- प्रभावी शिक्षण: बुद्धिमापन चाचण्या शिक्षण क्षेत्रात अत्यंत उपयुक्त मानल्या जातात. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, आकलनशक्ती व गुणवैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी या चाचण्यांचा उपयोग होतो. शैक्षणिक प्रगतीत मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी ओळखून त्यावर योग्य उपाययोजना करता येतात. तसेच विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यांकानुसार अध्यापन पद्धतीत बदल करून अभ्यासक्रमाचे प्रभावी नियोजन करता येते. त्यामुळे त्यांच्या विकासाची गती वाढविण्यास मदत होते.
- मानसिक आरोग्य मार्गदर्शन: बुद्धिमापन चाचण्या वैद्यकीय व मानसशास्त्रीय क्षेत्रातही महत्त्वाच्या ठरतात. व्यक्तीची बौद्धिक पातळी लक्षात घेऊन विविध मानसिक अडचणींचे निदान करता येते. उपचाराची योग्य दिशा ठरविणे, पुनर्वसन कार्यक्रम आखणे आणि प्रगतीचे मूल्यमापन करणे यासाठी या चाचण्या उपयुक्त ठरतात.
- प्रभावी पालकत्व: पालकांना आपल्या मुलांची बौद्धिक क्षमता जाणून घेण्यासाठी बुद्धिमापन मदत करते. मुलांच्या क्षमतेनुसार अपेक्षा ठेवता येतात व योग्य शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देता येतात. त्यामुळे पालकांना सुयोग्य मार्गदर्शन करता येते.
- शैक्षणिक समुपदेशन: शैक्षणिक क्षेत्रात योग्य शाखा किंवा अभ्यासक्रम निवडण्यासाठी बुद्धिमापन सहाय्यभूत ठरते. त्यामुळे अपयश, वेळ व पैशाचा अपव्यय टाळता येतो.
- व्यावसायिक समुपदेशन: व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेनुसार योग्य व्यवसाय निवडणे सुलभ होते. त्यामुळे नोकरीत समाधान मिळते व कार्यक्षमता वाढून यश संपादन करण्याची संधी अधिक मिळते.
Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील प्रश्नाचे उत्तर सुमारे १५० ते २०० शब्दांत स्पष्ट करा.
बुद्धिमापन चाचण्यांची विविध क्षेत्रातील उपयुक्तता स्पष्ट करा.
स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
