Please select a subject first
Advertisements
Advertisements
श्री. शांतिलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 150 शेअर्स 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केले. नंतर 7% लाभांश कंपनीने दिला. गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती?
Concept: undefined >> undefined
खालीलपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे? दोन्ही कंपनीच्या शेअर्सची दर्शनी किंमत समान आहे. कंपनी A साठी बाजारभाव 80 रुपये असून लाभांश 16% आणि कंपनी B साठी बाजारभाव 120 रुपये असून लाभांश 20% आहे.
Concept: undefined >> undefined
Advertisements
दर्शनी किंमत 100 रुपये असलेल्या शेअरचा बाजारभाव 75 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे?
Concept: undefined >> undefined
श्रीमती अनघा दोशी यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 660 रुपये बाजारभावाचे 22 शेअर्स घेतले, तर त्यांनी एकूण किती रुपये गुंतवणूक केली? त्या शेअर्सवरती 20% लाभांश घेतल्यावर 650 रुपये बाजारभावाने ते विकले. प्रत्येक व्यवहारात 0.1% दलाली दिली, तर या व्यवहारात त्यांना किती टक्के नफा किंवा तोटा झाला तो काढा. (उत्तर जवळच्या पूर्णांकात लिहा.)
Concept: undefined >> undefined
श्रीमती अरुणा ठक्कर यांनी एका कंपनीचे 100 रुपये दर्शनी किमतीचे 100 शेअर्स 1,200 रुपये बाजारभावाने विकत घेतले. प्रतिशेअर 0.3% दलाली व दलालीवर 18% GST दिला, तर
- शेअर्ससाठीएकूण गुंतवणूक किती रुपये केली?
- गुंतवणुकीवर दलाली किती दिली?
- दलालीवरील जीएसटी काढा.
- 100 शेअर्ससाठी एकूण किती रुपये खर्च झाले?
Concept: undefined >> undefined
श्री. आदित्य संघवी यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 50 रुपये बाजारभाव असताना 50,118 रुपये गुंतवून खरेदी केले. या व्यवहारात त्यांनी 0.2 % दलाली दिली. दलालीवर 18% दराने GST दिला, तर त्यांना 50,118 रुपयांत किती शेअर्स मिळतील?
Concept: undefined >> undefined
100 रुपये दर्शनी किमतीच्या व 120 रुपये बाजारभावाच्या शेअर्समध्ये 60,000 रुपये गुंतवले, तर किती शेअर्स मिळतील?
Concept: undefined >> undefined
जर 100 रुपये दर्शनी किमतीचे 300 शेअर्स 30 रुपये अवमूल्यावर विकले, तर किती रुपये मिळतील?
Concept: undefined >> undefined
100 रुपये दर्शनी किमतीचा शेअर 30 रुपये अधिमूल्यावर खरेदी केला. दलालीचा दर 0.3 % आहे, तर एका शेअरची खरेदीची किंमत काढा.
Concept: undefined >> undefined
खालील दिलेल्या प्रयोगासाठी नमुना अवकाश ‘S’ व त्यातील नमुना घटकाची संख्या n(S) लिहा.
एक फासा व एक नाणे एकाच वेळी फेकणे
Concept: undefined >> undefined
खालील दिलेल्या प्रयोगासाठी नमुना अवकाश ‘S’ व त्यातील नमुना घटकाची संख्या n(S) लिहा.
2, 3, 5 या अंकांपासून, अंकांची पुनरावृत्ती न करता, दोन अंकी संख्या तयार करणे.
Concept: undefined >> undefined
सहा रंगांच्या तबकडीवरील बाण फिरवल्यावर तो कोणत्या रंगावर स्थिर होतो हे पाहणे.

Concept: undefined >> undefined
वर्ष 2019 च्या मार्च महिन्यातील 5 च्या पटीत येणाऱ्या तारखेचा वार मिळवणे. (खालील कॅलेंडरचे पान पाहा.)

Concept: undefined >> undefined
दोन मुलगे (B1, B2) व दोन मुली (G1, G2) यांच्यातून दोघांची एक रस्ता सुरक्षा समिती बनवायची आहे, तर यासाठी नमुना अवकाश लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
- दोन मुलांची समिती = `square`
- दोन मुलींची समिती = `square`
- एक मुलगा व एक मुलगी यांनी मिळून तयार होणारी समिती = `square` `square` `square` `square`
-
∴ नमुना अवकाश = {__, __, __, __, __, __}
Concept: undefined >> undefined
खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे. त्यावरून कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या तासांचे मध्यक काढा.
| दैनंदिन कामाचे तास | 8 - 10 | 10 - 12 | 12 - 14 | 14 - 16 |
| कर्मचाऱ्यांची संख्या | 150 | 500 | 300 | 50 |
Concept: undefined >> undefined
एका आमराईतील आंब्याची झाडे व प्रत्येक झाडापासून मिळालेल्या आंब्यांची संख्या यांचे वारंवारता वितरण दिले आहे. त्यावरून दिलेल्या सामग्रीचे मध्यक काढा.
| आंब्यांची संख्या | 50 − 100 | 100 − 150 | 150 − 200 | 200 − 250 | 250 − 300 |
| झाडांची संख्या | 33 | 30 | 90 | 80 | 17 |
Concept: undefined >> undefined
मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गाच्या वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या पोलीस चौकीवर केलेल्या सर्वेक्षणात पुढीलप्रमाणे निरीक्षणे आढळली. दिलेल्या नोंदींचे मध्यक काढा.
| वाहनांची गती (किमी/तास) | 60 - 64 | 65 - 69 | 70 - 74 | 75 - 79 | 80 - 84 | 85 - 89 |
| वाहनांची संख्या | 10 | 34 | 55 | 85 | 10 | 6 |
Concept: undefined >> undefined
विविध कारखान्यांमध्ये उत्पादन होणाऱ्या दिव्यांची संख्या खालील सारणीत दिली आहे. त्यावरून दिव्यांच्या उत्पादनाचा मध्यक काढा.
| दिव्यांची संख्या (हजार) | 30 - 40 | 40 - 50 | 50 - 60 | 60 - 70 | 70 - 80 | 80 - 90 | 90 - 100 |
| कारखान्यांची संख्या | 12 | 35 | 20 | 15 | 8 | 7 | 8 |
Concept: undefined >> undefined
वर्गीकृत वारंवारता सारणीतील सामग्रीचा मध्य काढण्यासाठीच्या पुढील सूत्रात `bar"X" = "A" + (sum f_iu_i)/(sum f_i) xx g` मध्ये ui = _______
Concept: undefined >> undefined
| प्रतिलीटर कापलेले अंतर (किमी) | 12 - 14 | 14 - 16 | 16 - 18 | 18 - 20 |
| कारची संख्या | 11 | 12 | 20 | 7 |
वरील सामग्रीसाठी कारच्या प्रतिलीटर कापलेल्या अंतराचे मध्यक ______ या वर्गात आहे.
Concept: undefined >> undefined
