हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

माहिती संप्रेषणाची विविध साधने कोणती आहेत? विज्ञानाच्या संदर्भात त्यांचा वापर कसा केला जातो?

Advertisements
Advertisements

प्रश्न

माहिती संप्रेषणाची विविध साधने कोणती आहेत? विज्ञानाच्या संदर्भात त्यांचा वापर कसा केला जातो?

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाची साधने:

रेडिओ, मोबाईल, संगणक, दूरदर्शन, आंतरजाल, ई-मेल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इत्यादी माहिती संप्रेषणासाठी वापरली जाणारी उपकरणे आहेत.

माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा विज्ञानातील वापर:

  1. मोबाईल: विज्ञानाशी संबंधित व्याख्यानांचे ध्वनिमुद्रण व चित्रीकरण करून विद्यार्थ्यांना उजळणीसाठी दिली जाते. याद्वारे विज्ञानाशी संबंधित माहिती मिळू शकते.
  2. दूरदर्शन: विज्ञानाशी संबंधित शैक्षणिक धड्यांचे पुनरावलोकन केले जाऊ शकते. नॅशनल जिओग्राफिक, ॲनिमल प्लॅनेट, डिस्कव्हरी चॅनल यांसारख्या वाहिन्यांवर विज्ञानाशी संबंधित कार्यक्रमांचा अभ्यास करून आवश्यक ती माहिती मिळवता येते.
  3. संगणक: विज्ञानाशी संबंधित माहिती संगणकात संग्रहित केली जाते आणि ती माहिती चे सादरीकरण करणे, आलेख निर्मिती करणे यासाठी वापरली जाते.
  4. आंतरजाल: संगणक आणि आंतरजाल वापरून विज्ञानाशी संबंधित माहिती मिळवता येते. विविध संकेतस्थळांना भेट देऊन आवश्यक माहिती व चित्रे कॉपी करता येतात. वैज्ञानिक प्रयोग आणि निर्मितीचीही येथे तपासणी करता येते.
shaalaa.com
माहिती संप्रेषण तंत्रज्ञान
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा - स्वाध्याय [पृष्ठ ११४]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 10 माहिती संप्रेषण तंत्रज्ञान : प्रगतीची नवी दिशा
स्वाध्याय | Q 2. उ. | पृष्ठ ११४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×