हिंदी

पुढील विषयावर संक्षिप्त टिप लिहा: भारतातील प्रादेशिक विषमता कारणे - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विषयावर संक्षिप्त टिप लिहा:

भारतातील प्रादेशिक विषमता कारणे

पुढील संक्षिप्त टिपा लिहा:

भारतातील प्रादेशिक विषमता कारणे

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

  1. स्थान, भूउठाव, समुद्रसपाटीपासूनची उंची, संसाधनांची उपलब्धता, सुगमता इत्यादी घटक प्रादेशिक विषमतेस जबाबदार असतात.
  2. भौगोलिक स्थान, खनिज व इतर नैसर्गिक स्रोतांच्या बाबतीत काही क्षेत्रांची स्थिती चांगली आहे, तर इतर या बाबतीत मागे पडत आहेत. उदाहरणार्थ, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड यांसारख्या डोंगर आणि घनदाट जंगलांनी वेढलेले दुर्गम भूभाग असलेली राज्ये, ईशान्येकडील अनेक राज्ये अधिक खनिज व अन्य संसाधने असलेल्या इतर प्रदेशांच्या मागे आहेत.
  3. ज्या प्रदेशांमध्ये बंदरे आणि विमानतळ आहेत अशा प्रदेशाला त्यांच्या स्थानांचा इतरांपेक्षा फायदा मिळतो.
  4. विषम हवामान व नियमितपणे नैसर्गिक आपत्तीस बळी पडणाऱ्या (उदा. पूर, चक्रीवादळे इत्यादी) प्रदेशातील विकासाचा दर कमी असतो. असा प्रदेश कृषी उत्पादन व औद्योगिक विकासात मागे पडतो.
  5. कुशल कामगार, तंत्रज्ञान, वाहतूक, बाजारपेठ सान्निध्य, संदेशवहनाच्या सोयी, बँका व विमा इत्यादी मानवी घटकही प्रादेशिक विषमतेस कारणीभूत असतात. उदा. ईशान्य भारत, हिमाचल प्रदेश इत्यादी प्रदेशांत या घटकांचा अभाव असल्याने हे घटक कमी विकसित झालेले आढळतात.
  6. शिवाय, खाजगी क्षेत्राकडून केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीचे केंद्रीकरण प्रामुख्याने अशाच प्रदेशांमध्ये झालेले असते, जिथे पायाभूत सुविधा अधिक चांगल्या असतात. याचा परिणाम सरकारकडून उद्योग आणि विविध प्रकल्प उभारण्याबाबत घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर होतो, ज्यामुळे प्रादेशिक असमतोल आणखीच बळावतो.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2024-2025 (July) Official Board Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×