हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय?

Advertisements
Advertisements

प्रश्न

सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय?

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

सामाजिक न्याय प्रस्थापित करणे, म्हणजे:

  1. ज्या सामाजिक बाबींमुळे, विचारांमुळे व्यक्तींवर वा काही लोकसमूहांवर अन्याय होतो, त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे.
  2. व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे.
  3. जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे.
  4. सर्वांना विकासाची समान संधी देणे. 
  5. संविधानाने सामाजिक न्याय व समता या मूल्यांवर आधारित एक नवा समाज निर्माण करण्याचा मार्ग स्पष्ट केला आहे.
  6. यासाठी सर्व समाजघटकांना सामावून घेण्याबाबत काही प्रयत्न केले जातात. उदा. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा, वंचित घटकांकरता शिक्षण व रोजगारामध्ये राखीव जागांची तरतूद, अल्पसंख्याकांना समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क यांबाबत तरतूद, तसेच स्त्रियांसाठीचे विविध कायदे इत्यादी. 
  7.  
shaalaa.com
सामाजिक न्याय व समता
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.1: संविधानाची वाटचाल - संक्षिप्त उत्तरे

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र History and Civics [Marathi] 10 Standard SSC
अध्याय 2.1 संविधानाची वाटचाल
संक्षिप्त उत्तरे | Q ९. (२)
बालभारती Itihas va Rajyashastra [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2.1 संविधानाची वाटचाल
स्वाध्याय | Q ४. (२) | पृष्ठ ७४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×