हिंदी

SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा - Maharashtra State Board Question Bank Solutions

Advertisements
[object Object]
[object Object]
विषयों
मुख्य विषय
अध्याय

Please select a subject first

Advertisements
Advertisements
< prev  3301 to 3320 of 8502  next > 

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.  (२)

  • मधमाशा किती कष्ट करून मध गोळा करतात हे मुलांनी पाहिले तर .....
  1. मुले मध गोळा करायला शिकतील.
  2. मधमाशा मध कशा गोळा करतात हे समजेल.
  3. मुलांना कष्टांची किंमत आणि गंमतपण कळेल.
  4. मधमाशा दररोज किती मध गोळा करतात हे समजेल.
  • मुंबईतील नळ दुरुस्त करणाऱ्या व्यक्तीच्या कामाचा परिणाम.....
  1. काही वर्षांत लाखो लीटर पाणी वाचले.
  2. सगळेजण नळ दुरुस्त करायला शिकले.
  3. सगळ्यांच्या डोळ्यांतून पाणी आले.
  4. आता मुंबईत एकही नळ नादुरुस्त नाही.
मी तुम्हांला फुलपाखरांच्या मागे पळताना पाहिलंय. तुमच्यापैकी एखाद्याने तरी फुलपाखरांच्या सुंदर आयुष्याचा अभ्यास केला पाहिजे. तुमच्या वर्गाच्या बाहेर मधमाश्यांचं मोहोळ होतं म्हणून खूप दिवस खिडकी बंद होती; पण आता खिडकी उघडा. त्या मधमाश्या नीट बघा. त्या जसं पोळं बनवतात ना तसं परफेक्ट घरसुद्धा बनवू शकत नाही आपण. त्या किती कष्ट करून मध गोळा करतात हे बघितलं तरी तुम्हांला कष्टाची किंमत आणि गंमतपण कळेल. मुंबईत एक माणूस असा आहे जो दर आठवड्याला लोकांच्या घरी जातो. ओळख नसली तरी आणि करतो काय तर फक्त लोकांच्या घरी बेसिनचा, बाथरूमचा नळ गळत तर नाही ना हे तपासतो. त्याच्या एकट्याच्या कामामुळे गेल्या काही वर्षांत लाखो लीटर पाणी वाचलंय, जे नळ खराब असल्यामुळे वाया जायचं. पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दु:खी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे. एका मुलाने आपल्या वाढदिवसाचे पैसे वाचवून ठेवले आणि काय केलं माहितेय? झोपडपट्टीमधल्या मुलांना नाल्यावरून एका तुटक्या लाकडी पुलावरून जावं लागायचं. त्याने आपल्या वाढदिवसाच्या पैशांतून त्या मुलांसाठी पक्का पूल बनवण्यासाठी आपले पैसे दिले.

२) पुढील कृतीतून दिसून येणारा गुण ओळखा.  (२)

अ) वाढदिवसाचे पैसे नाल्यावरील पूल बांधण्यासाठी दिले......

ब) काय ते लिहा.

पाण्याचा वाया जाणारा थेंब वाचवणे म्हणजे ...........

३) स्वमत-   (३)

'पाण्याचे वाया जाणारे थेंब वाचवणं हे दु:खी माणसाच्या डोळ्यांतलं पाणी पुसण्याएवढंच महत्त्वाचं काम आहे', आप्पांच्या या विधानामागील अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.

[10.1] आप्पांचे पत्र
Chapter: [10.1] आप्पांचे पत्र
Concept: undefined >> undefined

टिपा लिहा.

जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक

[15.2] वीरांगना (स्थूलवाचन)
Chapter: [15.2] वीरांगना (स्थूलवाचन)
Concept: undefined >> undefined

Advertisements

'प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश', पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

[15.2] वीरांगना (स्थूलवाचन)
Chapter: [15.2] वीरांगना (स्थूलवाचन)
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) ओळखा पाहू.  (२)

लेखकाने व्यक्त केलेल्या अपेक्षेतून मुलांनी कोण बनावे असे म्हटले आहे ते ओळखून लिहा.

अ) तुमच्यापैकी एकानेतरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेतील ग्रंथालयात दिसलं पाहिजे......

आ) तुमच्यापैकी एकजण तरी सवाईगंधर्व महोत्सवात गाताना दिसलं पाहिजे......

