Advertisements
Advertisements
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा:
| मुद्दे | योगी सर्वकाळ सुखदाता |
| (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवियित्री - | |
| (2) प्रस्तुत कवितेचा विषय - | |
| (3) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा - | जन निववी श्रवणकीर्तनें । निजज्ञानें उद्धरी ।। |
| (4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण - | |
| (5) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा - | (i) उदक - |
| (ii) मधुर - | |
| (iii) तृषित - | |
| (iv) क्षाळणे - |
Concept: undefined >> undefined
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा:
| मुद्दे | हिरवंगार झाडासारखं |
| (1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवियित्री - | |
| (2) प्रस्तुत कवितेचा विषय - | |
| (3) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा - | झाड बसते ध्यानस्थ ऋषिसारखं मौन व्रत धारण करून तपश्चर्या करत... |
| (4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण - | |
| (5) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा - | (i) मौन - |
| (ii) मुकाट - | |
| (iii) वस्त्र - | |
| (iv) ब्राहू - |
Concept: undefined >> undefined
Advertisements
उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.
१. कोण ते लिहा. (२)
- दारिद्रयाशी संघर्ष करणारी - ______
- मनाने श्रीमंत असणारे - ______
- अनवाणी शाळेत जाणारे - ______
- लेखकाच्या कुटुंबाला मदत करणारे - ______
|
शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला, की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळकरी वयात आपुलकीनं संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, शिर्के सर या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहेत. आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये ‘मालती निवासा’तील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहात होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. दारिद्रयाशी संघर्ष करणारी. माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला; पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने ‘शाळेत कसा जाऊ?’ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं! पण माझ्या आईनं धीर सोडला नाही. ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती बेताचीच होती; पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं. |
२. योग्य जोड्या लावा: (२)
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (i) युनियन हायस्कूल | (i) देशमुख गल्ली |
| (ii) दक्षिण गोवा | (ii) महापालिकेची प्राथमिक शाळा |
| (iii) ‘मालती निवास’ | (iii) गिरगाव |
| (iv) खेतवाडी | (iv) माशेल |
३. व्याकरण: (२)
खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांची जात ओळखून लिहा:
- ती खचली नाही.
- आर्थिक परिस्थिती पूर्णपणे, खालावलेली.
४. स्वमत: (२)
‘आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते,’ हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
उतारा वाचून सूचनेनुसार कृती करा.
१. आकृती पूर्ण करा. (२)

|
आनंदवनामध्ये बाबांनी कुष्ठरोग्यांना स्वाभिमानाने जगायला शिकवले, राहण्यासाठी झोपड्या बांधणे. अन्नधान्यासाठी शेती करणे यापासून अनेक पूरक उद्योग त्यांनी सुरू केले. अर्थात् ही प्रक्रिया सोपी नव्हती अनेक अडचणी होत्या. पण त्यावर मात करत बाबांनी भंगलेल्या शरीरांना, खचलेल्या मनांना जगण्याची उभारी दिली. ताठ मनाने जगण्याची प्रेरणा दिली. आनंदवनात बाबांनी कुष्ठरोग्यांवर उपचार केले, त्यांना निवास उपलब्ध करून दिला. शिवाय त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी साधने उपलब्ध करून दिली त्यामुळे त्यांना कष्टाची भाकरी मिळवता आली. त्यांच्या कलागुणांना वाव दिला त्यामुळे दैवाने मोडतोड केलेल्या चेहऱ्यांवर हास्य उमलले. हे हास्य समाधानाचे, आत्मविश्वासाचे होते. बोटं झडलेल्या थिट्या हातांना कामाची सवय लागावी आणि स्वाभिमानाचा ताठ कणा. लाभावा यासाठी ‘आनंदवनाची’ धडपड असते. आनंदवन उभारताना बाबांनी आतोनात कष्ट घेतल त्यामुळेच गेली सहा दशके तिथे महारोगाने, अंधत्वाने, अपंगत्वाने झाकोळून गेलेली जीवने उजळून निघाली. जन्माला येतानाच उपेक्षा घेऊन आलेल्या जीवांमध्ये ‘सुंदर मी होणार’ यासोबत ‘सुंदर मी करणार’ हा मंत्र आनंदवनने जोपासला. |
२. योग्य जोड्या लावा: (२)
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (i) भंगलेली | (i) भाकर |
| (ii) खचलेली | (ii) जीवने |
| (iii) कष्टाने मिळवलेली | (iii) मने |
| (iv) झाकोळलेली | (iv) शरीरे |
३. व्याकरण:
(i) खालील वाक्यांतील विशेषणे शोधून लिहा: (१)
(अ) त्यांना ताठ मनाने जगण्याची प्रेरणा मिळाली.
