मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गाच्या विकासात कोणत्या अडचणी आहेत? - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गाच्या विकासात कोणत्या अडचणी आहेत?

टीपा लिहा
Advertisements

उत्तर

  1. ब्राझीलमध्ये रस्ते वाहतूक सर्वत्र आढळते. ब्राझील या देशात रस्तेमार्गांचा वाटा निम्म्यापेक्षा जास्त आहे. ब्राझीलच्या पूर्व भागात रस्ते मार्ग केंद्रित झाले आहेत.
  2. याशिवाय, पॅराना या दक्षिणवाहिनी नदीचाही जल वाहतुकीसाठी उपयोग केला जातो. किनारी भागात सागरी जल वाहतूक चालते. ब्राझीलमध्ये अंतर्गत भागातील ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील वनाच्छादित प्रदेश व दलदलयुक्त जमीन यांमुळे याठिकाणी वाहतूक मार्गांचा विकास मर्यादित आहे. येथे व्यापारी तत्त्वावर जल वाहतूक होते.
  3. तसेच, उच्चभूमीमुळे अंतर्गत भागात लोहमार्गांचा विकास कमी झाला आहे.
  4. रेल्वे वाहतूक स्वस्त असली तरी तिचा उपयोग मोजक्याच शहरांपुरता मर्यादित आहे.
    अशारीतीने, विविध कारणास्तव ब्राझीलच्या अंतर्गत भागात लोहमार्गांच्या विकासामध्ये अडचणी आहेत.
shaalaa.com
ब्राझीलमधील वाहतूक
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन - स्वाध्याय [पृष्ठ ६८]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
पाठ 9 पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
स्वाध्याय | Q २. (आ) | पृष्ठ ६८
एससीईआरटी महाराष्ट्र Geography [Marathi] 10 Standard SSC
पाठ 9 पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. | Q 2

संबंधित प्रश्‍न

चूक की बरोबर ते सकारण सांगा.

ब्राझील देशाची वेळ भारतीय वेळेच्या पुढे आहे.


खालील आकृतीमध्ये ब्राझिलियातून ३१ डिसेंबरच्या सकाळी ११ वाजता विमान निघाले आहे. हे विमान ०° रेखावृत्त ओलांडून नवी दिल्लीमार्गे व्लॉदिवोस्टॉक क याठिकाणी जाणार आहे. ज्यावेळेस विमान निघाले त्यावेळेस नवी दिल्ली आणि व्लॉदिवोस्टॉक येथील स्थानिकवेळ, दिवस व तारीख काय असेल ते सांगा.


भौगोलिक कारणे लिहा.

ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झालेला नाही.


भौगोलिक कारणे लिहा.

आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी सागरी मार्गांवर अवलंबून राहावे लागते.


फरक स्पष्ट करा.

ॲमेझॉन व गंगा नदीतील जलवाहतूक


फरक स्पष्ट करा.

भारतातील वाहतूक व ब्रझील वाहतूक


ब्राझीलमधील कोणत्या भागात वाहतूक मार्ग कमी आढळतात?


टिपा लिहा.

ब्राझीलमधील वाहतुक


भौगोलिक कारणे लिहा.

ब्राझीलमध्ये जलमार्गांचा विकास झाला आहे.


खालील ब्राझीलच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

प्रश्न:

  1. नकाशातील अति दक्षिणेकडील बंदराचे नाव लिहा.
  2. नकाशातील प्रमुख रस्त्याचे नाव काय आहे?
  3. ब्राझीलियाहून मॅनॉसला जाण्यासाठी कोणत्या वाहतूक मार्गाचा वापर करावा लागेल?
  4. बोआ विस्टा विमानतळ ब्राझीलच्या कोणत्या दिशेला आहे?
  5. ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीवरील दोन विमानतळांची नावे लिहा.

ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे ______ वाहतूक आढळते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×