Advertisements
Advertisements
भरकटलेल्या मुलांसाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
| साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी आयोजित |
||
| स्पर्धा - दि. 20 मार्च | वेळ - स. 9 वाजता | |
| राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा व पारितोषिक वितरण सोहळा प्रमुख पाहुणे - श्री. विक्रम मेहेंदळे अध्यक्षा - श्रीमती रेखा महाजन स्थळ - हुतात्मा सभागृह, साखरवाडी संपर्क - आयोजक, साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी. E-mail - [email protected] |
||
| विनय/विनया देशमुख विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने |
||
| विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी आयोजकांना विनंती करणारे पत्र लिहा. |
||
Concept: undefined >> undefined
Advertisements
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
| साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी आयोजित |
||
| स्पर्धा - दि. 20 मार्च | वेळ - स. 9 वाजता | |
| राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा व पारितोषिक वितरण सोहळा प्रमुख पाहुणे - श्री. विक्रम मेहेंदळे अध्यक्षा - श्रीमती रेखा महाजन स्थळ - हुतात्मा सभागृह, साखरवाडी संपर्क - आयोजक, साहित्य सेवा वाचनालय, साखरवाडी. E-mail - [email protected] |
||
| विनय/विनया देशमुख विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने |
||
| वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल मित्राला/मैत्रिणीला अभिनंदन करणारे पत्र लिहा. | ||
Concept: undefined >> undefined
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) आकृती पूर्ण करा. (2)

| न्यू एज रोबो कंपनीचा एजंट आम्हांला लॅपटॉपवर माहिती सांगत होता. हॉटेल व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन वेटर, आचारी, स्वीपर, मॅनेजर असे वेगवेगळे यंत्रमानव म्हणजेच रोबो आम्ही बनवले आहेत. आम्ही बनवलेले रोबो हुबेहूब माणसाप्रमाणे दिसतात आणि वागतातही. एका रोबोची किंमत एक लाख रुपये आणि दर दोन महिन्यांना सर्व्हिसिंगचे अडीच हजार रुपये. लाखाची गोष्ट निघाल्याबरोबर सोमनाथ पटकन उठत मला म्हणाला, ‘‘राजाभाऊ, उठा आता, हे काही आपल्याला परवडणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोबो वेटरची सर्व कामं करणं कसं शक्य आहे?’’ सोमनाथप्रमाणे माझाही त्या एजंटवर विश्वास बसत नव्हता. फक्त पाच मिनिटं.. माझं म्हणणं तुम्ही ऐकून घ्या. माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास बसत नाही; पण आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचा हा चमत्कार आहे. मोठमोठ्या शहरांतील हॉटेलमध्ये अनेक रोबो काम करत आहेत. आमच्या रोबो वेटरबाबत खाण्यापिण्याचा, पगाराचा, कामचुकारपणाचा विचार करण्याची गरज नाही. आमचा रोबो वेटर मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल आणि तुम्हांला दुप्पट कमाई करून देईल याची मी खात्री देतो. एजंटच्या शेवटच्या वाक्याने आम्ही विचार करू लागलो. |
(2) उत्तरे लिहा. (2)
- रोबो वेटरचा सर्व्हिसिंगचा कालावधी लिहा.
- रोबो वेटरबाबत न्यू एज कंपनीच्या एजंटने दिलेली खात्री लिहा.
(3) स्वमत. (3)
रोबो व माणूस यांच्या वागण्यातील ठळक फरक तुमच्या शब्दांत लिहा.
Concept: undefined >> undefined
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) कृती करा. (2)

