- प्रभावी शिक्षण: बुद्धिमापन चाचण्याचा उपयोग इतर व्यक्तींना आणि शैक्षणिक संस्थांना शैक्षणिक दृष्ट्या मागेपडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या ओळखण्यात व त्याच्या सोडवण्यात उपयुक्त ठरतात. ठराविक कालावधीच्या अंतराने बुद्धिमापन करून शिक्षकांना विद्यार्थ्यांचे बुद्धिगुणांकांनुसार विविध गटांत वर्गीकरण करता येते, त्यानुसार अध्यापन कार्यक्रमांचे नियोजन करणे शक्य होतेव त्याद्वारे अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना विकासाची सामान्य पातळी गाठण्यात मदत करता येते.
- मानसिक स्वास्थ्य साहाय्यता: बुद्धिमापन चाचण्या चिकित्सकांना लाभार्थीच्या बुद्धीची पातळी मोजण्यासाठी उपयुक्त ठरतात. बुद्धिमापन चाचण्या चिकित्सकांना निदान करण्यासाठी, लाभार्थीची अस्वास्थ्यातून सुधारण्याची शक्यता अजमावण्यासाठी, उपचाराची दिशा ठरण्यासाठी तसेच पुनर्वसनात्मक कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
- प्रभावी पालकत्व: बुद्धिमापन चाचण्या पालकांना आपल्या पाल्याची बौद्धिक क्षमता जाणून घेण्यात मदत करतात. बुद्धिगुणांकाविषयीची माहिती पालकांना त्यांच्या पाल्यांसाठी सुयोग्य शैक्षणिक सुविधा पुरवण्यात व पाल्यांकडून वास्तव अपेक्षा ठेवण्यात उपयुक्त ठरते.
- शैक्षणिक समुपदेशन: बुद्धिमापन चाचण्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बौद्धिक क्षमतांना साजेसा शिक्षणक्रम निवडण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे अपयश, वेळेचा आणि पैशाचा अपव्यय इत्यादी समस्या कमी होतात व यशस्वी होण्याच्या शक्यता वाढते.
- व्यावसायिक समुपदेशन: बुद्धिमापन चाचण्या लोकांना त्यांच्या बौद्धिक क्षमतांना साजेसा नोकरी-व्यवसाय निवडण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे गैरहजेरी, कार्य असमाधान इत्यादी समस्या कमी होतात व समाधानानेव आनंदाने जीवन जगण्याच्या शक्यता वाढतात.
Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील प्रश्नाचे उत्तर सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट करा.
बुद्धिमापन चाचण्यांची विविध क्षेत्रातील उपयुक्तता स्पष्ट करा.
स्पष्ट कीजिए
विस्तार में उत्तर
Advertisements
उत्तर
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
