हिंदी

'प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश', पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

'प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश', पाठाच्या आधारे स्पष्ट करा.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

'वीरांगना' या पाठात महाराष्ट्र कन्या लेफ्टनंट स्वाती महाडिक यांचा भावुक वीरपत्नी ते सज्ज वीरांगना असा धाडसी, प्रेरक व थक्क करणारा जीवनप्रवास मांडला आहे.
         वयाच्या अवघ्या चाळिसाव्या वर्षी आलेले पती निधनाचे दु:ख, पदरी दोन मुले, देशसेवेकरता पतीने दिलेल्या बलिदानानंतर घरावर कोसळलेला दु:खाचा डोंगर या कठीण परिस्थितीला धैर्याने तोंड देत भारतीय सैन्यात रुजू होण्याचा निर्णय स्वाती महाडिक यांनी घेतला. प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटीच्या बळावर आत्मविश्वासपूर्वक त्या 'स्टेट सिलेक्शन बोर्डाची' परीक्षा प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झाल्या. त्यांनी शारीरिक, वैद्यकीय चाचण्याही यशस्वीपणे पार पाडल्या. प्रशिक्षणातही प्रचंड उत्साह व सकारात्मक ऊर्जेने टिकून राहिल्या व लेफ्टनंटपद प्राप्त केले. म्हणजेच, प्राप्त परिस्थितीचा बाऊ न करता, दु:खाने खचून न जाता स्वाती महाडिक यांनी परिश्रम व आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन केले. लोकांच्या मनात आदराचे स्थान मिळवले. तसेच, इतरही अनेक मुली व स्त्रियांना सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणा दिली.
         त्यांच्या जीवनाचा आलेख उलगडून पाहताना 'प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश' हे विधान स्पष्ट होते.

shaalaa.com
वीरांगना
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 15.2: वीरांगना - कृती क्रमांक २

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 15.2 वीरांगना
कृती क्रमांक २ | Q 3. 2.

संबंधित प्रश्न

खालील आकृती पूर्ण करा.


‘कठोर परिश्रमांमुळेच स्वाती महाडिक यांना स्वत:चा निर्धार पूर्ण करता आला’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.


टिपा लिहा.

देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक


टिपा लिहा.

जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक


‘प्राप्त परिस्थितीतून आत्मविश्वासाने आणि परिश्रमाने कार्य करणे म्हणजेच यश’, पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.


पाठाच्या (वीरांगना) आधारे टिप लिहा.


पाठाच्या (वीरांगना) आधारे टिप लिहा.


‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.


‘भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत’, हे पाठाच्या (वीरांगना) आधारे स्पष्ट करा.


सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.


खालील आकृती पूर्ण करा.


‘पती निधनानांतर आपण सैन्यात भरती व्हायचं’, स्वाती महाडिक यांच्या या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो, ते तुमच्या शब्दांत लिहा.


टिपा लिहा.

देशप्रेमी कर्नल संतोष महाडिक


टिपा लिहा.

जिद्दी लेफ्टनंट स्वाती महाडिक


टिपा लिहा.

मुले भरकटण्याची कारणे


‘प्रेम आणि आपुलकी’ या गोष्टींमुळे भरकटलेली मुले पुन्हा स्वगृही जाण्यास तयार होतात, हे ‘वीरांगना’ या पाठाच्या आधारे स्पष्ट करा.


सबइन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांच्या कार्याची माहिती वाचून तुमच्या मनात येणारे विचार स्पष्ट करा.


भरकटलेल्या मुलांसाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×