(ब) त्यांना स्वतःच्या पायावर उभे केले.
(ii) खालील सर्वनामांचा वाक्यात उपयोग करा: (१)
(अ) तू
(ब) तुझा
४. स्वमत: (२)
‘सुंदर मी करणार’ या आनंदवनाने जोपासलेल्या मंत्राचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.
| मुद्दे | ‘औक्षण’ |
| (१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
| (२) कवितेचा रचनाप्रकार - | |
| (३) कवितेचा काव्यसंग्रह - | |
| (४) कवितेचा विषय - | |
| (५) कवितेतील आवडलेली ओळ - | |
| (६) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे - |
Concept: undefined >> undefined
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.
| मुद्दे | ‘हिरवंगार झाडासारखं’ |
| (१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
| (२) कवितेचा रचनाप्रकार - | |
| (३) कवितेचा काव्यसंग्रह - | |
| (४) कवितेचा विषय - | |
| (५) कवितेतील आवडलेली ओळ - | |
| (६) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे - |
Concept: undefined >> undefined
खालील ओळींचे रसग्रहण करा.
दुनियेचा विचार हरघडी केला,
अगा जगमय झालो.
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे,
याच शाळेत शिकलो.
Concept: undefined >> undefined
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. कोण ते लिहा. (2)
- ‘माशेल’ गाव सोडणारे - ______
- वयाच्या सहाव्या वर्षी वारणारे - ______
|
आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले. तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे वडील वारले आणि आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये ‘मालती निवासा’तील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहात होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली. दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला; पण कोणतीच फी भरणे शक्य नसल्याने ‘शाळेत कसा जाऊ?’ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं! पण माझ्या आईनं धीर सोडला नाही. ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. त्यातच माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती बेताचीच होती; पण इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं. |
२. आकृती पूर्ण करा. (2)

३. स्वमत. (3)
‘शिक्षण घेण्यासाठी ‘गरिबी’ हा अडसर ठरत नाही’, या विधानाबाबत तुमचे मत लिहा.
Concept: undefined >> undefined
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. कारणे लिहा. (2)
- दुसऱ्या मुलांच्या हातांत खेळणी पाहून लेखकाला लहानपणी त्यांचा हेवा वाटत असे, कारण ______
- लहानपणी लेखकाच्या पाठीवर घरातल्यांकडून धम्म कलाडू व चापटपोळ्यांचा यथेच्छ वर्षाव व्हायचा कारण ______
| माझ्या बालमित्रांनो, मी तुमच्याएवढा होतो तेव्हा अगदी तुमच्यासारखाच खेळकर, खोडकर व उपद्व्यापी होतो! माझा जन्म पुण्यातच एका गरीब कुटुंबात झाला. माझे वडील त्या वेळेस पोलीसखात्यामध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते. तेव्हा साहजिकच गरीब कुटुंबाच्या वाट्याला येणारे सारे कष्ट व दु:खे आम्ही भोगत होतो. अशा परिस्थितीत वडिलांना आम्हां मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्यच नव्हते. दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून आम्हांला त्यांचा हेवा वाटत असे. तरी पण गल्लीतील मुलांना जमा करून उन्हातान्हात विटीदांडू खेळणे, पतंग उडवणे, कधीमधी कॅम्पमधील कॅनॉलमध्ये चोरून पोहणे; कैऱ्या, पेरू पाडून त्यांचा यथेच्छ स्वाद घेणे, घरात जळणासाठी आणलेल्या लाकडांतूनच बॅट व स्टंप तयार करणे व कुठून तरी जुना पुराणा बॉल पैदा करून क्रिकेट खेळणे असा माझा दिवसभराचा कार्यक्रम असायचा. संध्याकाळी घरी येईपर्यंत माझ्याबद्दल बऱ्याच तक्रारी आईच्या कानांवर आलेल्या असायच्या. दिवसभराच्या खेळाने भूक तर खूपच लागलेली असायची. घरात पाऊल ठेवतो न ठेवतो तोच पाठीवर धम्मकलाडू व चापटपोळ्यांचा यथेच्छ वर्षाव व्हायचा. मग मी घरात एका कोपऱ्यात जाऊन रडत बसायचो! तिथेच झोप लागायची आणि जाग यायची ती आईच्या प्रेमळ कुशीत. |
२. आकृती पूर्ण करा. (2)

३. स्वमत. (3)
तुमच्या मते लेखकाच्या मनात पेरले गेलेले क्रिकेटचे बीज कसे उगवले ते लिहा.
