Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमचे मत नोंदवा.
भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे.
सविस्तर उत्तर
Advertisements
उत्तर १
-
भारतीय अवकाश संशोधन संस्थेची ‘इस्रो’ स्थापना करून भारताने अवकाश संशोधनात मोठी झेप घेतली; ‘आर्यभट्ट’ या पहिल्या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात सोडले.
-
सुरुवातीला अन्य देशांच्या सहकार्याने उपग्रह पाठवणारा भारत आता अवकाश तंत्रज्ञानात स्वयंपूर्ण झाला असून, पूर्णपणे भारतीय बनावटीचे उपग्रह आणि प्रक्षेपक आता अवकाशात पाठवले जात आहेत.
-
भारताने व्यावसायिक धोरण स्वीकारून जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवले आहे आणि अन्य देशांचे उपग्रह वाजवी दरात अवकाशात सोडण्याचे कार्य यशस्वीपणे पार पाडले आहे.
-
२००८ मध्ये प्रक्षेपित केलेल्या ‘चांद्रयान-१’ या मोहिमेद्वारे भारताने चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याचे महत्त्वपूर्ण पुरावे शोधून काढले.
- भारताने ‘मंगळयान’ आणि ‘चांद्रयान-२’ हे उपग्रह अवकाशात सोडले.
- आता भारताने स्वबळावर अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची ‘गगनयान’ ही महत्त्वाची योजना तयार केली आहे.
अशा रितीने भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश झाला आहे, याबाबत शंकाच नाही.
shaalaa.com
उत्तर २
- २००७ मध्ये भारताने अवकाश संशोधनातील एका नव्या क्षेत्रात पदार्पण केले. इटलीचा उपग्रह भारताने व्यापारी तत्त्वावर अंतराळात सोडला.
- हे काम मिळवण्यासाठी अन्य देशांनी चढ्या दराने किंमत आकारली होती. भारताने वाजवी किंमत आकारून हे काम केले.
- व्यापारी तत्त्वावर काम करण्यापूर्वी भारताने अर्जेंटिना, बेल्जियम, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया आणि जर्मनी या देशांचे उपग्रह अंतराळात सोडले होते.
- २००८ मध्ये भारताने प्रक्षेपित केलेल्या ‘चांद्रयान-१’ या उपग्रहाद्वारे चंद्रावर पाण्याचे पुरावे सापडले.
- त्यानंतर ‘मंगळयान’ आणि ‘चांद्रयान-२’ हे उपग्रह सोडले. या सर्व यशांनी हे सिद्ध केले की, अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात भारत हा एक अग्रगण्य देश आहे.
- सन २०२३ मध्ये, भारताने ‘चंद्रयान-३’ यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. त्यामुळे, अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात भारत हा एक अग्रगण्य देश आहे.
shaalaa.com
विज्ञान आणि तंत्रज्ञान
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?

