Advertisements
Advertisements
प्रश्न
तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा.
Advertisements
उत्तर
घारापुरी (एलिफंटा) बेटाच्या क्षेत्रभेटीचा अहवाल.
(१) क्षेत्रभेटीचा हेतू :
(अ) 'समुद्री बेट' या संकल्पनेचा प्रत्यक्ष भेटीतून अभ्यास करणे.
(आ) घारापुरी (एलिफंटा) या बेटाविषयी सविस्तर माहिती मिळवणे.
(२) क्षेत्रभेटीद्वारे संकलित केलेली माहिती:
(अ) घारापुरी (एलिफंटा) या बेटाचे स्थान:
- सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेला जमिनीचा भूभाग, म्हणजे 'बेट' होय.
- घारापुरी (एलिफंटा) हे बेट दक्षिण मुंबईतील ट्रॉम्बेजवळील खाडीतील एक लहानसे बेट आहे.
- घारापुरी (एलिफंटा) या बेटाचे स्थान रायगड जिल्ह्यात आहे.
(आ) घारापुरी (एलिफंटा) या बेटाचे क्षेत्रफळ:
- समुद्राच्या भरतीच्या वेळी घारापुरी (एलिफंटा) या बेटाचे क्षेत्रफळ सुमारे १० चौरस किमी असते.
- समुद्राच्या ओहोटीच्या वेळी घारापुरी (एलिफंटा) या बेटाचे क्षेत्रफळ सुमारे १६ चौरस किमी असते.
(३) घारापुरी (एलिफंटा) या बेटावर पोहोचण्यासाठी वाहतुकीची साधने:
(अ) घारापुरी (एलिफंटा) या बेटावर पोहोचण्यासाठी प्रामुख्याने मुंबईतील 'गेटवे ऑफ इंडिया' पासून प्रवासी बोटीने जावे लागते.
(आ) मुंबईतील 'गेटवे ऑफ इंडिया' पासून घारापुरी (एलिफंटा) या बेटावर पोहोचण्यासाठी सुमारे एक तासाचा कालावधी लागतो.
(इ) या प्रवासादरम्यान मुंबईतील टोलेजंग इमारती, मोठमोठ्या व्यापारी नौका, सीगल पक्ष्यांचे थवे दिसतात.
(४) घारापुरी (एलिफंटा) या बेटावरील पर्यटकांची आकर्षणे:
(अ) घारापुरी (एलिफंटा) या बेटावर पाषाणात खोदलेली अनेक ऐतिहासिक लेणी आढळतात.
(आ) ही लेणी जगप्रसिद्ध आहेत. येथे दरवर्षी अनेक भारतीय व परदेशी पर्यटक भेट देतात.
(५) घारापुरी (एलिफंटा) या बेटावरील लोकजीवन:
(अ) घारापुरी (एलिफंटा) या बेटावर सुमारे १५०० ते २००० लोकांची वस्ती आढळते.
(आ) घारापुरी (एलिफंटा) या बेटावरील लोक मुख्यतः पर्यटन, भातशेती, बोटींची दुरुस्ती व मासेमारी या व्यवसायांत गुंतलेले आढळतात.
(६) घारापुरी (एलिफंटा) या बेटावरील समस्या:
(अ) घारापुरी (एलिफंटा) या बेटावरील स्थानिकांना व पर्यटकांना काही प्रसंगी पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या समस्येस सामोरे जावे लागते.
(आ) घारापुरी (एलिफंटा) या बेटावर पुरेशा प्रमाणात शैक्षणिक व वैद्यकीय सेवा उपलब्ध नाहीत.
संबंधित प्रश्न
कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
क्षेत्रभेटीदरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल?
क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल?
थोडक्यात उत्तरे दया.
क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा.
क्षेत्रभेटीसाठी उपयुक्त साहित्य नाही.
वेगळा घटक ओळखा.
क्षेत्रभेटीचा मुख्य उददेश:
विधानांचा योग्य क्रम लावा.
क्षेत्रभेटीची तयारी:
- क्षेत्रभेटीच्या ठिकाणाला भेट
- क्षेत्राची निवड
- अहवाल लेखन
- क्षेत्रभेटीची पूर्वतयारी
टिपा लिहा.
क्षेत्रभेटीची आवश्यकता
विधानावरून प्रकार ओळखा.
एखाद्या ठिकाणास प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे या क्रियेस काय संबोधतात
कृषी क्षेत्र भेटीदरम्यान शेतकऱ्यांच्या मुलाखतीसाठी प्रश्नावली तयार करा.
तुम्ही क्षेत्रभेटीत सहभागी होणार असाल, तर कशी तयारी कराल? वनक्षेत्रास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
थोडक्यात टिपा लिहा.
क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य
क्षेत्रभेटी वेळी नदी प्रदूषण होऊ नये म्हणून तुम्ही कोणते उपाय सुचवाल?
क्षेत्रभेटी दरम्यान माहितीच्या संकलनासाठी ______ या साहित्याची आवश्यकता असते.