Concept: undefined >> undefined
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. योग्य जोड्या लावा. (2)
| ‘अ’ गट | ‘ब’ गट | |
| (i) | शेती | प्रकाश |
| (ii) | सूर्य | वस्त्र |
| (iii) | वृक्ष | हंगाम |
| (iv) | पैठणी | ओंबी |
| (v) | भात | पाने |
| शेतीभातीचे ते दिवस व कापणीचा हंगाम, अगोदरच त्या गावाला झाडी अतोनात, तशात प्रातःकाळचा तो वेळ, सूर्य नुकताच वर आला होताच त्याचे कोवळे ऊन पावसाने आपल्या स्वच्छ पाण्याने स्नान घालून टवटवीत केलेल्या वृक्षांची हिरवीगार पाने अधिक सतेज दिसत होती. सभोवार कणसांवर आलेली विस्तीर्ण शेतेच दृष्टीस पडत होती. आमच्या पायांपासून तो थेट समोरच्या डोंगरापर्यंत पिवळसर हिरव्या रंगाचे गालिचेच पसरले आहेत की काय असा भास होई. मधून-मधून नाचण्यांची हिरवीगार शेत दिसत, त्यामुळे असा भास होई की, सृष्टिदेवी हिरव्या बुट्टयांनी युक्त अशी पिवळी पैठणीच नेसून विहार करीत आहे. आत दाणा झाल्याकारणाने शेतातील भाताच्या ओंब्या अगदी वाकून गेल्या होत्या. नाना तऱ्हेचे व चित्रविचित्र रंगांचे पक्षी मंजूळ गायन करीत इकडून-तिकडे उडून जाताना दृष्टीस पडत आणि शेतामधून काम करणारी माणसेही मधून-मधून दिसत, शीतल व सुवासिक फुलांच्या वासाने सुगंधित असा वारा झुळझुळ वाहत होता. तो शेतावरून वाहताना समुद्रावर वर खाली होणाऱ्या लाटांप्रमाणे त्या शेतांची शोभा दिसत होती. वारा लागून त्या ओंब्याचा जो सळसळ आवाज होई तो किती मनोहर! |
२. एका शब्दात उत्तेर लिहा. (2)
- पायापासून डोंगरापर्यंत पसरलेले पिवळसर हिरव्या रंगाचे - ______
- मंजूळ गायन करणारे - ______
Concept: undefined >> undefined
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. चौकटी पूर्ण करा. (2)
- दारिद्र्याकडे गहाण पडलेले - ______
- कवीचा जवळचा मित्र - ______
|
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले. हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो |
२. आकृती पूर्ण करा. (2)

३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)
- फुलले -
- धुंद -
- झोतभट्टी -
- पोलाद -
४. काव्यसौंदर्य: (2)
‘हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे’, या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधार कृती सोडवा.
| मुद्दे | ‘स्वप्न करू साकार’ |
| (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
| (ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
| (iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘फुलामुलांतून हसतो श्रावण। मातीचे हो मंगल तनमन।।’ |
| (iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
| (v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) संपदा - |
| (ii) बळकट - | |
| (iii) उत्क्रांती - | |
| (iv) चैतन्य - |
Concept: undefined >> undefined
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधार कृती सोडवा.
| मुद्दे | ‘दोन दिवस’ |
| (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
| (ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
| (iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘झोतभट्टीत शेकावे पोलाद। तसे आयुष्य छान शेकले।।’ |
| (iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
| (v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) वाळविले - |
| (ii) पेलावे - | |
| (iii) हरघडी - | |
| (iv) अगा - |
Concept: undefined >> undefined
(१) उतारा वाचून त्यावरील कृती करा.
(अ) वैशिष्ट्ये लिहा.

