हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

सिद्ध करा की ‘काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो.’

Advertisements
Advertisements

प्रश्न

सिद्ध करा की ‘काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो.’

प्रमेय
Advertisements

उत्तर

पक्ष: △PQR मध्ये, ∠PQR = 90°

साध्य: PR2 = PQ2 + QR2

रचना: बिंदू Q मधून बाजू PR वर रेख QS हा लंब काढा. P–S–R.

सिद्धता: △PQR मध्ये, ∠PQR = 90° … (दिले आहे)

काटकोन △PQR मध्ये, रेष QS ⟂ कर्ण PR … (रचना)

∴ △PQR ~ △PSQ ~ △QSR … (काटकोन त्रिकोणांची समरूपता) … (1)

△PQR ~ △PSQ … [(1) वरून]

∴ `(PQ)/(PS) = (QR)/(SQ) = (PR)/(PQ)` … (समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात)

∴ `(PQ)/(PS) = (PR)/(PQ)`

∴ PQ2 = PS × PR … (2)

△PQR ~ △QSR … [(1) वरून]

∴ `(PQ)/(QS) = (QR)/(SR) = (PR)/(QR)` … (समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात)

∴ `(QR)/(SR) = (PR)/(QR)`

∴ QR2 = SR × PR … (3)

PQ2 + QR2 = PS × PR + SR × PR … [(2) व (3) यांची बेरीज करून]

= PR(PS + SR)

= PR × PR … (P–S–R)

PQ2 + QR2 = PR2

∴ PR2 = PQ2 + QR2

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×