Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील विषयावर संक्षिप्त टिपा लिहा:
ग्रामीण भूमी उपयोजन.
टिप्पणी लिखिए
Advertisements
उत्तर
- वन- वनांखालील क्षेत्र
- बिगरशेती- वस्ती (ग्रामीण/नागरी), पायाभूत सोयी(रस्ते, कालवे इत्यादी), उद्योग, दुकाने, इत्यादींचा समावेश या वर्गात होतो. द्वितीयक व तृतीयक व्यवसायात होणाऱ्या वृद्धीनुसार या श्रेणीतील उपयोजनात वाढ होते.
- ओसाड (नापीक) व अनुत्पादक भूमी- उंचसखल डोंगराळ भूमी, ओसाड वाळवंट, घळीयुक्त भूमी यांचा समावेश ओसाड किंवा अनुत्पादक वर्गात होतो. जी भूमी कृषी व्यवसायाखाली कोणत्याही प्रकारचे तंत्र वापरून आणता येत नाही अशी भूमी या प्रकारात येते.
- कायमस्वरूपी गायरान व चराऊ जमीन- गायरान किंवा कायम चराऊ जमीन ही प्रामुख्याने ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या मालकीची असते. अशी जमीन फारच थोड्या प्रमाणात खाजगी मालकीची असू शकते. ग्रामपंचायतीच्या मालकीची जमीन ही पंचायतीच्या सार्वजनिक मिळकतीचे साधन असते.
- किरकोळ वृक्ष, पिके व वनराई, जमीन (निव्वळ लागवडीखाली नसलेली)- यात निव्वळ लागवडीखालील क्षेत्राचा समावेश नसतो. फळबागा व फळझाडांखालील क्षेत्राचा यात समावेश होतो. या क्षेत्रातील बहुतेक जमीन खाजगी मालकीची असते.
- पिकाऊ अनुत्पादक जमीन- पाच वर्षांपेक्षा अधिक काळ पडीक (पडीत) असलेली कोणतीही जमीन लागवडीखाली न आलेली (पड) या प्रकारात मोडते. ही जमीन कोणत्याही वेळेस भर घालून, तिची गुणवत्ता वाढवून लागवडीखाली आणता येते.
- चालू पडजमीन- एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळ लागवडीखाली नसलेली जमीन या क्षेत्रात येते. जमिनीला जाणीवपूर्वक पड ठेवण्याच्या शेती पद्धतीमुळे या क्षेत्राची निर्मिती होते. पड ठेवलेल्या काळात जमीन नैसर्गिकरीत्या पुन्हा कसदार बनते किंवा तिला सुपीकता प्राप्त होते.
- चालू पडशिवायची पड जमीन- ही सुद्धा लागवडीयोग्य जमीन असते. जी जमीन एक वर्षापेक्षा जास्त परंतु पाच वर्षांपेक्षा कमी काळ पडीक राहते, ती या प्रकारात मोडते. तथापि, कोणतीही लागवडीयोग्य जमीन पाच वर्षांपेक्षा जास्त पडीक राहिल्यास ती लागवडयोग्य अनुत्पादक जमीन या वर्गात मोडते.
- निव्वळ लागवडीखालील क्षेत्र- प्रत्यक्ष लागवड केलेले व ज्यातून उत्पादन घेतलेले आहे असे शेतीखालील क्षेत्र.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
