हिंदी

तुमचे मत नोंदवा. भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमचे मत नोंदवा.

भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे.

विस्तार में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. २००७ मध्ये भारताने अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात एका नव्या क्षेत्रात पदार्पण केले. भारताने व्यावसायिक तत्त्वावर इटलीचा उपग्रह प्रक्षेपित केला.
  2. हा करार मिळवण्यासाठी इतर देशांनी खूप जास्त दरांचे निविदापत्र सादर केले होते. मात्र, भारताने वाजवी दर सांगून हा करार मिळवला.
  3. या क्षेत्रात व्यावसायिक पातळीवर प्रवेश करण्यापूर्वी भारताने अर्जेंटिना, बेल्जियम, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया आणि जर्मनी या देशांचे उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले होते.
  4. २००८ मध्ये भारताने ‘चांद्रयान-१’ हे पहिले चंद्र मोहिमेचे यान प्रक्षेपित केले. या उपग्रहाच्या माध्यमातून भारताला चंद्रावर पाण्याच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले.
  5. त्यानंतर भारताने ‘चांद्रयान-२’ आणि ‘मंगळयान’ मोहिमाही यशस्वीपणे राबवल्या. या सर्व यशस्वी कामगिरीमुळे भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील एक आघाडीचा देश असल्याचे सिद्ध झाले.
  6. सन २०२३ मध्ये भारताने ‘चांद्रयान-३’ यशस्वीपणे प्रक्षेपित केले. त्यामुळे अवकाश संशोधन क्षेत्रात भारताचे अग्रस्थान अधिक दृढ झाले.
shaalaa.com
विज्ञान आणि तंत्रज्ञान
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 11: बदलता भारत - भाग १ - स्वाध्याय [पृष्ठ ८९]

APPEARS IN

बालभारती Itihas [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 11 बदलता भारत - भाग १
स्वाध्याय | Q ५ | पृष्ठ ८९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×