Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्याचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.
आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात. मग वाहने माणसांवर स्वार होतात.
Advertisements
उत्तर
सुरुवातीला लोक गाडी जपून चालवतात. मात्र हळूहळू त्यांना गाडीची चटक लागते. मग ते केवळ मौजमजा करण्यासाठीसुद्धा गाडीचा वापर करतात. पूर्णपणे ते गरडीवरच अवलंबून राहतात. हे सिगारेटच्या व्यसनासारखेच आहे. सुरुवातीला फक्त एकदाच, मग ती व्यक्ती सिगारेटशिवाय राहू शकत नाही. ती व्यक्ती सिगारेटचा गुलाम होऊन जाते. त्याप्रमाणे माणसेही गाड्यांचे गुलाम होतात. त्यांच्या वापराबाबत माणसांना कोणतेही तारतम्य राहत नाही.
अमेरिकेसारख्या देशामध्ये राहण्याची ठिकाणे, नोकरी-व्यवसायाची ठिकाणे, अन्य कामाची ठिकाणे ही सर्व दूर दूर अंतरावर असतात. ही अंतरे पार करण्यासाठी खुप प्रवास करावा लागतो. भारतातील अनेक व्यक्तींची मुले अमेरिकेसारख्या दूरदूरच्या देशांमध्ये राहतात. ही सर्व माणसे एकमेकांना नियमितपणे व सहजपणे भेटू शकत नाहीत. साहजिकच अंतरामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण होतो.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.
जीवन विभागणारे घटक - ______
पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.
विचारांची गती म्हणजे- ____________
पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.
अधोगती म्हणजे - ____________
पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा.
अक्षम्य आवेग म्हणजे - ______
कृती करा.
गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे -
कृती करा.
लेखकाच्यामते, जीवनअर्थपूर्णतेव्हाहोते, जेव्हा
कृती करा.
लेखकाने सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारणे
कृती करा.
वाहनाचा वेग अनिवार झाला तर
कारणे शोधा व लिहा.
अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान असते, कारण ______
कारणे शोधा व लिहा.
लेखकांच्या मते, गरजेच्या वेळी वाहनांचा वापर करायला हवा; कारण ______.
योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा.
जीवन अर्थ पूर्ण होईल, जर ______.
निसर्गविरोधी वर्तन नसणे, म्हणजे' ______.
वाहन वापरातील फरक स्पष्ट करा.
| अमेरिका | भारत |
खालील वाक्याचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा.
उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये.
स्वमत -
‘वाहनांच्या अतिवापराने शरीर व्यापारात अडथळे निर्माण होतात’, तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
स्वमत
‘वाढता वेग म्हणजे ताण’, याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.
स्वमत
‘वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. ते वेळ घालवण्यासाठी नसते’, हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
स्वमत:
‘वाहनाची अतिगती ही विकृती आहे’, स्पष्ट करा.
अभिव्यक्त
रस्त्यावरील वाहतूक कोंडीत सापडल्यावर तुमची भूमिका काय असेल ते लिहा.
अभिव्यक्त
वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, ते तुमच्या शब्दांत लिहा.
खालील उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा:
|
वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यांत विभागलेली आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरांत राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगतिक होतात. अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कोठून? आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला. लोकांनी जगप्रवासही केला; पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत. आता माणूस घरातून दारात आला, की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो. कामे बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला तर दवाखाना दूर, कुठल्यातरी दिशेला. जीवनाची ही टोके साधणार कशी? जोडणार कशी? शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे; पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत, एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघातकी ठरतो. |
(१) चौकटी पूर्ण करा - (२)
(य) विचारांची गती म्हणजे - ______
(र) दिशाविहीन गती म्हणजे - ______
(२) कारणे लिहा - (२)
माणूस घरातून दारात आला, की वाहनावर आरूढ होतो, कारण ______
(य) ______
(र) ______
(३) स्वमत अभिव्यक्ती -
'यथा प्रमाण गती ही गरज आहे' - हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. (४)
किंवा
वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी, ते सविस्तर लिहा.