| विद्वत्ता कोणाकडेही असो ती क्षणात मिळवता येणारी बाब नाही. ज्याप्रमाणे झाडाची मुळे एकदम खोल-खोल जाऊ शकत नाहीत, त्यासाठी महिने-वर्षे लागतात; परंतु जेवढी खोल मुळे असतात, तेवढा त्या झाडाचा पाया भक्कम असतो. तसेच विद्वत्तेचेही आहे. जेवढ्या प्रयत्नाने ती मिळवाल तेवढे प्रभावी तुमचे व्यक्तिमत्त्व असेल. आपल्याला एकदाच विजेसारखे चमकायचे, की सूर्यासारखे सातत्याने प्रकाशित राहायचे, हे ठरवायचे आहे. विद्वत्ता ही अशी बाब आहे, जी केवळ वेळेच्या सदुपयोगाने मिळते. बरे, तिला कोणी तुमच्याकडून काढून किंवा चोरून घेऊ शकत नाही. ती मिळवण्यात खूप धनसंपत्ती खर्ची घालावी लागत नाही; पण एकदा ती तुमच्याजवळ आली, की संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशात दिपून जाते. आपला कोणी सन्मान करावा अशी भावनाच मनातून निघून जाते, सर्वजण तुमच्या सहवासात येण्यासाठी, तुमचे आदरातिथ्य करण्यासाठी आतुर असतात. थोडक्यात, विद्वत्ता तुम्हांला सर्व मिळवून देते, ज्याची तुम्ही स्वप्नातही अपेक्षा केलेली नसते. |
(आ) खालील घटनेचा किंवा कृतीचा परिणाम लिहा.
| घटना/कृती | परिणाम |
| (१) झाडाची मुळे खोल जाणे. | (१) ____________ |
| (२) प्रयत्नांनी विद्या मिळवणे. | (२) ____________ |
(इ) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
(१) विजेसारखे चमकणे -
(२) सूर्यासारखे प्रकाशणे -
(२) खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांची जात ओळखा.
(१) संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशाने दिपून जाईल.
(३) व्यक्तीला विद्या प्राप्त झाल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी मिळू शकतात ते स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. कोण ते लिहा. (2)
- आवाज काढून पिल्लांना मार्ग दाखवणारी - ______
- घसरून पाण्यांत धपकन पडणारे - ______
|
वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरे नर वाघ, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूंचा राबता होताच. त्यामुळं तिला ही खबरदारी घेणं आवश्यकच होतं. वाघांच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो. त्यामुळं वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडं झेपावली होती. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बांबूंमधून मला वाघीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती; पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. त्यांतील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली; पण तिथून घसरल्यानं ते धपकन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीनं मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली; पण पिल्लांना त्याच्याशी काहीच देणं-घेणं नव्हतं. त्यांचा आईच्याभोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला. साधारणत: कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही पाच महिन्यांची पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात, तशीच ही खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनं हळूच ‘ऑऽ वऽ’ असा आवाज केला. हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. हिनं जंगलात कुठंतरी नक्कीच एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असावी; पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिल्लापर्यंत आणणं शक्य नसतं. त्यामुळं पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडं घेऊन जात होती. या चार पिल्लांसोबतच स्वत:चं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती-कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. त्या कलेत ही चांगली पारंगत होती. |
२. कृती पूर्ण करा. (2)

३. स्वमत (3)
उताऱ्याच्या आधारे वाघिणीने घेतलेली पिल्लांची काळजी याबाबत तुम्हाला दिसून आलेले मुद्दे सांगा.
Concept: undefined >> undefined
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. का ते लिहा. (2)
- भावे सर फक्त भौतिकशास्तराचे शिक्षकच नव्हते, कारण ______
- माशेलकरांना जीवनात भरपूर यश व कीर्ती मिळाली, कारण ______
|
याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले. ते आम्हांला भौतिकशास्त्र शिकवत. विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही, तर त्या विषयाची गाेडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान शिकवलं. एके दिवशी शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला. भिंगाच्या साहाय्यानं सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो हे त्यांनी दाखवलं आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, ‘‘माशेलकर, तुमची ऊर्जाशक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल.’’ एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला आणि दुसरीकडे विज्ञान समजलं. आयुष्याचं फार मोठं तत्त्वज्ञान मला भावे सरांच्या या शिकवणुकीतून गवसलं. त्यांना मी कसा विसरू शकेन? भावे सरांप्रमाणेच माझ्या शालेय आणि पुढील शैक्षणिक जीवनात जोशी सर, शिर्के सर, श्री. मालेगाववाला या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीसाठी उत्तम मार्गदर्शन केलं, संस्कार केले. आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली. संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला. जगण्याचे भान दिले. आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे, प्रचंड दारिद्र्याचा सामना करतानाचे क्षण न क्षण आठवतात आणि त्याचवेळी माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे ‘माझे संस्कार केंद्र’ डोळ्यांसमोर उभे राहते. मी पुन्हा मनोमनी शाळेत जाऊ लागतो. |
२. आकृती पूर्ण करा. (2)

३. स्वमत (3)
लेखकांना शैक्षणिक जीवनात मोलाचे साहाय्य करणाऱ्या व्यक्तींबद्दलचे मत स्पष्ट करा.