|
पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. ‘एम्स’ मधून डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हात/पाय कापावा लागलेले पेशंटस दिवसेंदिवस अगदी महिनाेन् महिने उठत नाहीत. मी दोनच दिवसांत उभी राहिले. एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला. असा माझा अवतार नि जोडीला भाईसाब-आम्ही पोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव अशा होत्या, की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, ‘‘अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास... तुला ठाऊक आहे, तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलं आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वत:ला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला...!’’ ‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र’ बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं. इथे माझे दीड वर्षांसाठी खडतर प्रशिक्षण सुरू झाले. छोटे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव, ध्येयापासून विचलित करू पाहणारे कष्टदायी प्रशिक्षण यांतून मी तावून सुलाखून निघत होते. |
(2) एका शब्दात उत्तर लिहा. (2)
- एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला.
- अरुणिमाबरोबर बचेंद्री पाल यांच्याकडे जाणारी व्यक्ती.
(3) स्वमत. (3)
‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(1) कवितेच्या आधारे खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. (2)
- सकारात्मक राहा.
- उतावळे व्हा.
- खूप हुरळून जा.
- संवेदनशीलता जपा.
|
खोद आणखी थोडेसे घट्ट मिटू नये ओठ मूठ मिटून कशाला झरा लागेलच तिथे |
(2) कवितेतील खालील संकल्पना आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. (2)
| कवितेतील संकल्पना | संकल्पनेचा अर्थ |
| (1) मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली | (i) मनातील सामर्थ्य व्यापक बनवावे. |
| (2) उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी | (ii) सगळे लोक फसवे नसतात. |
| (iii) भ्रामक खोट्या समजुती बाळगू नयेत. |
(3) खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा. (2)
खोद आणखी थोडेसे
खाली असतेच पाणी
धीर सोडू नको, सारी
खोटी नसतात नाणी.
(4) काव्यसौंदर्य (2)
‘झरा लागेलच तिथे, खोद आणखी जरासे’, या ओळीतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
खालील पंक्तींचे रसग्रहण करा.
‘घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा’
Concept: undefined >> undefined
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
|
वाचाल तर वाचाल! मनोज पुस्तकालय 69/314 आनंद नगर, अकोला दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त दि. 8 डिंसेबर रोजी खास सवलत |
|
| कोणत्याही पुस्तकावर 20% सवलत |
2000 रुपयांच्या खरेदीवर एक पुस्तक मोफत |
| वेळ `↓` स. 9.00 ते रात्री 8.00 वाजता सोमवार बंद. संपर्क - [email protected] |
|
श्रेया/श्रेयस इनामदार विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र दुकानाच्या व्यवस्थापकांना लिहा.
Concept: undefined >> undefined
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा.
|
वाचाल तर वाचाल! मनोज पुस्तकालय 69/314 आनंद नगर, अकोला दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त दि. 8 डिंसेबर रोजी खास सवलत |
|
| कोणत्याही पुस्तकावर 20% सवलत |
2000 रुपयांच्या खरेदीवर एक पुस्तक मोफत |
| वेळ `↓` स. 9.00 ते रात्री 8.00 वाजता सोमवार बंद. संपर्क - [email protected] |
|
श्रेया/श्रेयस इनामदार, संबंधित निवेदनाची माहिती देणारे पत्र तुमच्या मित्र/मैत्रिणीला लिहा.
Concept: undefined >> undefined
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
1. उत्तरे लिहा: (2)
- म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार - ______
- आपल्या तरुण मुलाला ‘माणसं’ दाखवणारा - ______
| शहरगावी राहणाऱ्या मुलाची पत्रं हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे, हे ओळखलं आहे त्या प्रौढ, समंजस पोस्टमननं. तो नुसता पत्रं पोहोचवणारा सरकारी नोकर नाही. तो माणूस आहे, भला माणूस! आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही. तो त्याला माणसं दाखवतो आहे. माणसांपर्यंत पोहोचवण्याचे पूल दाखवतो आहे. म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजावली आहे. ‘वाट पाहणं’ ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते! दु:ख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड-कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा जरा किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं, एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हाच तिची किंमत कळत जाते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो. धीर धरायला शिकतो. एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो. श्रद्धा डोळस आणि पक्की होत जाते. ध्यास वाढत जातो. |
2. आकृती पूर्ण करा. (2)

3. स्वमतः (3)
‘वाट पाहणं’ ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते! या उद्गाराविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.
Concept: undefined >> undefined
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
1. कृती पूर्ण करा: (2)

