Advertisements
Advertisements
प्रश्न
पुढील बाबीवर ५० ते ६० शब्दांत संक्षिप्त टिपा लिहा.
लवचीकतेचे कोणतेही तीन आवश्यक घटक.
Advertisements
उत्तर
मानसशास्त्रीय संघटन (American Psychological Association) यांच्या मते लवचिकता ही अशी प्रक्रिया आहे की यामध्ये प्रतिकूलता, आघात, दु:ख, धोके आणि इतर ताण निर्माण करणारे घटक- जसे की कौटुंबिक व नातेसंबंधातील समस्या, गंभीर शारीरिक समस्या किंवा कामातील आणि आर्थिक ताण यासारख्या परिस्थितीशी जुळवून घेतले जाते. अडथळे किंवा संकटे असूनही पुन्हा उभारी घेण्याची ही क्रिया आहे. लवचिकता व्यक्तीला कमीत कमी नकारात्मक परिणामांसह संकटातून सावरण्यास मदत करते. लवचिक व्यक्तींमध्ये खालील गोष्टी करण्याची प्रवृत्ती असते:
- भावनिक अस्वस्थतेच्या कालावधीनंतर ते आपला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त करतात.
- ते आपले मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यास सक्षम असतात. लवचिकतेचे प्रकार म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक (सामुदायिक) लवचिकता.
ॲन मास्टन यांच्या मते, ‘लवचिकता’ (Resilience) ही एक सामान्य जादू आहे, ज्यामध्ये सहजपणे शिकता येण्यासारख्या वर्तणुकीचा समावेश असतो. लवचिकतेचे ७ ‘C’ (घटक) खालीलप्रमाणे आहेत:
- सक्षमता: सक्षमता म्हणजे कठीण परिस्थिती योग्य पध्दतीने हाताळण्याची क्षमता जी प्रत्यक्ष अनुभवातून संपादित करता येते.
- आत्मविश्वास: आत्मविश्वास म्हणजे स्वतःच्या क्षमतांवर असणारा विश्वास. आत्मविश्वास प्रत्यक्ष परिस्थिती हाताळून मिळविता येतो.
- बांधिलकी: व्यक्तीच्या आयुष्यात कुटुंब हे केंद्रस्थानी असते. सभोवतालच्या व्यक्ती, शाळा, समाज यांच्याशी असलेल्या बांधिलकीतून सुरक्षिततेची भावना निर्माण होते.
- नैतिकता: नैतिकता म्हणजे योग्य आणि अयोग्य याची जाणीव आणि एकात्मकतेशी बांधिलकी होय. चारित्र्यवान व्यक्तिमध्ये स्व आदर आणि आत्मविश्वासाची उच्च भावना असते.
- सहभाग: हेतूपूर्वक वैयक्तिक सहभागाची जाणीव असणारी व्यक्ती स्व प्रेरित होऊन ती मानसिक दृष्ट्या सक्षम होते.
- सामना: जी व्यक्ति तणावाला परिणामकारकरित्या तोंड देण्यास शिकते ती व्यक्ति आयुष्यातील आव्हांनाचा सामना करण्यास तयार असते.
- नियंत्रण: ज्या व्यक्तीचे स्वतःच्या निर्णयावर आणि वर्तनाच्या परिणामांवर नियंत्रण असते तिला स्वतःमध्ये उसळी मारून पूर्व स्थितीला येण्याची क्षमता आहे याची जाणीव असते.
