हिंदी

लोकसंख्या वितरण असमान असते. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

प्रश्न

लोकसंख्या वितरण असमान असते.

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

जगातील प्रत्येक देशाची भौगोलिक रचना, हवामान, मृदा, पाण्याची उपलब्धता इत्यादी प्राकृतिक घटकात विविधता आढळून येते. लोकसंख्येच्या वितरणावर या सर्व घटकांचा प्रभाव पडतो. ज्या प्रदेशात प्राकृतिक घटक अनुकूल असतात तिथे लोकसंख्या जास्त, तर ज्या प्रदेशात प्राकृतिक घटक प्रतिकूल आहेत तेथे लोकसंख्या कमी आढळते. नदीची सुपीक मैदाने, किनारपट्टीचे प्रदेश आल्हाददायक हवामान अशा अनुकूल परिस्थितीत लोकसंख्या जास्त असते. मात्र त्याच वेळेस जगातील काही प्रदेशात तीव्र उताराचे पर्वतीय प्रदेश, अतिशीत किंवा अतिउष्ण प्रदेश, सदैव बर्फाच्छादित प्रदेश किंवा पाण्याचे दुर्भिक्ष्य असणारे वाळवंटी प्रदेश आहेत तेथे साहजिकच लोकसंख्या कमी आढळते. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून जगातील लोकसंख्या वितरण असमान असते.

shaalaa.com
लोकसंख्या वितरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1: लोकसंख्या - भताग १ - स्वाध्याय [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Bhugol [Marathi] Standard 12 Maharashtra State Board
अध्याय 1 लोकसंख्या - भताग १
स्वाध्याय | Q ३. २) | पृष्ठ ११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×