Concept: undefined >> undefined
उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. योग्य जोड्या लावा. (2)
| ‘अ’ गट | ‘ब’ गट | |
| (i) | हिरा | विद्वान |
| (ii) | शिल्पकार | श्रोतृगण |
| (iii) | विषयतज्ज्ञ | खाण |
| (iv) | भाषण | प्रबुद्ध |
| (v) | प्रौढ | शिल्पकला |
| मनुष्याच्या अंगी कोणताही गुण असला तरी परिश्रमाखेरीज व अभ्यासाखेरीज त्याचे तेज कधीही पडावयाचे नाही. खाणीतून नुकताच खणून काढलेला हिरा जसा मुळात तेजस्वी नसून शिल्पकारांच्या संस्कार प्रयोगांची त्याला खास अपेक्षा असते त्याचप्रमाणे गुणीजनांच्या अंगी असणारी कलाही शिक्षणाखेरीज पूर्वत्वाने कधी प्रकट होत नसते. असो, तर वक्तृत्व हे जरी मनुष्याच्या अंगी जन्मसिद्धच असले पाहिजे, तरी ते तसे कोणाचे ठायी असतानाही विद्वत्तेखेरीज ते पूर्ण शोभा कधीही द्यावयाचे नाही. विद्वान व रसिक लोकांना तुष्ट करून त्यांची मते आपल्या भाषणाने ज्यास वळवावयाची असतील त्याने भाषाशुद्धता, अर्थसंगती, सुंदर व प्रौढ विचार मोठमोठया नामांकित काव्यांचे, नाटकांचे व इतिहासाचेही ज्ञान संपादन करून त्याच्याशी त्याने सतत परिचय केला पाहिजे. याखेरीज इतर अनेक विषयांची माहिती त्याला असली तर चांगलीच कारण दृष्टान्त वगैरे देण्यास व भाषणास वैचित्रय व मनोरंजकता आणण्यास ती फार उपयोगी पडते. आणखी एक प्रभावी साधन म्हणजे अनुकरण. कोणताही गुण साध्य करून घेण्यास अनुकरणासारखा दुसरा उत्तम मार्ग नाही. |
२. एका शब्दात उत्तेर लिहा. (2)
- गु्णीजनांच्या अंगी असणारी कलेला अपेक्षा असते - ______
- खाणीतून निघणारे - ______
Concept: undefined >> undefined
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. चौकटी पूर्ण करा. (2)
- दोन दिवस वाट पाहण्यात गेले; तर दोन गेले - ______
- भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी झाली - ______
|
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले. हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो |
२. आकृती पूर्ण करा. (2)

३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)
- गहाण -
- डोईवर -
- झेतभट्टी -
- धुंद -
४. काव्या सौंदर्य: (2)
“दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलों”
Concept: undefined >> undefined
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
| मुद्दे | ‘औक्षण’ |
| (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
| (ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
| (iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘तुझ्या शौर्यगाथे पुढे। त्याची केवढीशी शान॥’ |
| (iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
| (v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) औक्षण - |
| (ii) आसव - | |
| (iii) तोफ - | |
| (iv) दीन - |
Concept: undefined >> undefined
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
| मुद्दे | ‘स्वप्न करू साकार’ |
| (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
| (ii) प्रस्तुत कवितेचा विषय | |
| (iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा | ‘घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।’ |
| (iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
| (v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा | (i) शुभंकर - |
| (ii) उज्जवल - | |
| (iii) विभव - | |
| (iv) अमुचा - |
Concept: undefined >> undefined
