Advertisements
Advertisements
प्रश्न
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
1. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. (२)
१) ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसामाणसांना जोडणारा जिव्हाळा जपायचा असेल तर _____________
- माणसाने एकमेकांशी अजिबात बोलले नाही पाहिजे.
- मन सुसंस्कृत असायला हवे.
- दररोज एकमेकांच्या घरी जावे.
- विज्ञानाची मदत घ्यावी.
२) जगण्याचे खरे सूत्र ___________
- स्वत: चांगले जगावे.
- शेजारी सांगितले तसे जगावे.
- कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जगावे.
- सगळ्यांना सावली देत जगावे.
| आजच्या विज्ञानयुगात विज्ञान-तंत्रज्ञानातील संशोधनामुळे विश्व जवळ आले आहे. संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात 'हे विश्वचि माझे घर आहे,' ही कल्पना केली होती याचे प्रत्यंतर आज आपण घेत आहोत. आज आपण जगात कुठेही जाऊ शकतो; पण संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसामाणसांना जोडणारा जिव्हाळा आज हरवला आहे. तो जपण्यासाठी मन सुसंस्कृत असायला हवे. नाहीतर, राक्षसी वृत्ती निर्माण होते. ती संतांना नको आहे. चांगल्या मनाने निर्माण केलेल्या कृती जगात महत्त्वपूर्ण ठरतात. विज्ञानातील चांगले प्रकल्प समृद्धी आणतात; पण सुंदर मने ही राष्ट्राची श्रीमंती वाढवतात. संतांनी याकडे लक्ष वेधले आहे. वडाचे झाड कायम नम्र असते. ते सगळ्यांना सावली देते. त्याची सावली सर्वांना हवीहवीशी वाटते. झाडे स्वत: ऊन सोसतात. लोकांना सावली देतात. पर्वताच्या कुशीत जन्मलेल्या नद्या मोकळ्या मनाने पुढे वाहतात. पर्वत आपल्या जागी स्थिर राहून हे आनंदाने पाहतात. आपण कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जर काम केले, तर त्याच्यासारखा दुसरा आनंद नसतो. हे जगण्याचे खरे सूत्र आहे. स्वत: चांगले जगावे आणि स्वार्थापलीकडे जाऊन दुसर्याचाही विचार करावा; असे झाले तरच सुंदर समाज निर्माण होईल. सुखी होईल. |
2. पुढील घटकांची प्रत्येकी दोन वैशिष्ट्ये लिहा. (२)
- झाडे -
- पर्वत -
3. स्वमत. (३)
वरील उताऱ्याच्या आधारे विज्ञान हवा की निसर्ग, का ते थोडक्यात स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
1.
१) ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असलेला माणसामाणसांना जोडणारा जिव्हाळा जपायचा असेल तर मन सुसंस्कृत असायला हवे.
२) जगण्याचे खरे सूत्र कोणत्याही कामात मन आनंदी ठेवून जगावे.
2.
- झाडे - स्वत: ऊन सोसतात, लोकांना सावली देतात.
- पर्वत - आपल्या जागी स्थिर राहतात, इतर घटकांकडे आनंदाने पाहतात.
3. विज्ञान आणि निसर्ग या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. निसर्गाचे संवर्धन करून विज्ञानाचा योग्य वापर केला, तर अखंड मानवजातीचे कल्याण शक्य आहे. विज्ञानामुळे मानवाला समृद्धी मिळाली, भौतिक सुखांची देणगी मिळाली. अनेक गोष्टी सहज सोप्या झाल्या. असे असले तरीही निसर्गातील अनेक घटक माणसाचे जीवन समृद्ध करतात हे विसरून चालणार नाही. माणसाला खराखुरा आनंद किंवा मानसिक समाधान हे निसर्गाच्या सहवासातच मिळत असते. त्यामुळे, माणसाने निसर्ग व विज्ञान यांचा योग्य मेळ घालून मानवजातीचे आणि समस्त सजीवांचे कल्याण साधणे आवश्यक आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील चौकट पूर्ण करा.
संत ज्ञानेश्वर यांनी मानवाच्या कल्याणासाठी केलेली विश्वप्रार्थना - ______
खालील चौकट पूर्ण करा.
‘सर्वांभूती भगवद्भावो’ अशी प्रार्थना करणारे संत - ______
खालील चौकट पूर्ण करा.
सामाजिक प्रबोधनावर भर देणारे संत - ______
खालील चौकट पूर्ण करा.
संत तुकारामांचे जीवनसूत्र - ______
आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

आकृती पूर्ण करा.

फरक सांगा.
| सामान्य माणसाचे मागणे | संतांचे मागणे |
| (अ) | (अ) |
| (आ) | (आ) |
खालील काव्यपंक्तीचा अर्थ लिहा.
दुरिताचें तिमिर जावो - ______
खालील तक्ता पूर्ण करा. त्यासाठी कंसातील शब्दांचा उपयोग करा.
(नम्रता, मैत्रभाव, विश्वकल्याण, स्वप्रयत्न, सहकार्य)
| अ. क्र. | काव्यांश | संतांचे नाव | काव्यांशातून व्यक्त झालेली संतांची इच्छा/भावना |
| (१) | ‘सर्व विश्वचि व्हावे सुखी’ | ______ | ______ |
| (२) | ‘अहंकाराचा वारा न लागो राजसां’ | ______ | ______ |
| (३) | ‘सर्वांभूती भगवद्भावो’ | ______ | ______ |
| (४) | ‘एक एका साह्य करूं। अवघे धरूं सुपंथ’ | ______ | ______ |
| (५) | ‘स्वत:चा उद्धार करा प्रयत्नाने’ | ______ | ______ |
सर्व संतांच्या प्रार्थनेमधील सामाईक सूत्र तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.
‘भूतां परस्परें पडो। मैत्र जीवाचें।’ या ओळीचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
या पाठातून (सर्व विश्वचि व्हावे सुखी) तुम्ही काय शिकलात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
