Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.
चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला.
Advertisements
उत्तर
चोरांना लाथाबुक्क्यांचा प्रसाद दिला - धाडसी वृत्ती
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.

खालील कृतीतून अभिव्यक्त होणारे अरुणिमाचे गुण लिहा.
भाईसाब यांनी दिलेला सल्ला शिरोधार्य मानला.
कोण ते लिहा.
एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला - ______
कोण ते लिहा.
सर्वांत मोठा मोटिव्हेटर - ______
कोण ते लिहा.
अरुणिमाच्या कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घेणारे - ______
कोण ते लिहा.
फुटबॉल आणि व्हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियन - ______
अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवाबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा.
शरीराला जखमा झाल्यामुळे बहुधा अरुणिमाच्या डोक्यावरही परिणाम झालेला दिसतोय.
अरुणिमाविषयी उठलेल्या खालील अफवाबाबत तुमची प्रतिक्रिया लिहा.
अरुणिमाकडे प्रवासाचे तिकीट नव्हते म्हणून तिने रेल्वेतून उडी मारली.
पाठातून (गोष्ट अरुणिमाची) तुम्हांला जाणवलेली अरुणिमाची स्वभाव वैशिष्ट्ये लिहा.
- ______
- ______
- ______
- ______
- ______
‘नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रा’ तील अरुणिमाचे खडतर अनुभव लिहा.
(अ) ______
(आ) ______
(इ) ______
(ई) ______
‘आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं’, या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
‘प्रत्येकामध्ये एक जिद्दी अरुणिमा असते’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.
तुमच्या मनातील एव्हरेस्ट शोधा आणि शब्दबद्ध करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) उत्तरे लिहा. (२)
- भाईसाबनी अरुणिमाला दिलेला सल्ला -
- अरुणिमाला या खेळात नॅशनल चॅम्पियनशिप मिळाली -
| (बहिणीचे पती) हेच काय ते आमच्या कुटुंबातले महत्त्वाचे निर्णय घेणारे. खेळांवर अतोनात प्रेम करणाऱ्या कुटुंबात मी जन्मले हे माझे अहोभाग्य; पण फुटबॉल आणि हॉलीबॉलची नॅशनल चॅम्पियनशिप मिळाल्यावर 'आता सीआयएसएफ (CISF) ची नोकरी मिळते का बघ, म्हणजे खेळाशी जोडलेली राहशील', हा भाईसाबनी दिलेला सल्ला मी शिरोधार्य मानला. त्यानुसार नोकरीसाठी अर्ज केला नि 'कॉल लेटर' आले देखील; पण फॉर्ममध्ये नेमकी माझी जन्मतारीखच चुकवलेली होती. हा घोळ निस्तरण्यासाठी दिल्लीला जाणे भाग होते. ११ एप्रिल, २०११ चा हा दिवस. लखनऊ स्टेशन गर्दीनं फुललेलं. पद्मावती एक्सप्रेसमध्ये कसेबसे चढत गर्दीतूत मुसंडी मारत शिताफीने मी कॉर्नर सीट पटकावली. गाडीने वेग घेतला आणि माझे विचारचक्र सुरू झाले. 'बस... एवढे कागदपत्रांचे काम झाले, की झालेच आपले पक्के.' अचानक माझे लक्ष वेधून घेतले ते मला घेरून उभ्या असणाऱ्या तरुणांनी. त्यांचे लक्ष माझ्या गळ्यातल्या सोन्याच्या चेनवर होते; पण मीही काही कच्च्या गुरूची चेली नव्हते. त्यांनी डाव साधण्याचा प्रयत्न करताच जेवढी होती नव्हती तेवढी ताकद एकवटून मी म़ाझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाला लाथाबुक्क्यांचा प्रसाद द्यायला सुरुवात केली. आश्चर्य म्हणजे, त्या डब्यातल्या प्रत्येकजण 'अन्यायाविरुद्ध लढणं हे जणू पाप आहे', अशा चेहऱ्यानं मख्खपणे जागेवरच बसून राहिला. अखेर चोरांच्या सहनशक्तीचा अंत झाला. रात्रीच्या भयाण अंधारात माझे दोन्ही हात-पाय धरून त्या नराधमांनी मला चक्क गाडीतून बाहेर फेकून दिलं. शेजारून जाणाऱ्या एका भरधाव रेल्वेवर मी आदळले आणि तिच्या वेगामुळे आणखी जोरात दोन धावपट्ट्यांच्या मध्ये उडून पडले. 'अरुणिमा, रेल्वे येतेय आणि तुझे पाय ट्रॅकवरून बाजूला घे', हा अंतर्मनातला संदेश मेंदूपर्यंत पोचेतोवर खूप उशीर झाला होता. |
२) एका शब्दात माहिती लिहा. (१)
i) अरुणिमाचा प्रवास
- प्रवासाचा दिवस-
- स्टेशन व रेल्वेगाडी-
ii) कारण लिहा. (१)
रेल्वेतील प्रवासी मख्ख चेहऱ्याने जागेवर बसून राहिले...
