Advertisements
Advertisements
प्रश्न
आपण वेगवेगळे अन्नपदार्थ घरी तयार करतो, म्हणजे आपण स्वयंपोषी आहोत का?
लघु उत्तर
Advertisements
उत्तर
आपण जरी वेगवेगळे अन्नपदार्थ घरात तयार करत असलो, तरी ते पदार्थ वनस्पती किंवा इतर प्राण्यांनी दिलेल्या अन्नपदार्थांपासून बनवतो. त्यामुळे आपण स्वयंपोषी नाही. स्वयंपोषी हा शब्द अशा जीवांसाठी वापरला जातो जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात. आपण मानव आपल्या अन्नासाठी वनस्पतींवर अवलंबून असतो आणि त्यांच्यापासून मिळणारे उत्पादन आपण विविध प्रकारचे अन्न तयार करण्यासाठी वापरतो. जसे गहू, तांदूळ किंवा कडधान्य, इत्यादी. आपण वनस्पतीप्रमाणे प्रकाश-संश्लेषण करू शकत नाही. त्यामुळे आपण स्वयंपोषी नाही.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
