हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

श्रीमती अनघा दोशी यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 660 रुपये बाजारभावाचे 22 शेअर्स घेतले, तर त्यांनी एकूण किती रुपये गुंतवणूक केली? - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

श्रीमती अनघा दोशी यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 660 रुपये बाजारभावाचे 22 शेअर्स घेतले, तर त्यांनी एकूण किती रुपये गुंतवणूक केली? त्या शेअर्सवरती 20% लाभांश घेतल्यावर 650 रुपये बाजारभावाने ते विकले. प्रत्येक व्यवहारात 0.1% दलाली दिली, तर या व्यवहारात त्यांना किती टक्के नफा किंवा तोटा झाला तो काढा. (उत्तर जवळच्या पूर्णांकात लिहा.)

योग
Advertisements

उत्तर १

शेअर्सच्या खरेदीबाबत:

येथे, दर्शनी किंमत = ₹ 100, बाजारभाव = ₹ 660, शेअर्सची संख्या = 22, दलालीचा दर = 0.1%

एकूण गुंतवणूक = बाजारभाव × शेअर्सची संख्या

= 660 × 22 = ₹ 14,520

दलाली = एकूण गुंतवणुकीच्या 0.1 %

`= 0.1/100 xx 14,520` = ₹ 14.52

∴ 22 शेअर्ससाठी गुंतवलेली रक्कम

= एकूण गुंतवणूक + दलाली = 14,520 + 14.52

= ₹ 14,534.52

लाभांशाबाबत:

लाभांशाचा दर = 20%,

∴ प्रतिशेअर लाभांश = दर्शनी किमतीच्या 20%

`= 20/100 xx 100` = ₹ 20

∴ 22 शेअर्सवरील लाभांश = 20 × 11 = ₹ 440

शेअर्सच्या विक्रीबाबत:

बाजारभाव ₹ 650, दलालीचा दर = 0.1%

22 शेअर्सचा बाजारभाव = 22 × 650 = ₹ 14,300

दलाली = 14,300 चे 0.1 %

`= 0.1/100 xx 14,300` = ₹ 14.30

श्रीमती अनघा यांचे उत्पन्न

= लाभांश + 22 शेअर्सचा बाजारभाव – दलाली

= 440 + 14300 – 14.30

= ₹ 14725.7

उत्पन्न > गुंतवलेली रक्कम

∴ नफा झाला.

∴ नफा = उत्पन्न – गुंतवलेली रक्कम

= 14725.7 – 14534.52

= ₹ 191.18

नफ्याची टक्केवारी = `"नफा"/"गुंतवलेली रक्कम" xx 100`

`= 191.18/14534.52 xx 100` = 1.31%

∴ शेअर्सच्या व्यवहारातील नफ्याची टक्केवारी 1 % आहे.

shaalaa.com

उत्तर २

शेअर्स खरेदीबाबत:

येथे दर्शनी किंमत = ₹ 100, बाजारभाव = ₹ 660,

शेअर्सची संख्या = 22, दलालीचा दर 0.1 %

एकूण गुंतवणूक = बाजारभाव × शेअर्सची संख्या

= 660 × 22 = ₹ 14,520

दलाली = बाजारभावाच्या 0.1 %

`= 0.1/100 xx 660` = ₹ 0.66

प्रत्येकी शेअरसाठी गुंतवलेली रक्कम = 660 + 0.66 = ₹ 660.66

लाभांशाबाबत:

लाभांशाचा दर = 20 %

लाभांश = दर्शनी किमतीच्या 20 % = `20/100 xx 100` = ₹ 20

शेअर्स विक्रीबाबत:

बाजारभाव = ₹ 650, दलालीचा दर 0.1 %

दलाली = बाजारभावाच्या 0.1 %

`= 0.1/100 xx 650` = ₹ 0.65

एका शेअरच्या विक्रीतून मिळणारी रक्कम

= 650 - 0.65 = 649.35

∴ लाभांशासहित मिळालेली रक्कम

= एका शेअरची विक्री किंमत + प्रतिशेअर लाभांश

= 649.36 + 20 = ₹ 669.35

मिळालेली रक्कम > गुंतवलेली रक्कम, असल्यामुळे नफा झाला आहे.

∴ नफा = 669.35 - 660.66 = ₹ 8.69

नफ्याची टक्केवारी `= 8.69/660.66 xx 100` = 1.31 %

∴ शेअर्सच्या व्यवहारातील नफ्याची टक्केवारी 1% आहे.

shaalaa.com
दर्शनी किंमत व बाजारभाव तुलना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 4: अर्थनियोजन - संकीर्ण प्रश्नसंग्रह – 4B [पृष्ठ ११२]

APPEARS IN

बालभारती Ganit 1 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 4 अर्थनियोजन
संकीर्ण प्रश्नसंग्रह – 4B | Q 11 | पृष्ठ ११२

संबंधित प्रश्न

श्रीमती देशपांडे यांनी 20,000 रुपये गुंतवून 5 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 20 रुपये अधिमूल्य देऊन घेतले, तर त्यांना किती शेअर्स मिळतील?


श्री. शांतिलाल यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे 150 शेअर्स 120 रुपये या बाजारभावाने खरेदी केले. नंतर 7% लाभांश कंपनीने दिला. गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती?


खालीलपैकी कोणती गुंतवणूक फायदेशीर आहे? दोन्ही कंपनीच्या शेअर्सची दर्शनी किंमत समान आहे. कंपनी A साठी बाजारभाव 80 रुपये असून लाभांश 16% आणि कंपनी B साठी बाजारभाव 120 रुपये असून लाभांश 20% आहे.


दर्शनी किंमत 100 रुपये असलेल्या शेअरचा बाजारभाव 75 रुपये आहे, तर खालीलपैकी कोणते वाक्य योग्य आहे?


श्रीमती अरुणा ठक्कर यांनी एका कंपनीचे 100 रुपये दर्शनी किमतीचे 100 शेअर्स 1,200 रुपये बाजारभावाने विकत घेतले. प्रतिशेअर 0.3% दलाली व दलालीवर 18% GST दिला, तर

  1. शेअर्ससाठीएकूण गुंतवणूक किती रुपये केली?
  2. गुंतवणुकीवर दलाली किती दिली?
  3. दलालीवरील जीएसटी काढा.
  4. 100 शेअर्ससाठी एकूण किती रुपये खर्च झाले?

श्री. आदित्य संघवी यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 50 रुपये बाजारभाव असताना 50,118 रुपये गुंतवून खरेदी केले. या व्यवहारात त्यांनी 0.2 % दलाली दिली. दलालीवर 18% दराने GST दिला, तर त्यांना 50,118 रुपयांत किती शेअर्स मिळतील?


100 रुपये दर्शनी किमतीच्या व 120 रुपये बाजारभावाच्या शेअर्समध्ये 60,000 रुपये गुंतवले, तर किती शेअर्स मिळतील?


जर 100 रुपये दर्शनी किमतीचे 300 शेअर्स 30 रुपये अवमूल्यावर विकले, तर किती रुपये मिळतील?


100 रुपये दर्शनी किमतीचा शेअर 30 रुपये अधिमूल्यावर खरेदी केला. दलालीचा दर 0.3 % आहे, तर एका शेअरची खरेदीची किंमत काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×