हिंदी

पुढील कवितेच्या त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. 'दोन दिवस' गुण (०८) मुद्दे: १. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री:- (०१) २. प्रस्तुत कवितेचा विषय:- (०१) ३.कवितेतील दिलेल्या - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील कवितेच्या त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा. गुण (०८)

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे

शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले

कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले

हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले

तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.

दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो

दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो

झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

मुद्दे:

१. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री- (०१)

२. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१)

३.कवितेतील दिलेल्या ओळीचा सरळ अर्थ लिहा. (०२)

‘शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.’

४. कवितेत आलेल्या शब्दांचे अर्थ लिहा. (०२)

१. रात्र -

२. साहाय्य -

३. शेकावे -

४. चंद्र -

५. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण - (०२)

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

१. कवी - नारायण सुर्वे

२. कवितेचा विषय - कष्टकर्याच्या जीवनाचे वास्तव व त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन रेखाटणे.

३. आभाळात शेकडो वेळा चंद्र उगवला, तारे उमलले आणि सुखमयी, धुंदावणाऱ्या रात्री आल्या; पण रोजची भूक भागवण्यासाठी खाव्या लागणाऱ्या खस्ता, कराव्या लागणाऱ्या मेहनतीतच माझे सारे आयुष्य निघून गेले.

४. कवितेत आलेल्या शब्दांचे अर्थ लिहा. (०२)

१. रजनी, निशा

२. मदत

३. तापावे

४. शशी

५. 'दोन दिवस' या कवितेत कवी नारायण सुर्वे यांनी मांडलेले कामगारांचे भावविश्व जीवनाचा एक वेगळाच पैलू दाखवते. अडीअडचणींच्या काळातही जीवनाकडे पाहण्याचा आशादायी व सकारात्मक दृष्टिकोन देते. कवीने साध्या-सोप्या भाषेत जगण्याचे तत्त्वज्ञान आपल्यासमोर मांडले आहे. ही गद्याशी नाते सांगणारी निवेदनात्मक लेखनशैली मला फार आवडली. भाकरीचा चंद्र, माना उंचावलेले किंवा कलम झालेले हात अशा सुंदर कल्पना मला फार आवडल्या. जीवनाचे धगधगीत वास्तव रेखाटतानाही कामगाराचे जीवन जगण्यावरील प्रेम कायम आहे, ते प्रेम टिपणारी ही कविता मला फार आवडते.

shaalaa.com
दोन दिवस
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5: दोन दिवस - स्वाध्याय

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi (Second Language) 10 Standard SSC
अध्याय 5 दोन दिवस
स्वाध्याय | Q २. आ.

संबंधित प्रश्न

खालील ओळींचे रसग्रहण करा. 

दुनियेचा विचार हरघडी केला,
अगा जगमय झालो
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे,
याच शाळेत शिकलो.


कृती पूर्ण करा.

‘रोजची भूक भागवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांमुळे आयुष्याचे दिवस वाया गेलेत’ या आशयाची कवितेतील ओळ शोधा.


कृती पूर्ण करा.

कवीचा प्रयत्नवाद आणि आशावाद दाखवणारी ओळ लिहा.


एका शब्दांत उत्तर लिहा.

कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट - ______


एका शब्दांत उत्तर लिहा.

कवीचा जवळचा मित्र - ______


खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

माना उंचावलेले हात


खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.

कलम केलेले हात


खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे’


'दु:ख पेलावे आणि पुन्हा जगावे', या वाक्यामागील तुम्हांला जाणवलेला विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


कवितेत व्यक्त झालेल्या कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयी तुमच्या भावना लिहा.


'कवितेत व्यक्त झालेले जीवनसत्य’, याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.


खालील ओळींचे रसग्रहण करा.

दुनियेचा विचार हरघडी केला,
अगा जगमय झालो.
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे,
याच शाळेत शिकलो.


खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधार कृती सोडवा.

मुद्दे ‘दोन दिवस’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘झोतभट्टीत शेकावे पोलाद। तसे आयुष्य छान शेकले।।’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) वाळविले -
(ii) पेलावे - 
(iii) हरघडी - 
(iv) अगा -

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘दोन दिवस’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -  
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -  
(3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. ‘हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले’
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. (i) जिंदगी -
(ii) बरबाद - 
(iii) हरघडी - 
(iv) दुनिया - 

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:

1. एका शब्दात उत्तर लिहा.     (2)

  1. कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट -
  2. कवीचा जवळचा मित्र -

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.
हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला; तारे फुलले, रात्र धुंद झाली;
भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली.

हे हात माझे सर्वस्व; दारिद्र्याकडे गहाणच राहिले
कधी माना उंचावलेले, कधी कलम झालेले पाहिले
हरघडी अश्रू वाळविले नाहीत; पण असेही क्षण आले
तेव्हा अश्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले.

दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो.
दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो
झोतभट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले
दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दु:खात गेले.

2. कृती पूर्ण करा.      (2)

  1. कवीचा प्रयत्नवाद व आशावाद दाखवणारी ओळ लिहा.
  2. 'दारिद्र्याकडे गहाण पडलेले हात', या शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

3. पुढील शब्दांचा अर्थ लिहा.      (2)

  शब्द अर्थ
1. दारिद्र्य ______
2. हरघडी ______
3. साहाय्य ______
4. दुनिया ______

4. 'कवितेत व्यक्‍त झालेले जीवनसत्य', याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा.  (2)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×