हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ८ वीं कक्षा

'कोलंबसाचे गर्वगीत' ही कुसुमाग्रज यांची कविता मिळवून वाचा व शिक्षकांकडून समजून घ्या. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

'कोलंबसाचे गर्वगीत' ही कुसुमाग्रज यांची कविता मिळवून वाचा व शिक्षकांकडून समजून घ्या.

संक्षेप में उत्तर
Advertisements

उत्तर

कोलंबसाचे गर्वगीत

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळू दे तारे
विराट वादळ हेलकावू दे पर्वत पाण्याचे ढळू दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राशुनी मातु दे दैत्य नभामधले दडू द्या पाताळी सविता
आणि त्यांची ही अधिराणी दुभंग धरणीला कराया पाजळू दे पलिता 

की स्वर्गातून कोसळलेला, सूड-समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनी मेळा वेताळांचा या दर्यावरती करी हे तांडव थैमान

पदचुता तव भीषण नर्तन असेच चालू दे फुटू दे नभ माथ्यावरती आणि
तुटू दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका न कुठली भीती

सहकार्यानो, का ही खंती जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रापारी असीम नीलामध्ये संचरावे दिशांचे आम्हाला धाम

काय सागरी तारू लोटले परताया मागे असे का हा अपुला बाणा
त्याहून घेवू जळी समाधी सुखे, कशासाठी जपावे पराभूत प्राणा

कोट्यावधी जगतात जीवाणू जगती अन मरती जशी ती गवताची
पाती, नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो
नाव क्षितिजे पुढती

मार्ग अमुचा रोखू शकती ना धन ना दारा घराची वा वितभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती कथा या खुळया सागराला.
"अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला"

कोलंबसाचे गर्वगीत ही कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची विशाखा या काव्यसंग्रहातील एक अतिशय दर्जेदार कविता आहे. हजारो वर्षापासून निसर्गाच्या क्रूर संकटांना समोर जाऊन माणसांनी विजिगिषु वृत्तीने नवनवी शिखरे पादाक्रांत केली आहेत. या कवितेत कुसुमाग्रज साहसी दर्यावरती कोलंबसाची कथा सांगत आहेत.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: धाडसी कॅप्टन : राधिका मेनन - माझे वाचन [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 8 Maharashtra State Board
अध्याय 8 धाडसी कॅप्टन : राधिका मेनन
माझे वाचन | Q १ | पृष्ठ ११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×