हिंदी

पक्ष्याच्या/प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा.

Advertisements
Advertisements

प्रश्न

पक्ष्याच्या/प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेल्या संबंधाबाबत तुमचा अनुभव लिहा.

विस्तार में उत्तर
Advertisements

उत्तर

आमच्याकडे ‘स्वीटी’ नावाची पाळीव कुत्री आहे. तिने एका छोट्या, गोंडस पिल्लाला जन्म दिला. आम्ही त्याचे नाव ‘टॉमी’ ठेवले. टॉमी हळूहळू लहानाचा मोठा होत होता. तो आनंदाने इतरांच्याही घरात खेळत असे.

एकदा शेजारच्या सुधाकाकूंच्या मनीचे व त्याचे मोठे भांडण झाले. दोघेही झुंजू लागले. मनीने छोट्या टॉमीला पार हैराण करून सोडले. दुरून येणाऱ्या स्वीटीने ते पाहिले आणि ती मनीवर धावून गेली. तिच्यावर भुंकू लागली. जणू काही ती मनीला धावून विचारत असावी ‘माझ्या मुलाला का बरे मारतेस?’ बराच वेळ मनीवर राग व्यक्त करत, आपल्या पिल्लाविषयीची माया दाखवत तिने मनीला चांगलेच झाडले.

मनी निघून गेल्यावर तिने टॉमीला हलकेच चावले आणि ती त्याला मार लागलेल्या ठिकाणी चाटू लागली. टॉमीही आपल्या आईच्या कुशीत शांतपणे निजला. हा प्रसंग अनुभवताना, प्रत्यक्ष पाहताना मला प्राण्यांतील आई-मुलाच्या प्रेमाचे, ममतेचे दर्शन घडले.

shaalaa.com
अंकिला मी दास तुझा
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 2.1: संतवाणी - अंकिला मी दास तुझा-संत नामदेव - कृती [पृष्ठ ३]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 2.1 संतवाणी - अंकिला मी दास तुझा-संत नामदेव
कृती | Q (४)(ई) | पृष्ठ ३

संबंधित प्रश्न

'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.

माता धावून जाते ______.


'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.

धरणीवर पक्षिणी झेपावते ______.


'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.

गाय हंबरत धावते ______.


'अंकिला मी दास तुझा' या संतवाणीच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा.

हरिणी चिंतित होत ______.


आकृती पूर्ण करा.


कोण ते लिहा.

मेघाला विनवणी करणारा -


खालील ओळींचे रसग्रहण करा.

‘सवेंचि झेंपावें पक्षिणी। पिलीं पडतांचि धरणीं॥
भुकेलें वत्सरावें। धेनु हुंबरत धांवे॥’


आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत सांगा.


संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा.


कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०८)

१. चौकटी पूर्ण करा. (०२)

 अ) आगीत पडणारे - ______ 

 ब) हुंबरत धावणारी - ______

अग्निमाजि पडे बाळू।

माता धांवें कनवाळू।।१।।

तैसा धांवें माझिया काजा।

अंकिला मी दास तुझा।।२।।

सवेंचि झेंपावें पक्षिणी।

पिलीं पडतांचि धरणीं।।३।।

भुकेलें वत्सरावें।

धेनु हुंबरत धांवे।।४।।

वणवा लागलासे वनीं।

पाडस चिंतीत हरणी।।५।।

नामा म्हणे मेघा जैसा।

विनवितो चातक तैसा।।६।।

२. आकृती पूर्ण करा. (०२)

३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (०२)

१. धरणी -

२. वन -

३. मेघ -

४. काजा -

४- काव्यसाैंदय

'तैसा धांवे माझिया काज। अंकिला मी दास तुझा।।' या ओळीतील भावसाैंदर्य स्पष्ट करा. (०२)


पुढील कवितेच्या त्याखाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

'अंकिला मी दास तुझा' गुण (०८)

मुद्दे:

१. प्रस्तुत कवितेचे कवी/ कवयित्री- (०१)

२. प्रस्तुत कवितेचा विषय- (०१)

३. कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा- (०२)

'सवेंची झेपावे पक्षिणी। पिल्ली पडतांची धरणी।।'

४. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण- (०२)

५. प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश- (०२)

६. प्रस्तुत शब्दांचा अर्थ- (०२)

१. अंकिला -

२. माता -

३. दास -

४. मेघ -


खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘अंकिला मी दास तुझा’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘नामा म्हणे मेघा जैसा।
विनवितो चातक तैसा॥’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) अंकिला -
(ii) कनवाळू -
(iii) माझिया -
(iv) वणवा -

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

कृती ‘अंकिला मी दास तुझा’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -   
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -   
(3) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण -   
(4) दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ -  ‘वणवा लागलासे वनीं। पाडस चिंतीत हरणी ॥’
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ -  (i) माता -
(ii) कनवाळू -
(iii) काज -
(iv) धेनू -

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×