Definitions [8]
व्याख्या लिहा.
बहुविधता
स्वत:ची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या, अविभेदित अशा प्राथमिक स्वरूपाच्या मूलपेशींमधील, ज्या गुणधर्मामुळे त्या सर्व प्रकारच्या मानवी पेशी निर्माण करू शकतात, त्या गुणधर्माला बहुविधता म्हणतात.
व्याख्या लिहा.
मूलपेशी
मूलपेशी या बहुपेशीय सजीवांच्या शरीरात असलेल्या विशिष्ट पेशी असून त्या शरीरातील इतर सर्व प्रकारच्या पेशींना जन्म देतात.
स्त्रीयुग्मक व पुंयुग्मक यांचे मिलन झाल्यानंतर जे युग्मनज बनते त्यापासून पुढील सजीव बनतो. वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव ‘पेशींचा एक गोळा’ असतो. त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात. या पेशींना मूलपेशी म्हणतात.
व्याख्या लिहा.
जैवतंत्रज्ञान
मानवी हिताच्या दृष्टिकोनातून कृत्रिमरित्या जनुकीय बदल आणि संकर घडवून सजीवांमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या तंत्राला जैवतंत्रज्ञान असे म्हणतात.
व्याख्या लिहा.
जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके
बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकाच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माच्या पिकांना जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात.
व्याख्या लिहा.
जनुकीय उपचार
जनुकीय उपचारात, बाधित कायिक पेशींना जनुकीयदृष्ट्या उन्नत करतात (म्हणजेच, बाधित जनुकाच्या जागी चांगल्या जनुकाचे रोपण केले जाते.)
व्याख्या लिहा.
लस
विशिष्ट रोगजंतू अथवा रोगाविरुद्ध कायमस्वरूपी अथवा काही कालावधीपुरती प्रतिकारक्षमता मिळवण्यासाठी दिलेले 'प्रतिजन' युक्त पदार्थ म्हणजे लस होय.
व्याख्या लिहा.
DNA फिंगरप्रिंट
प्रत्येक व्यक्तीच्या डी.एन.ए.ची जडणघडण एकमेव असते. त्यामुळे, कोणत्याही व्यक्तीच्या उपलब्ध डी.एन.ए. वरून त्या व्यक्तीची ओळख पटवणे शक्य होते. या पद्धतीला डी.एन.ए. फिंगरप्रिंट असे म्हणतात. या पद्धतीचा वापर गुन्हे निदान शास्त्र व बालकाच्या पित्याची ओळख करण्यासाठी केला जातो.
व्याख्या लिहा.
क्लोनिंग
क्लोनिंग म्हणजे एखादी पेशी किंवा अवयव किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे.
Important Questions [16]
- उती संवर्धनातील विविध प्रक्रिया दाखवणारी आकृती नावे देवून पूर्ण करा: खोड मूलारंभ
- शास्त्रीय कारणे लिहा. मानवी शरीरातील काही अवयव बहुमोल आहेत.
- मरणोत्तर ______ या मानवी अवयवाचे दान करता येते.
- रिकाम्या वर्तुळात योग्य उत्तर लिहा. मूलपेशीचे उपयोग
- अ. खालील आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दाखवली आहे? ब. या प्रक्रियेचे महत्त्व लिहा. क. या प्रक्रियेने कोणकोणत्या अवयवांचे प्रत्यारोपण करता येते?
- व्याख्या लिहा. मूलपेशी
- डी.एन.ए. फिंगरप्रिंटिंग या तंत्राचा वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात केला जातो?
- व्याख्या लिहा. क्लोनिंग
- जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके कशास म्हणतात? त्यांची कोणतीही दोन उदाहरणे दया.
- सहसंबंध ओळखा: इन्सुलिन : मधुमेह : : इंटरफेरॉन ______.
- व्याख्या लिहा. जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके
- डी.एन.ए. फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय?
- सहसंबंध ओळखून अपूर्ण सहसंबंध पूर्ण करा. श्वेतक्रांती : दुग्ध उत्पादन :: नीलक्रांती : _____
- पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे म्हणजे नीलक्रांती होय.
- कीडनाशक फवारणीसाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल?
- टिपा लिहा. औषधी वनस्पतींचे महत्त्व
Concepts [14]
- पेशी विज्ञान (Cytology)
- मूलपेशी (Stem Cells)
- जैवतंत्रज्ञान
- जैवतंत्रज्ञानाचे व्यावहारिक उपयोग
- कृषी विकासातील महत्त्वाचे टप्पे
- हरितक्रांती (Green revolution)
- श्वेतक्रांती (White revolution)
- नीलक्रांती (Blue revolution)
- खते (Fertilizers)
- कीडनाशके (Insecticides)
- सेंद्रिय शेती (Organic farming)
- मधुमक्षिका पालन (Apiculture)
- औषधी वनस्पती लागवड
- फळप्रक्रिया उद्योग
