हिंदी

तुमच्या मित्राच्या/मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक झाल्याचा प्रसंग घरी व वर्गात सांगा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या मित्राच्या/मैत्रिणीच्या चतुरपणाचे कौतुक झाल्याचा प्रसंग घरी व वर्गात सांगा.

विस्तार में उत्तर
Advertisements

उत्तर

मीनाची चतुराई

माझी वर्गमैत्रीण मीनाला फार हुशार मुलगी म्हणून सगळे ओळखतात. एकदा तिचे आईवडील नातेवाईकांकडे गेले होते, तेव्हा ती घरी एकटीच होती. सायंकाळी झाली तेव्हा कोणीतरी दार ठोठावले. मीनाने दार उघडताच दोन भुरटे चोर घरात घुसले. त्यांनी मीनाला चाकू दाखवून दागिने कुठे ठेवले आहेत ते विचारले. मीनाने त्यांना कपाटाच्या खोलीत नेले. चोरांनी कपाटात दागिने शोधायला सुरुवात करताच मीनाने धावत बाहेर येऊन त्या खोलीचा दरवाजा लावून घेतला. शेजारच्या काका-काकूंना पटकन सत्य परिस्थिती सांगितली. त्यांनी लगेच पोलिसांना फोन लावला. त्यांना वाटले, की चोरांनी एव्हाना दागिने चोरले असतील; पण मीनाने त्यांना मुद्दाम चुकीच्या खोलीत नेले होते. त्या कपाटात दागिनेच नव्हते. त्यामुळे, चोर खूप वेळ दागिने शोधण्यात गुंग झाले. तोवर आजूबाजूचे इतर लोक तेथे जमले होते. चोरांनी तिथून पळून जाण्याचाही खूप प्रयत्न केला. परंतु, दरवाजा बाहेरून बंद असल्याने त्यांना ते शक्य झाले नाही. थोड्याच वेळात पोलीसही तेथे हजर झाले व त्यांनी चोरांना ताब्यात घेतले. या प्रसंगावधानीपणामुळे पोलिसांनी, शेजारच्यांनी, आईवडिलांनी मीनाच्या चतुराईचे खूप कौतुक केले.

shaalaa.com
गद्य (6th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 14: अप्पाजींचे चातुर्य - स्वाध्याय [पृष्ठ ४१]

APPEARS IN

बालभारती Marathi Sulabhbharati Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 14 अप्पाजींचे चातुर्य
स्वाध्याय | Q ८. | पृष्ठ ४१
बालभारती Marathi Sulabhbharati Ekatmik Standard 6 Maharashtra State Board
अध्याय 14 अप्पाजींचे चातुर्य
स्वाध्याय | Q ८. | पृष्ठ २७

संबंधित प्रश्न

‘गाईचे हंबरणे’ तसे खालील पशुपक्ष्यांचे आवाजदर्शक शब्द लिहा.

(अ) बकरी -

(आ) वाघ -

(इ) बेडूक -

(ई) कुत्रा -

(उ) मांजर -

(ऊ) मोर -


खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.

खडखड -


एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.

सुगरण पक्षी सुबक वीण कशाने घालतो?


खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.

लिंबूचमचा -


तुम्ही रझियाचे ‘हितचिंतक’ आहात, या नात्याने तिला कोणत्या सूचना द्याल?


शिंपल्यामध्ये मोती कसा तयार होताे? क्रमाने क्रिया लिहा.


‘पाटीपेन्सिल’ सारखे जोडशब्द पाठातून शोधून लिहा.


हे शब्द असेच लिहा.

जिन्नस, भूमी, रॉकेल, निर्माण, प्रचंड, प्रत्येक, खुर्च्या, कात्र्या, गुंड्या, तुळया, गोष्ट, उत्पन्न, कृपेने, वस्त्र, मातृभूमी, कड्या, म्हशी, अन्न, पेन्सिल, प्रेमभाव, टाचण्या, साऱ्या, धनधान्य, द्राक्षे.

तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

कलिंगच्या राजाने अप्पाजींची दुसऱ्यांदा कशी परीक्षा घेतली?


कोण ते सांगा.

पाण्यात राहणारे -


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×