Advertisements
Advertisements
प्रश्न
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) वर्णन करा. (२)
डेथ झोन
|
'डेथ झोन' ची चढाई सुरू झाली... जिकडे तिकडे मृतदेहांचा खच पडलेला, हाडं गोठवणारी थंडी, मृत्यूचं जवळून दर्शन होत होतं. मला आदल्या रात्री भेटलेल्या बांग्लादेशी गिर्यारोहक मृत्युमुखी पडलेला दिसला... पोटातून उसळून वर येणाऱ्या भीतीला मी आवर घालत होते. 'तुला मरायचं नाहीये, अरुणिमा', अंतर्मनाला वारंवार मी हेच बजावत होते. खरं सांगते, आपलं मन जसं सांगतं, तसंच, अगदी तसंच आपलं शरीर वागतं. २१ मे, २०१३ ला चढाईचा अगदी शेवटचा टप्पा आला. 'अरुणिमा, तुझा ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झालाय, आत्ताच मागे फिर... एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील!' शेरपा कळकळीने बजावत होता; पण अंतर्मनात कुठेतरी मला ठाऊक होतं की now or never! आता अगदी या क्षणी जर मी एव्हरेस्ट सर केलं नाही, तर माझ्या लेखी माझ्या शरीराने मृत्यूला कवटाळण्यासारखेच होते ना. शिवाय, पुन्हा एकदा इतकी सगळी स्पॉन्सरशिप उभी करणं या अग्निदिव्याला तोंड द्यावं लागलंच असतं. अखेर मी एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले. हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात साठवण्याची मी शेरलापाला विनंती केली. फोटोसाठी माझा शेवटचा साठा उरलेला ऑक्सिजन मास्क मी काढला... मी अशी नि तशी मरणारच होते तर मग माझ्या यशाचे पुरावे असणं अत्यावश्यक होतं. फोटोनंतर शेरपाला मी व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी तयार केलं. आधीच पित्त खवळलेल्या शेरपाने चिडत चिडत का असेना पण व्हिडिओ घेतला... अखेर मी भारताचा ध्वज एव्हरेस्टवर फडकवला. |
२) अरुणिमाचा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा अनुभव लिहा. (२)
अ) __________________
आ) __________________
इ) __________________
ई) __________________
३) स्वमत- (३)
'प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते', याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
Advertisements
उत्तर
१) डेथ झोन-
- जिकडे तिकडे मृतदेहांचा खच
- हाडं गोठवणारी थंडी
- मृत्यूचं जवळून दर्शन
- अरुणिमाला आदल्या रात्री भेटलेला बांग्लादेशी गिर्यारोहक मृत्युमुखी पडलेला होता.
२)
अ) अरुणिमा एव्हरेस्ट शिखरावर पोहोचली, हा क्षण कॅमेऱ्यात साठवण्याची शेरपाला विनंती केली.
आ) फोटोसाठी शेवटचा साठा उरलेला ऑक्सिजन मास्क काढला.
इ) फोटोनंतर शेरपाला व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी तयार केलं.
ई) भारताचा ध्वज एव्हरेस्टवर फडकवला.
३) अरुणिमा ही राष्ट्रीय खेळाडू म्हणून सुप्रसिद्ध होती. अचानकपणे अपघातातून आलेल्या अपंगत्वाने तिचे आयुष्यच बदलून गेले. अशा अवघड प्रसंगी खचून न जाता ती जिद्दीने पेटून उठली. असंख्य अडचणींना सामारे जात तिने आपले ध्येय साध्य केले. ती शरीराने अपंग झाली; मात्र मनाने कधीच नाही.
अशीच जिद्दी अरुणिमा प्रत्येकात लपलेली असते. ती बाहेर आणण्याकरता केवळ एका क्षणाची गरज असते. तो क्षण असतो, आपल्याला आपले ध्येय समजण्याचा. ते ध्येय एकदा समजले, की त्या ध्येयापर्यंत वाटचाल करण्याची शक्ती आपोआपच निर्माण होते. त्या ध्येयवेडेपणातून ते ध्येय गाठण्यासाठी आवश्यक धैर्य, साहस, जिद्द, मेहनत या सार्यांची तयारी आपोआप होते. मानवाचे ध्येय जेव्हा निश्चित होते तेव्हा तेथपर्यंत पोहोचण्याचा मार्गही त्याला दिसू लागतो. या गोष्टी आपल्यात दडलेल्या असतात. त्यांना केवळ बाहेर काढण्याची गरज असते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.
भाईसाब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला.
खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.
चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला.
खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.
उठता-बसता, खाता-पिता केवळ एव्हरेस्टचाच विचार ती करू लागली होती.
खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.
ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला ऑक्सिजन सिलेंडर अरुणिमाने वापरला.
कोण ते लिहा.
एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला - ______
कोण ते लिहा.
सर्वांत मोठा मोटिव्हेटर - ______
कोण ते लिहा.
फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन - ______
अरुणिमाच्या कणखर/धाडसी मनाची साक्ष देणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा.
अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवाबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा.
शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय.
अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवाबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा.
अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली.
पाठातून (गोष्ट अरुणिमाची) तुम्हांला जाणवलेली अरुणिमाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा.
- ______
- ______
- ______
- ______
- ______
‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रा’ तील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा.
(अ) ______
(आ) ______
(इ) ______
(ई) ______
तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) आकृती पूर्ण करा. (२)
| अरुणिमाने डॉक्टर व सहकार्यांना दिलेला धीर |
| ↓ |
| ____________ |
|
बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भूलतज्ज्ञ होता ना मला देण्यासाठी पुरेसे रक्त. सचिंत झालेल्या डॉक्टर व सहकार्यांना मीच धीर दिला, 'डॉक्टर, नाहीतरी माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे. आता भूल न देताच तुम्ही तो कापलात तरी चालेल.' डॉक्टर व त्यांच्या सहकार्यांनी स्वत:चे एक युनिट रक्त मला दिले आणि माझ्यादेखतच माझा पाय कापला गेला. इकडे मी जीवनमरणाच्या सीमारेषेवर होते; पण हॉस्पिटलबाहेरच्या जगात एक वेगळेच नाट्य घडत होते. 'फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन युवती सात तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली' ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरलेली. तत्कालीन क्रीडामंत्र्यांनी मला दिल्लीच्या 'एम्स' मध्ये (AIIMS) हलवले, राष्ट्रीय खेळाडू असल्याने अत्युच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या... पण... पण शल्य एकच होतं, की प्रसारमाध्यमांमध्ये वाटेल त्या वावड्या उठत होत्या. 'अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेतून खाली उडी मारली' इथपासून ते 'अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला', इथपर्यंत काहीही छापून येत होतं. तब्बल चार महिने 'एम्स' मध्ये (AIIMS) राहिल्यानंतर, शारीरिक जखमांवर मलमपट्टी झाली होती; पण या मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे होते. |
२) जोड्या जुळवा. (२)
| 'अ' गट | 'ब' गट |
| १. बरेलीचे हॉस्पिटल | अ. एम्स हॉस्पिटल |
| २. जीवनमरणाची | आ. अंतरंग घायाळ करणारे |
| ३. दिल्ली | इ. ना भूलतज्ज्ञ, ना पुरेसे रक्त |
| ४. मानसिक जखमा | ई. सीमारेषा |
३) स्वमत- (३)
’शारीरिक जखमा मलमपट्टीने बऱ्या होतात; पण मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे असतात“ या विधानाचा अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.