३) स्वमत- (३)
तुमचा ’रेल्वेप्रवासातील एखादा अनुभव“ तुमच्या शब्दात स्पष्ट करा.
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१) आकृती पूर्ण करा. (२)
| अरुणिमाने डॉक्टर व सहकार्यांना दिलेला धीर |
| ↓ |
| ____________ |
|
बरेलीच्या त्या हॉस्पिटलमध्ये ना भूलतज्ज्ञ होता ना मला देण्यासाठी पुरेसे रक्त. सचिंत झालेल्या डॉक्टर व सहकार्यांना मीच धीर दिला, 'डॉक्टर, नाहीतरी माझ्या पायाची चाळण झालेलीच आहे. आता भूल न देताच तुम्ही तो कापलात तरी चालेल.' डॉक्टर व त्यांच्या सहकार्यांनी स्वत:चे एक युनिट रक्त मला दिले आणि माझ्यादेखतच माझा पाय कापला गेला. इकडे मी जीवनमरणाच्या सीमारेषेवर होते; पण हॉस्पिटलबाहेरच्या जगात एक वेगळेच नाट्य घडत होते. 'फुटबॉल आणि व्हॉलीबॉल चॅम्पियन युवती सात तास जखमी अवस्थेत उपचाराविना पडून राहिली' ही बातमी प्रसारमाध्यमांनी उचलून धरलेली. तत्कालीन क्रीडामंत्र्यांनी मला दिल्लीच्या 'एम्स' मध्ये (AIIMS) हलवले, राष्ट्रीय खेळाडू असल्याने अत्युच्च दर्जाच्या सुविधा मला मिळाल्या... पण... पण शल्य एकच होतं, की प्रसारमाध्यमांमध्ये वाटेल त्या वावड्या उठत होत्या. 'अरुणिमाकडे प्रवासाचं तिकीट नव्हतं म्हणून तिने रेल्वेतून खाली उडी मारली' इथपासून ते 'अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला', इथपर्यंत काहीही छापून येत होतं. तब्बल चार महिने 'एम्स' मध्ये (AIIMS) राहिल्यानंतर, शारीरिक जखमांवर मलमपट्टी झाली होती; पण या मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे होते. |
२) जोड्या जुळवा. (२)
| 'अ' गट | 'ब' गट |
| १. बरेलीचे हॉस्पिटल | अ. एम्स हॉस्पिटल |
| २. जीवनमरणाची | आ. अंतरंग घायाळ करणारे |
| ३. दिल्ली | इ. ना भूलतज्ज्ञ, ना पुरेसे रक्त |
| ४. मानसिक जखमा | ई. सीमारेषा |
३) स्वमत- (३)
’शारीरिक जखमा मलमपट्टीने बऱ्या होतात; पण मानसिक जखमांचे घाव अंतरंग घायाळ करणारे असतात“ या विधानाचा अर्थ स्वत:च्या शब्दांत लिहा.
