हिंदी

खालील विषयावर बातमी तयार करा. 8 मार्च ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ शाळेत ‘माता-पालक मेळावा’ व विविध स्पर्धांचे आयोजन पालकांचा उदंड प्रतिसाद. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील विषयावर बातमी तयार करा.

8 मार्च ‘जागतिक महिला दिनानिमित्त’ शाळेत ‘माता-पालक मेळावा’ व विविध स्पर्धांचे आयोजन पालकांचा उदंड प्रतिसाद.

लेखन कौशल
Advertisements

उत्तर

जागतिक महिला दिन : माता-पालक मेळावा

धुळे, दि. ९ मार्च: धुळे येथील ‘अभिनव विद्यामंदिर’ शाळेतर्फे काल ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन अत्यंत वेगळ्या आणि उपक्रमशील पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्ताने महिलांच्या सन्मानासाठी शाळेत ‘माता-पालक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता.

या मेळाव्याचे उद्घाटन उपस्थित माता-पालकांपैकी सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्रीमती सुधा नाडकर्णी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमादरम्यान महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व स्पर्धांमध्ये माता-पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजसेविका श्रीमती पाटील मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी माता-पालकांशी मुक्त संवाद साधत त्यांच्या समस्या व प्रश्न जाणून घेतले. या संवादातून महिलांना योग्य मार्गदर्शन व प्रेरणा मिळाल्याची भावना सहभागी महिलांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.

शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वर्षा कारखानीस यांच्या उत्कृष्ट सूत्रसंचालनामुळे तसेच माता-पालकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे कार्यक्रम अतिशय यशस्वी आणि उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तबगार महिलांचा विशेष सत्कारही करण्यात आला.

shaalaa.com
बातमी लेखन
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2022-2023 (March) Official

संबंधित प्रश्न

खालील विषयावर बातमी तयार करा.

रेल्वे प्रवासात प्रवासी नागरिकांजवळ स्वओळखपत्र असणे अनिवार्य. (आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड यांपैकी कोणतेही एक.)


पुढील विषयावर बातमी तयार करा.

जनता गर्ल्स हायस्कूल, शेंदूरजना घाट येथे “जागतिक महिला दिन” साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी तयार करा.


पुढील समारंभाची बातमी तयार करा.

शाळेच्या सुवर्णमहोत्सवाचा उद्घाटन समारंभ माननीय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


दिलेल्या शब्दांवरून बातमी तयार करा.

शाळा ______ कोरोना ______ मोबाइल ______ शिक्षण सुरू ______ अभ्यासक्रम ______समस्या.


वृद्ध दिनानिमित्त संपन्न झालेल्या वरील कार्यक्रमाची बातमी तयार करून लिहा.


कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त, दि. 27 फेब्रुवारी रोजी ‘साधना विद्यालय, रायरी’ या विद्यालयात ‘मराठी भाषा दिन’ साजरा झाला.

या समारंभाची बातमी तयार करा.


खालील मुद्द्यांवरून बातमी तयार करा.

आदर्श शिक्षक पारितोषिक सोहळा

शिक्षक दिनानिमित्त विद्या मंदिर शाळेतर्फे

आदर्श आणि गुणी शिक्षकांचा सत्कार

  • प्रमुख पाहुणे: कुलसचिव, मुंबई विद्यापीठ, मुंबई.
  • स्थळ: विद्या मंदिर शाळा, कात्रज, पुणे.
  • वेळ: दुपारी ४ ते ६ वाजेपर्यंत
  • दिनांक: ५ सप्टेंबर, २०१७

तुमच्या शाळेत 5 सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी लिहा.


खालील विषयावर बातमी तयार करा.

तलाव ओसंडून वाहू लागले. गावकऱ्यांसाठी आनंदवार्ता.


खालील विषयावर बातमी तयार करा.

शहरात डेंग्यूचा वाढता फैलाव म. न. पा. कडून आरोग्य तपासणी.


खालील विषयावर बातमी तयार करा.

सचिन तेंडुलकरचा वाढदिवस युवा हेल्थ क्लबकडून उत्साहात साजरा.


खालील विषयावर बातमी तयार करा:

जनता विद्यालय, शिरवळ येथे मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा.

प्रमुख पाहुणे - ज्येष्ठ साहित्यिक - श्री. अरविंद मोरे

अध्यक्ष - श्री. सागर शिंदे

दि. 27 फेब्रुवारी वेळ - स. 10.00


खालील विषयावर बातमी तयार कराः

‘ज्ञानज्योत विद्यालय’, वर्धा येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा झाला.


खालील विषयावर बातमी तयार करा:

अभिनव विद्यालय, सोलापूर
शालांत परीक्षेस बसलेल्या विदयार्थ्यांसाठी
'शुभेच्छा समारंभ'

दि. 25 फेब्रुवारी,  वेळ - ११:०० वा.

अध्यक्ष : मां. श्री. विजय जोशी

प्रमुख पाहुणे - मां. श्री. विशाल साठे (समाजसेवक)


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×