Advertisements
Advertisements
प्रश्न
विदेशी व्यापाराचे प्रकार स्पष्ट करा.
स्पष्ट कीजिए
Advertisements
उत्तर
- आयात व्यापार: एका देशाने दुसर्या देशाकडून केलेली वस्तू व सेवांची खरेदी म्हणजे आयात व्यापार होय किंवा स्वदेशाकडून परदेशांतील वस्तू व सेवांचा केला गेलेला. अंत:प्रवाह म्हणजे आयात व्यापार होय. उदा., भारत इराक, कुवेत, सौदी अरेबिया या देशांतून पेट्रोलियमची आयात करतो.
- निर्यात व्यापार: एका देशाने दुसऱ्या देशाला केलेली वस्तू व सेवांची विक्री म्हणजे निर्यात व्यापार होय किंवा एका देशातून दुसऱ्या देशांत केला जाणारा वस्तूंचा बहिर्प्रवाह होय. उदा., भारत चीन, हाँगकाँग, सिंगापूर इत्यादी देशांना चहा, तांदूळ, ताग यांसारख्या वस्तूंची निर्यात करतो.
- पुननिर्यात व्यापार: वस्तूची आयात करून त्यावर प्रक्रिया करून जेव्हा ती निर्यात केली जाते तेव्हा त्यास पुनर्निर्यात व्यापार म्हणतात. उदा., जपानकडून रेडिओ, धुलाई यंत्र, दूरदर्शन यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशांतून केली जाते आणि त्यावर प्रक्रिया करून जगातील विविध देशांना विकले जाते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Board Question Paper
