हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

प्राणी वर्गीकरणाच्या पद्धती कशा बदलत गेल्या आहेत? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

प्रश्न

प्राणी वर्गीकरणाच्या पद्धती कशा बदलत गेल्या आहेत?

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण ग्रीक तत्ववेत्ता ॲरिस्टॉटल यांनी केले होते. या वर्गीकरण पद्धतीनुसार शरीर आकारमान, सवयी, अधिवास असे मुद्दे लक्षात घेतले जातात. या पद्धतीला 'कृत्रिम पद्धत' असे म्हणतात.
  2. थेओफ्रेस्टस, प्लिनी, जॉन रे, लिनियस या शास्त्रज्ञांनी वर्गीकरणाची कृत्रिम पद्धतीच वापरली.
  3. विज्ञानातील प्रगतीमुळे पुढे संदर्भ बदलले आणि वर्गीकरणाचे मुद्दे देखील वेगळे झाले.
  4. वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा त्यानंतर अवलंब करण्यात आला. या पद्धतीत सजीवांचे शरीररचनेविषयी गुणधर्म, त्यांच्या पेशी, गुणसूत्र, जैवरासायनिक गुणधर्म असे आधुनिक मुद्दे लक्षात घेण्यात येतात.
  5. त्यानंतर डॉब्झंस्की आणि मेयर यांनी उत्क्रांतिवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत शोधली.
  6. 1977 च्या सुमारास कार्ल वुज यांनी तीन डोमेन वर्गीकरण पद्धती शोधली. त्यानुसार आदिकेंद्रकी जीवाणूंचे दोन वर्ग करण्यात आले आहेत. अशा रितीने प्राणी वर्गीकरणाच्या पद्धती बदलत गेल्या आहेत.
shaalaa.com
प्राणी वर्गीकरणाची नवीन पद्धती : वापरलेले आधारभूत मुद्दे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: प्राण्यांचे वर्गीकरण - स्वाध्याय [पृष्ठ ७५]

APPEARS IN

बालभारती Vigyan aur Tantragyan 2 [Marathi] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 6 प्राण्यांचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 3 | पृष्ठ ७५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×