खूप पैसे कमवायचे आणि निसर्ग बघायला दुसऱ्या देशात जायचं स्वप्न लोकांचं; पण आपल्या देशातील निसर्ग समृद्ध करणारी माणसं हवीत. तुमच्यापैकी खूप जण परदेशात जाणार आहात. तुमच्यापैकी एकजण तरी सवाईगंधर्व महोत्सवात गाताना दिसलं पाहिजे. परीक्षेत पाहिले आलात तर शाळेच्या भिंतीवर तुमचं नाव असेल; पण तुमच्यापैकी एकानेतरी लिहिलेलं पुस्तक आपल्या शाळेच्या ग्रंथालयात दिसलं पाहिजे. तुम्ही जगातल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहात; पण तुमच्यापैकी एकाच्या तरी शेतात हुरडा खायला यायचंय मला. आपल्या पूर्वजांनी वेरूळ अजिंठा बनवलाय. जगभरचे लोक बघायला येतात. तुम्ही असंच नवीन काहीतरी भव्यदिव्य बनवून दाखवाल याची मला खात्री आहे. मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हांला खूप जवळून पाहिलंय, तुमच्या शिक्षकांनी तुम्हांला वर्गात शिस्तीत बसलेलं बघितलंय; पण मी तुम्हांला मैदानात मनसोक्त गोंधळ घालताना बघितलंय. तुमचा गोंधळ बघून सगळे म्हणायचे अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत; पण मला राग आला नाही. तुम्ही मोठे झाल्यावर जग म्हणालं पाहिजे, की अशी पोरं आम्ही कुठं पाहिली नाहीत. मला आनंद होईल. फक्त तुम्ही आता आहात तसेच आनंदी रहा. जग विचारेल तुम्हांला शाळेत तुम्हांला किती गुण मिळाले? पण मी सांगेन जगाला तुम्ही किती गुणी आहात. मी वर्गाबाहेर पाहिलंय दंगामस्ती करताना, मैदानावर, स्नेहसंमेलनात, हॉस्टेलवर. असेच मनसोक्त जगा.

२) तुलना करा.  (२)

आप्पांनी पाहिलेली मुलं शिक्षकांनी पाहिलेली मुलं
   
   

३) स्वमत- (३)

तुमच्या शालेय जीवनातील कोणतीही एक संस्मरणीय आठवण थोडक्यात लिहा.

[10.1] आप्पांचे पत्र
Chapter: [10.1] आप्पांचे पत्र
Concept: undefined >> undefined

'मुक्कामापेक्षा नियोजनबद्ध प्रवासावर अधिक विश्वास ठेवावा', या विधानाविषयीचे तुमचे विचार स्पष्ट करा.

[15.2] वीरांगना (स्थूलवाचन)
Chapter: [15.2] वीरांगना (स्थूलवाचन)
Concept: undefined >> undefined

मुद्द्यांवरून एक परिच्छेद तयार करा.

[15.2] वीरांगना (स्थूलवाचन)
Chapter: [15.2] वीरांगना (स्थूलवाचन)
Concept: undefined >> undefined

टिपा लिहा.

मुले भरकटण्याची कारणे

[15.2] वीरांगना (स्थूलवाचन)
Chapter: [15.2] वीरांगना (स्थूलवाचन)
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) उत्तरे लिहा. (२)

  1. भाईसाबनी अरुणिमाला दिलेला सल्ला -
  2. अरुणिमाला या खेळात नॅशनल चॅम्पियनशिप मिळाली -
(बहिणीचे पती) हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे. खेळांवर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य; पण फुटबॉल आणि हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर 'आता सीआयएसएफ (CISF) ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील', हा भाईसाबनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला नि 'कॉल लेटर' आले देखील; पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकवलेली होती. हा घोळ निस्तरण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते. 
११ एप्रिल, २०११ चा हा दिवस. लखनऊ स्टेशन गर्दीनं फुललेलं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतूत मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली. गाडीने वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरू झाले. 'बस... एवढे कागदपत्रांचे काम झाले, की झालेच आपले पक्के.' अचानक माझे लक्ष वेधून घेतले ते मला घेरून उभ्या असणाऱ्या तरुणांनी. त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होते; पण मीही काही कच्च्या गुरूची चेली नव्हते. त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करताच जेवढी होती नव्हती तेवढी ताकद एकवटून मी म़ाझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे, त्या डब्यातल्या प्रत्येकजण 'अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे', अशा चेहऱ्यानं मख्खपणे जागेवरच बसून राहिला. अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला. रात्रीच्या भयाण अंधारात माझे दोन्ही हात-पाय धरून त्या नराधमांनी मला चक्क गाडीतून बाहेर फेकून दिलं. शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात दोन धावपट्ट्यांच्या मध्ये उडून पडले. 'अरुणिमा, रेल्वे येतेय आणि तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे', हा अंतर्मनातला संदेश मेंदूपर्यंत पोचेतोवर खूप उशीर झाला होता.