|
झोपायची वेळ झाली, की सोनाली उडी मारून बिछान्यात शिरे; पण चटकन झोपी जायचा तिचा स्वभावच नव्हता. बिछान्यात आली, की ती माझं तोंड चाटू लागे, मग केस चाटे. पंजानं माझे केस विस्कटून टाकी. कधी ती अन् रूपाली यांची दंगामस्ती माझ्याच बिछान्यात चालायची. दोघीही बिछान्यात चक्क नाचत, कुदत, थकल्या-दमल्या, की दोघीही आपापली जागा पकडून झोपायला येत. फुस्स करून रूपा अंग टाकी आणि झोपी जाई; पण सोनालीला मात्र अशी झोप येत नसे. लहान मुलासारखं तिला मला थोपटून झोपवावं लागे. तेव्हा कुठे बाईसाहेब झोपत. ती झोपे तीही एखाद्या लहान मुलासारखी अस्ताव्यस्त. झोपेत बाईसाहेब लोळतही भरपूर. शेवटी त्या दोघींच्या मध्ये मलाच झोपायला पुरेशी जागा मिळत नसे. सोनाली आणि रूपाली लहान होत्या तोपर्यंत रूपालीच अंगापिंडानं मोठी होती. वयानं तर ती सोनालीपेक्षा चांगली सात दिवसांनी मोठी. त्यामुळे ती सोनालीवर ताईगिरी करी. सोनालीवर गुरगुरे, तिला दमात घेई. सोनाली बिचारी गरीब. रूपाली तिच्यावर गुरगुरली, की बापडी कोपऱ्यात जाऊन निमूट बसे. पण दोघी वाढू लागल्या आणि सारं दृश्यच बदललं. |
2. कोण ते लिहा: (2)
- सोनालीवर ताईगिरी करणारी - ______
- झोपायची वेळ झाली की उडी मारून बिछान्यात शिरणारी - ______
3. स्वमतः (3)
सोनाली व रूपाली यांच्यातील जिव्हाळा व्यक्त करणारा प्रसंग तुमच्या शब्दांत लिहा.
Concept: undefined >> undefined
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
1. चौकटी पूर्ण करा: (2)
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - ______
- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे - ______
|
तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. तू झालास परिस्थितीवर स्वार तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर तुझे शब्द जसे की आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय |
2. आकृतिबंध पूर्ण करा: (2)

3. खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा: (2)
तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
4. काव्यसौंदर्यः (2)
‘आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.’
या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:

मधुर/मधुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय, सांगली विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी रोपांची मागणी करणारे पात्र व्यवस्थापकांना लिहा.
Concept: undefined >> undefined
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:

