हिंदी

‘तुझे शब्द जसे की महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.’, या ओळींचे रसग्रहण करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.’, या ओळींचे रसग्रहण करा.

खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा:

‘तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात’.

विस्तार में उत्तर
Advertisements

उत्तर

आशयसौंदर्य : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित वर्णव्यवस्थेविरुद्ध महाड येथे चवदार तळ्याचा जो संग्राम केला व शोषितांवरील अन्यायाविरुद्ध लढा उभारला, त्याच्या पन्नास वर्षे पूर्तीनंतर कवी ज. वि. पवार यांनी 'तू झालास मूक समाजाचा नायक' या कवितेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले आहे. मूक समाजाच्या या महानायकाला अभिवादन करताना त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे.

काव्यसौंदर्य : उपरोक्त ओळींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांची किमया आणि संघर्षाचा परिणाम यांची महती कथन केली आहे. चवदार तळ्यावर सर्वांसाठी पाणी खुले करताना महामानवाने जी घोषणा केली त्या शब्दांपुढे सर्व महाकाव्ये नतमस्तक व्हावीत अशी होती. तसेच जो संघर्ष केला त्याचा प्रभाव असा पडला की शोषितांच्या हातातल्या काठ्या जणू जहाल बंदुका झाल्या. डॉ. बाबासाहेबांचा शब्द व संघर्षाचे सामर्थ्य यातून व्यक्त होते.

भाषिक वैशिष्ट्ये : मुक्तछंदात (मुक्तशैली) लिहिलेली ही कविता, त्यातील ओजस्वी शब्दकळेमुळे कार्यकर्त्यांच्या काळजाला थेट भिडते. काव्यात्म पण थेट विधानांमुळे त्यातील विचार परिणामकारक झाले आहेत. 'महाकाव्याची नम्रता' व 'काठ्यांच्या बंदुका' या प्रत्येकी शांतरस व अद्भुतरस यांची निर्मिती करतात.

shaalaa.com
तू झालास मूक समाजाचा नायक
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 19: तू झालास मूक समाजाचा नायक - कृती [पृष्ठ ८१]

APPEARS IN

बालभारती Marathi Kumarbharati [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 19 तू झालास मूक समाजाचा नायक
कृती | Q (५) (अ) | पृष्ठ ८१

संबंधित प्रश्न

आकृती पूर्ण करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - ______ 


आकृती पूर्ण करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे - ______.


कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरणे यांच्या जोड्या लावा. 

कवितेतील संदर्भ  स्पष्टीकरण
(१) मळवाट  (अ) अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज
(२) खाचखळगे  (आ) पारंपरिक वाट
(३) मूक समाज  (इ) अडचणी, कठीण परिस्थिती

चवदार तळ्याच्या घटनेनंतरच्या पन्नास वर्षांत वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन करणाऱ्या ओळी लिहा.


चवदार तळ्याच्या घटनेसंदर्भाने तुलना करा.

पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती  पन्नास वर्षांनंतरची परिस्थिती
____________ ____________
____________ ____________
____________ ____________

अगाध ज्ञानाच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य, तुमच्या शब्दांत थोडक्यात लिहा.


खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

तू झालास मूक समाजाचा नायक

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
  2. प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
  3. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. (२)

खालील मुद्दयांचा आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा.

तू झालास मूक समाजाचा नायक

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
  2. प्रस्तुत कवितेचा विषय. (१)
  3. प्रस्तुत कविता तुम्हांला आवडली किंवा न आवडली ते सकारण स्पष्ट लिहा. (२)

खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

'तू निघालास तेव्हा काळोखाचे राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.'


पुढील कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं.
सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती.
मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा
खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.

तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.

तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर
तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या
आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर
युद्धात जवानांना उभे करावे तसे.

तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.
तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश; डचमळली पृथ्वी
आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली.

आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.

1. असत्य विधान ओळखा. (२)

  1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांना महाकाव्याइतके महत्त्व प्राप्त झाले.
  2. पन्नास वर्षांनंतरही सूर्यफुले काळोखाच्या प्रदेशाचा ध्यास घेत उभी आहेत.
  3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संघर्षाकडे पाहून साध्या काठ्यांच्याही संगिनी झाल्या.
  4. चवदार तळ्याच्या सत्याग्रहात जनमानस पेटून उठले होते.

2. खालील आकृती पूर्ण करा. (२)


पुढीलपैकी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

तू झालास मूक समाजाचा नायक

  1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री. (१)
  2. प्रस्तुत कवितेतील विषय. (१)
  3. दोन शब्दांचे अर्थ (२)
    अ) डचमळणे -
    ब) रणशिंग -

खाली दिलेल्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेतायेत,
बिगूल प्रतीक्षा करतोय, चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय.


कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

1. चौकटी पूर्ण करा:  (2)

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट - ______
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे - ______

तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं.
सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती.
मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा
खाचखळग्यांनी तुझे स्वागत केले.

तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.

तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर
तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या
आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर
युद्धात जवानांना उभे करावे तसे.

तुझे शब्द जसे की
महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत
तुझा संघर्ष असा की
काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.
तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश; डचमळली पृथ्वी
आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली.

आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.

2. आकृतिबंध पूर्ण करा:  (2)

3. खालील पद्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहा:  (2)

तू झालास परिस्थितीवर स्वार
आणि घडविलास नवा इतिहास

4. काव्यसौंदर्यः  (2)

‘आज पन्नास वर्षांनी अनुभवतोय
सूर्यफुले तुझा ध्यास घेतायत
बिगूल प्रतीक्षा करतोय
चवदार तळ्याचं पाणी, तेही आता थंड झालंय.’

या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×