हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते, हे कोणत्या बाबीवरून दिसून येते? - History and Civics [इतिहास व नागरिकशास्त्र]

Advertisements
Advertisements

प्रश्न

शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते, हे कोणत्या बाबीवरून दिसून येते?

विस्तार में उत्तर
Advertisements

उत्तर

शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते, हे खालील बाबींवरून दिसून येते.

  1. शत्रूकडून एखादा प्रदेश जिंकून घेतला असता, तेथील मुस्लिम धर्मस्थळांना आधीपासून प्राप्त असलेल्या सोई-सवलती शिवाजी महाराज तशाच चालू ठेवत. मोहिमेवर असताना मशिदीला धक्का लावू नये असा सैनिकांसाठी सक्त नियम होता.
  2. शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम सरदार व अधिकारी होते:
    • सिद्दी इब्राहिम हे त्यांच्या सैन्यातील एक विश्वासू सेवक होते.
    • सिद्दी हिलाल हे त्यांच्या सैन्यात एक महत्त्वाचे सरदार होते.
    • दौलतखान हे स्वराज्याच्या आरमारातील (नौदल) एक महत्त्वाचे अधिकारी होते.
  3. कुरानची एखादी प्रत हाती पडल्यास तिला पूज्यभाव दाखवून ती मुसलमान व्यक्तीच्या स्वाधीन करण्यात येई. शिवरायांच्या स्वराज्यात सर्व जाती-धर्मांचे विश्वासू सेवक होते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 11: आदर्श राज्यकर्ता - स्वाध्याय [पृष्ठ १३२]

APPEARS IN

बालभारती Itihas va Nagarikshastra Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 11 आदर्श राज्यकर्ता
स्वाध्याय | Q २. (२) | पृष्ठ १३२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×