तर उत्तर लिहा. पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील प्रयोगांची सविस्तर माहिती लिहा: मुद्दे: (अ) भ्राऊ काटदरे

Advertisements
Advertisements

प्रश्न

दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्‍नाचे सविस्तर उत्तर लिहा.

पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील प्रयोगांची सविस्तर माहिती लिहा: 

मुद्दे:

(अ) भ्राऊ काटदरे आणि सह्याद्री निसर्गमित्र संस्था

(ब) प्रेमसागर मेस्त्री आणि सी-स्कॅप संस्था

सविस्तर उत्तर
Advertisements

उत्तर

(अ) भ्राऊ काटदरे आणि सह्याद्री निसर्गमित्र संस्था:

  1. सह्याद्री निसर्ग मित्र या संस्थेच्या माध्यमातून भाऊ काटदरे व त्यांचे सहकारी निसर्ग संवर्धनाचे कार्य करतात. इ.स.१९९९ मध्ये पांढऱ्या पोटाचा समुद्री गरूड या पक्ष्याचे अस्तित्व धोक्यात आल्याचे भाऊंनी वाचले. या पक्ष्याचा बचाव आणि संवर्धन करण्यासाठी भाऊंनी रत्नागिरी जिल्ह्यात काम सुरू केले.
  2. रत्नागिरी जिल्ह्याला असणारा समुद्रकिनारा पायी हिंडून लोकांमध्ये या पक्ष्यांसंदर्भात जागृती केली. या प्रवासात त्यांनी ६२ घरट्यांची स्थाने शोधून काढली.
  3. हे करत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती बंदराच्या आसपास वेंगुर्ला रॉक्सजवळ बंद्रा बेटावर भाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तस्करीच्या घटना दिसल्या. तस्कर लोक पाकोळ्यांची घरटी विकून विदेशातून पैसे मिळवत होते. 
  4. पाकोळ्यांना संरक्षण देणे गरजेचे होते. या घटनेमुळे आणि संस्थेच्या प्रयत्नातून पाकोळ्यांचा समावेश भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या शेड्यूल ‘I’ मध्ये झाला. सह्याद्री निसर्गमित्र संस्थेचे हे मोठे काम होय.
  5. याच संस्थेने आणखी एक महत्त्वाचे काम कासवांच्या संदर्भात केले. ‘वेळास’ च्या समुद्रकिनाऱ्यावर ‘ऑलिव्ह रिडले’ जातीची कासवे अंडी घालण्यासाठी येतात, त्यांच्या संरक्षणाची मोहीम उभारली.
  6. भाऊ कातदरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या घरट्यांच्या संरक्षणासाठी एका मोहिमेचे नियोजन केले. पहिल्याच वर्षी कासवांची ५० घरटी संरक्षित करण्यात आली.
  7. त्यातून २७३४ कासवे समुद्रात गेली. या घटनेच्या निमित्ताने ‘कासव महोत्सव’ आयोजित करण्यात आला.

(ब) प्रेमसागर मेस्त्री आणि सी-स्कॅप संस्था:

  1. भारतात गिधाडांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होत आहे. गिधाडे म्हणजेनिसर्गातील सफाई करणारे स्वच्छतादूत. रायगड परिसरात ‘लाँगबील व्हल्चर’ आणि ‘व्हाईटबॅक व्हल्चर’ अशा गिधाडांच्या दोन जाती आढळतात.
  2. त्यांची संख्या वाढवणे, त्यांच्या खाण्यासाठी अन्न उपलब्ध करून देणे यासाठी प्रेमसागर मेस्त्री आणि त्यांचे सहकारी Society for Eco Endangered Species Conservation and Protection (SEESCAP) संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत.
  3. प्राण्यांना दिलेजाणारे औषध गिधाडांसाठी काहीवेळा विष ठरते.
  4. उंच झाडांची कमी झालेली संख्या, अन्नाची कमतरता यांमुळे गिधाडांचे अस्तित्व धोक्यात आले होते.
  5. ही परिस्थिती बदलण्यात सी-स्कॅप संस्थेला यश मिळत आहे.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2023-2024 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×