२) एका शब्दात माहिती लिहा. (१)

i) अरुणिमाचा प्रवास

  • प्रवासाचा दिवस-
  • स्टेशन व रेल्वेगाडी-

ii) कारण लिहा. (१)

रेल्वेतील प्रवासी मख्ख चेहऱ्याने जागेवर बसून राहिले...

३) स्वमत-  (३)

तुमचा ’रेल्वेप्रवासातील एखादा अनुभव“ तुमच्या शब्दात स्पष्ट करा.

[11] गोष्ट अरुणिमाची
Chapter: [11] गोष्ट अरुणिमाची
Concept: undefined >> undefined

टिपा लिहा.

रेखाजींच्या कार्याचा परिणाम

[15.2] वीरांगना (स्थूलवाचन)
Chapter: [15.2] वीरांगना (स्थूलवाचन)
Concept: undefined >> undefined

‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे ‘वीरांगना’ या पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

[15.2] वीरांगना (स्थूलवाचन)
Chapter: [15.2] वीरांगना (स्थूलवाचन)
Concept: undefined >> undefined

'भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत', हे पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

[15.2] वीरांगना (स्थूलवाचन)
Chapter: [15.2] वीरांगना (स्थूलवाचन)
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) आकृती पूर्ण करा.  (२)

अरुणिमाने डॉक्टर व सहकार्यांना दिलेला धीर
____________

 

बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भूलतज्ज्ञ होता ना मला देण्यासाठी पुरेसे रक्त. सचिंत झालेल्या डॉक्टर व सहकार्यांना मीच धीर दिला, 'डॉक्टर, नाहीतरी माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे. आता भूल न देताच तुम्ही तो कापलात तरी चालेल.' डॉक्टर व त्यांच्या सहकार्यांनी स्वत:चे एक युनिट रक्त मला दिले आणि माझ्यादेखतच माझा पाय कापला गेला.

इकडे मी जीवनमरणाच्या सीमारेषेवर होते; पण हॉस्पिटलबाहेरच्या जगात एक वेगळेच नाट्य घडत होते. 'फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन युवती सात तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली' ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरलेली. तत्कालीन क्रीडामंत्र्यांनी मला दिल्लीच्या 'एम्स' मध्ये (AIIMS) हलवले, राष्ट्रीय खेळाडू असल्याने अत्युच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या... पण... पण शल्य एकच होतं, की प्रसारमाध्यमांमध्ये वाटेल त्या वावड्या उठत होत्या. 'अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेतून खाली उडी मारली' इथपासून ते 'अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला', इथपर्यंत काहीही छापून येत होतं. तब्बल चार महिने 'एम्स' मध्ये (AIIMS) राहिल्यानंतर, शारीरिक जखमांवर मलमपट्टी झाली होती; पण या मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे होते.

२) जोड्या जुळवा.  (२)

'अ' गट 'ब' गट
१. बरेलीचे हॉस्पिटल अ. एम्स हॉस्पिटल
२. जीवनमरणाची आ. अंतरंग घायाळ करणारे
३. दिल्ली इ. ना भूलतज्ज्ञ, ना पुरेसे रक्त
४. मानसिक जखमा ई. सीमारेषा

३) स्वमत- (३)

’शारीरिक जखमा मलमपट्टीने बऱ्या होतात; पण मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे असतात“ या विधानाचा अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.

[11] गोष्ट अरुणिमाची
Chapter: [11] गोष्ट अरुणिमाची
Concept: undefined >> undefined

सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.

[15.2] वीरांगना (स्थूलवाचन)
Chapter: [15.2] वीरांगना (स्थूलवाचन)
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) एका शब्दात उत्तरे लिहा.  (२)

  1. अरुणिमाचा निर्धार -
  2. अरुणिमाचा पहिला टप्पा -

माझ्या, एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्धाराचा जेव्हा मी उच्चार केला तेव्हा अगदी टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. 'शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय.' अर्थातच लोकांनी माझं बोलणं हसण्यावारी नेलं; पण माझं कुटुंब आणि भाईसाब माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले. एक अवघड पण मला 'शक्य आहे' असं वाटणारा प्रवास आता सुरू होणार होता.

पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. 'एम्स' मधून डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हात/पाय कापावा लागलेले पेशंटस दिवसेंदिवस अगदी महिनोन् महिने उठत नाहीत. मी दोनच दिवसांत उभी राहिले. एका पायात घोट्याची हाडे तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडांची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला. असा माझा अवतार नि जोडीला भाईसाब – आम्ही पोचलो ते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव अशा होत्या, की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, ’अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास... तुला ठाऊक आहे, तुझ्या आतलं एव्हरेस्ट तू केव्हाच सर केलं आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे ते फक्त स्वत:ला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून द्यायला...!“

२) 

1. कोण ते लिहा. (१)

एव्हरेस्ट सर करणारी महिला -

2. खालील कृतीतून व्यक्त होणारा गुण लिहा. (१)

माझं कुटुंब आणि भाईसाब माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिले.

३) स्वमत-  (३)

’आपल्या आतलं एव्हरेस्ट आपल्यालाच सर करायचे असते“ हे विधान सोदाहरण तुमच्या शब्दांत व्यक्त करा.

[11] गोष्ट अरुणिमाची
Chapter: [11] गोष्ट अरुणिमाची
Concept: undefined >> undefined

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. आकृतिबंध पूर्ण करा. (२)

आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा

तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेसी आसरा

तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरि-डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा

कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते परि ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा

घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा

2. तुलना करा. (२)

पिंजऱ्यातील पोपट पिंजऱ्याबाहेरील पोपट
   
   

3. पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा. (२)

दरि-डोंगर, हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा

4. पुढील काव्यपंक्तीतील विचारसाैंदर्य स्पष्ट करा. (२)

कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते परि ना वळत

[16] आकाशी झेप घे रे (कविता)
Chapter: [16] आकाशी झेप घे रे (कविता)
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) वर्णन करा.  (२)

डेथ झोन

'डेथ झोन' ची चढाई सुरू झाली... जिकडे तिकडे मृतदेहांचा खच पडलेला, हाडं गोठवणारी थंडी, मृत्यूचं जवळून दर्शन होत होतं. मला आदल्या रात्री भेटलेल्या बांग्लादेशी गिर्यारोहक मृत्युमुखी पडलेला दिसला... पोटातून उसळून वर येणाऱ्या भीतीला मी आवर घालत होते. 'तुला मरायचं नाहीये, अरुणिमा', अंतर्मनाला वारंवार मी हेच बजावत होते. खरं सांगते, आपलं मन जसं सांगतं, तसंच, अगदी तसंच आपलं शरीर वागतं.

२१ मे, २०१३ ला चढाईचा अगदी शेवटचा टप्पा आला. 'अरुणिमा, तुझा ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झालाय, आत्ताच मागे फिर... एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील!' शेरपा कळकळीने बजावत होता; पण अंतर्मनात कुठेतरी मला ठाऊक होतं की now or never! आता अगदी या क्षणी जर मी एव्हरेस्ट सर केलं नाही, तर माझ्या लेखी माझ्या शरीराने मृत्यूला कवटाळण्यासारखेच होते ना. शिवाय, पुन्हा एकदा इतकी सगळी स्पॉन्सरशिप उभी करणं या अग्निदिव्याला तोंड द्यावं लागलंच असतं. अखेर मी एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले. हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात साठवण्याची मी शेरलापाला विनंती केली. फोटोसाठी माझा शेवटचा साठा उरलेला ऑक्सिजन मास्क मी काढला... मी अशी नि तशी मरणारच होते तर मग माझ्या यशाचे पुरावे असणं अत्यावश्यक होतं. फोटोनंतर शेरपाला मी व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी तयार केलं. आधीच पित्त खवळलेल्या शेरपाने चिडत चिडत का असेना पण व्हिडिओ घेतला... अखेर मी भारताचा ध्वज एव्हरेस्टवर फडकवला. 

२) अरुणिमाचा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा अनुभव लिहा.  (२)

अ) __________________

आ) __________________

इ) __________________

ई) __________________

३) स्वमत-  (३) 

'प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते', याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.

