Advertisements
Advertisements
प्रश्न
उपयोगितेचे कोणतेही चार वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
विस्तार में उत्तर
Advertisements
उत्तर
उपयोगितेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
- सापेक्ष संकल्पना: उपयोगिता ही स्थल व कालसापेक्ष संकल्पना आहे. ती स्थलपरत्वे व कालपरत्वे बदलत जाते. उदा., हिवाळ्यात लोकरीच्या कपड्यांमध्ये जास्त उपयोगिता जाणवते. समुद्रकाठापेक्षा बांधकामाच्या ठिकाणी वाळूमध्ये जास्त उपयोगिता जाणवते.
- नैतिकदृष्ट्या तटस्थ: उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार नसतो. ही संकल्पना नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. वस्तूने चांगले-वाईट, योग्य-अयोग्य, असा कोणताही विचार न करता व्यक्तीची कोणतीही गरज पूर्ण करायला हवी. उदा., सुरी किंवा चाकूचा वापर फळे किंवा भाजीपाला कापण्यासाठी गृहिणीकडून केला जातो. तर या वस्तूचा वापर एखाद्याला इजा करण्यासाठीही केला जातो. दोन्ही गरजा वेगळ्या आहेत. परंतु एकाच वस्तूचा वापर करून त्या भागवल्या जातात. म्हणून उपयोगिता नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे.
- उपयोगिता व उपयुक्तता यांत फरक: उपयोगिता म्हणजे वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरजा भागविण्याची क्षमता आहे, तर उपयुक्तता म्हणजे वस्तूचे उपयोगमूल्य होय. उदा., उपभोक्त्याला दुधामध्ये उपयोगिता व उपयुक्तताही जाणवते. मात्र व्यसनी व्यक्तीला दारूमध्ये उपयोगिता जाणवते; परंतू उपयुक्तता जाणवत नाही.
- उपयोगिता व आनंद यांत फरक: वस्तूमध्ये उपयोगिता असली तरी त्यापासून उपभोक्त्याला आनंद मिळतोच असे नाही. उदा., आजारी व्यक्तीला इंजेक्शनमध्ये उपयोगिता जाणवते. कारण त्यामुळे आजार बरा होतो. पण त्यापासून त्याला आनंद मिळतोच असे नाही.
shaalaa.com
उपयोगिता
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
संबंधित प्रश्न
मातीपासून खेळणी : ______ :: लोकरीचे कपडे : स्थल उपयोगिता
वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते, त्यामुळे निर्माण होणारी उपयोगिता.
विसंगत शब्द ओळखा.
उपयोगितेचे प्रकार:
विधान (अ): उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
तर्क विधान (ब): उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार नसतो.
फरक स्पष्ट करा.
काल उपयोगिता व स्थल उपयोगिता
खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा.
मनिषाने वही पेनाचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली.
रक्तपेढी (Blood Bank) हे याचे उदाहरण आहे.
- स्थल उपयोगिता
- ज्ञान उपयोगिता
- सेवा उपयोगिता
- काल उपयोगिता
सहसंबंध पूर्ण करा:
रूप उपयोगिता : फर्निचर : : ______ : डॉक्टर
