हिंदी

‘पाणी हेच जीवन!’ या विधानासंबंधी तुमचे विचार लिहा. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘पाणी हेच जीवन!’ या विधानासंबंधी तुमचे विचार लिहा.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

सजीव सृष्टीला जगण्यासाठी अत्यावश्यक असणारा घटक म्हणजे पाणी. वृक्ष असोत किंवा प्राणी, सर्व सजीवांना जगण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. मानवाला तर रोजच्या जीवनात सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेक कामे करताना पाण्याची गरज भासते. पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, शेते पिकवण्यासाठी, उद्योगधंदे चालवण्यासाठी, अगदी वीज निर्माण करण्यासाठी देखील माणसाला पाणी हे लागतेच. विज्ञानाच्या साहाय्याने यशाची शिखरे गाठणारा माणूस पाण्याला पर्याय शोधू शकलेला नाही. पाण्याशिवाय जीवसृष्टीची कल्पनाच करता येणार नाही. पाणी जर नसेल, तर पृथ्वीवरील जीवनच संपून जाईल, म्हणूनच 'पाणी हेच जीवन' हे विधान यथार्थ वाटते.

shaalaa.com
जगणं कॅक्टसचं
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 12.2: जगणं कॅक्टसचं - कृती [पृष्ठ ४९]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 12.2 जगणं कॅक्टसचं
कृती | Q (५) | पृष्ठ ४९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×