[11] गोष्ट अरुणिमाची
Chapter: [11] गोष्ट अरुणिमाची
Concept: undefined >> undefined

खालील मुद्दयांचा आधारे 'आकाशी झेप घे रे' या कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

क्र. प्रश्न उत्तर
कवी किंवा कवयित्रीचे नाव.  
कवितेचा विषय.  
प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. उदा. व्यथा, वैभव सुखलोलुप, साजिरा  
कवितेतून मिळणारा संदेश.  
प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा.  
कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा.  
[16] आकाशी झेप घे रे (कविता)
Chapter: [16] आकाशी झेप घे रे (कविता)
Concept: undefined >> undefined

खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.

तुजभवती वैभव, माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेसी आसरा

[16] आकाशी झेप घे रे (कविता)
Chapter: [16] आकाशी झेप घे रे (कविता)
Concept: undefined >> undefined

उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१) पाठाच्या आधारे वाक्यांचा उर्वरित भाग लिहून वाक्ये पूर्ण करा. (२)

अ. एक सांगू? लक, भाग्य, किस्मत,-

आ. 'माझा दिवस' अखेर आला होता... गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्यातले-

आता मी उतरू लागले होते. जेमतेम ४०-५० पावलांवरच माझा ऑक्सिजन साठा संपला... एक सांगू? लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी असल्या भाकड शब्दांना मी नाही मानत; पण fortune favours the braves यावर माझा पूर्ण विश्वास आहे... जेव्हा मी गुदमरू लागले, श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले, अगदी त्याच वेळी एका ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन सिलिंडर आम्हांला दिसला. माझ्या शेरपाने तो चटकन मला अडकवला. सावकाश आम्ही त्या 'डेथ झोन' मधून सहीसलामत खाली उतरलो. वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे... आणि आम्ही ते ओलांडून आलो होतो. 'माझा दिवस' अखेर आला होता... गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्त्वाचे शिखर 'एव्हरेस्ट' मी सर केले होते!

गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे काही धडे दिले. माझ्यात आत्मविश्वास जागवला. नेतृत्व, गटबांधणी यांचे धडे तर मिळालेच; पण एक पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण केला. मित्रांनो, आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं नाही, तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते, हे महत्त्वाचं वाटतं मला. आपण इतरांशी कसे वागतो यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहोत की नाहीत हे ठरतं.

तुम्हां कुमारवयोगटांतल्या मुलामुलींना एक सांगावंसं वाटतं, की आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं, तर जेव्हा ध्येयच कमकुवत असतं, तेव्हा त्याला अपयश म्हटलं जातं..

२) आकृती पूर्ण करा.  (२)

गिर्यारोहणाने अरुणिमाला दिलेले धडे
       

३) स्वमत-  (३)

'आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं नाही, तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते, हे महत्त्वाचं वाटतं मला.' या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.

[11] गोष्ट अरुणिमाची
Chapter: [11] गोष्ट अरुणिमाची
Concept: undefined >> undefined

पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

1. आकृत्या पूर्ण करा. (२)

  1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - ___________
  2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वागत करणारे - ___________

2. सत्य विधान ओळखा. (२)

  1. बाबासाहेब निघाले तेव्हा सूर्यफुलांनी त्यांचे स्वागत केले.
  2. बाबासाहेब बोलक्या जिवांचे नायक झाले.
  3. चवदार तळ्यावर बाबासाहेबांनी गुलामांच्या पायात बेड्या चढवल्या.
  4. विषम परिस्थितीवर स्वार होत बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला.

तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं.
सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती.
मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा
खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.

तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.

तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर
तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या
आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर
युद्धात जवानांना उभे करावे तसे.

तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.
तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश; डचमळली पृथ्वी
आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली.

आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.

3. ओळींचा सरळ अर्थ लिहा. (२)

'तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत' या ओळींचा सरळ अर्थ लिहा.

4. विचार साैंदर्य लिहा. (२)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा.

[19] तू झालास मूक समाजाचा नायक (कविता)
Chapter: [19] तू झालास मूक समाजाचा नायक (कविता)
Concept: undefined >> undefined
< prev  3301 to 3320 of 8502  next > 
Advertisements
Advertisements
Maharashtra State Board SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा Question Bank Solutions
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा English (Second/Third Language)
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा Geography [भूगोल]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा Hindi - Composite [हिंदी - संयुक्त]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा Marathi [मराठी]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा Sanskrit (Second Language) [संस्कृत (द्वितीय भाषा)]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा Sanskrit - Composite [संस्कृत - संयुक्त (द्वितीय भाषा)]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]
Question Bank Solutions for Maharashtra State Board SSC (Marathi Medium) १० वीं कक्षा Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×