मधुर/मधुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय, सांगली विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.
Concept: undefined >> undefined
खाली दिलेल्या रूपक कथेचा भावार्थ तुमच्या शब्दांत लिहा.
| ‘‘...एक विचारू?’’ उगवून नुकतेच काही दिवस झालेलं रोप लगतच्या महावृक्षाला म्हणाले. ‘‘हं.’’ ‘‘मलाही तुमच्यासारखं मोठ्ठं व्हायचंय... पण..’’ ‘‘पण माझ्या सावलीखाली आता ते शक्य नाही, हो ना?’’ ‘‘...हो.’’ ‘‘अरे! कितीतरी लहान लहान झाडंही खूप सुंदर असतात, आणि इतक्या..’’ ‘‘पण वाढणं देखील सुंदरच असेल ना?’’ ‘‘हो! आणि इतक्या उंचीवर आता खरं तर ही लहान झाडंच जास्त सुंदर दिसतात...’’ ...आणि महावृक्षाला दूरवर जंगलातून वाट काढीत येणारा एक लाकूडतोड्या दिसला! (गुलमोहर) |
Concept: undefined >> undefined
खालील दिलेल्या उताऱ्याचा १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
|
पुस्तकांना आपण जवळ घेता घेता पुस्तकेही आपल्याला जवळ घेतात. वाचकांचा प्रवास हळूहळू लेखनापर्यंतही होऊ लागतो. शब्दांच्या छटांची तरलता जगण्याचे उत्सव फुलवू लागते. नव्या पिढीला माणूसपणाच्या तरलतम सुंदरतेकडे नेणं. हे तर पालक व शिक्षकांचं मूळ कार्य! या आनंदमय कामात ग्रंथ आपले प्रेरक ठरतात. म्हणूनच, ग्रंथपाल हे ग्रंथसंस्कृतीचे लोकपाल असतात. |
Concept: undefined >> undefined
खालील दिलेल्या उताऱ्याचा १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
|
चैत्राचा महिना आहे. आसमंतातल्या साऱ्याच झाडांना पोपटी पालवी फुटली आहे. दृष्टी जाईल तिथं झाडाच्या फिक्या आणि गडद हिरव्या रंगानं अवकाश भरून टाकलं आहे. उन्ह तापत चाललं आहे; पण एवढ्या तीव्र उन्हातही ही झाडं भक्क उजेड पिऊन आतून रसरशीत आणि हिरवीगार दिसत आहेत. ह्या झाडाचं प्रत्येक पान आणि हरेक डहाळी साैंर्द्यानंदानं बहरली आहे. ते उंच पिंपळाचे झाड बघत रहावं असं आहे. त्याची ती लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं किती देखणं आहे! खरंतर हा हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे. |
Concept: undefined >> undefined
खालील दिलेल्या उताऱ्याचा १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
| दुसऱ्या माणसाशी असलेलं आपलं नातं ही खरंतर किती महत्त्वाची गोष्ट आहे. बहुतेकजण परस्परांमधील नात्याबाबत गंभीर नसतात, कारण ते आधी स्वत:चा विचार करतात आणि नंतर दुसऱ्याचा विचार करतात. दुसरे आपल्यासाठी सोयीचे असतील, सुख देणारे असतील किंवा आपल्या विचारभावनांना अवकाश देणारे असतील, तरच आपण त्यांना विचारात घेतो. बऱ्याचदा आपल्या दृष्टीने नातं ही एक अंतरावरील गोष्ट असते. आपण एखाद्याशी नात्यानं जोडलेले आहोत म्हणजे त्यांच्यात गुंतलेलो आहोत, पूर्णपणे सामावले आहोत असा अनुभव म्हणूनच आपल्याला येत नाही. खऱ्या नात्यामध्ये संवेदना विखुरलेली, विभागलेली नसते, एकात्म असते. मात्र आपण नात्यात संवेदनेचे वेगवेगळे स्तर अनुभवतो. |
Concept: undefined >> undefined
खालील उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
|
सौजन्य हे सुजनांकडून अपेक्षावयाचे असते. ज्यांच्या मनात प्रेम, सहभावना, आपुलकी, स्नेहशीलता आहे, अशाजवळ सौजन्य असते. सौजन्याला नम्रतेची जोड मिळाली तर सोन्याहून पिवळे होते. जगात वावरताना सौजन्यशील वृत्ती अंगी बाणलेली असली तर अनेक फायदे होऊ शकतात; पण त्याहीपेक्षा आपण माणुस आहोत, पशू नाही याची जी जाणीव होते तीच महत्त्वाची असते. ज्याची वृत्तीच आक्रमक असते आणि ज्यांचा स्वभाव जुळवून घेण्याचा नसतो, त्यांची वृत्ती ही स्वभावत: पशूची असते. त्यामुळे, त्यांच्याजवळ सौजन्य असेल कसे? सौजन्य ही मानसिक वृत्ती आहे. मनातून ती साकारते व कृतीतून प्रकट होते. व्यवहारात अशा वृत्तीतून जे वागणे होते किंवा आचार घडतो अशाच आचाराला सौजन्य म्हटले जाते. सौजन्यातून प्रेम व्यक्त होते. |
Concept: undefined >> undefined
खालील उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
|
माणूस, त्याचा सामाजिक परिसर व त्याच्या सभोवतालचा निसर्ग यांतील संवाद शिक्षणामुळे साधता आला पाहिजे, हा कर्मवीरांचा आग्रह होता. भारत हा खेड्यांचा आणि खेडूतांचा देश आहे. खेडी ही निसर्गाला अधिक जवळची आहेत. व्यक्तिचे पौरुष, प्रतिकारक्षमता व उपक्रमशीलता यांचा विकास होतो तो माणूस आणि निसर्ग यांच्या सहयोगातून. कर्मवीरांनी हे जीवन रहस्य जाणले आणि शिक्षणाचा मोहरा खेड्याकडे वळविला. संस्थानिकांचे वाडे, वारकऱ्यांच्या धर्मशाळा, वाड्या आणि वस्त्यांवरची घरकुले हीच आपली आश्रयस्थाने समजून कार्याला आरंभ केला. पुढे-पुढे शाळांच्या वास्तू उभ्या राहिल्या. शक्य असेल तेथे शाळेला जोडून शेती संपादन करण्यात आली. शेतात विहिरी खोदण्यात आल्या. हे सर्व विदयार्थ्यांच्या श्रमदानातून घडवून आणले. अंगमेहनतच गरिबांची दौलत. ‘कमवा आणि शिका’ या शिक्षण-क्षेत्रातील मंत्राचे द्रष्टे कर्मवीर हेच होते. |
Concept: undefined >> undefined
