Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील उतारा वाचून त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा:
|
भारतीय चित्रपटाच्या प्रारंभ, प्रसार आणि जडणघडणीला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. एकेकाळी मूक चित्रपट काढले जात. अशा चित्रपटात पडद्यावरचे चित्र पाहून प्रेक्षक चित्रपटातून नेमका काय संदेश द्यायचा आहे त्याचा अर्थ लावत असत. नंतरचा काळ दृकश्राव्य चित्रपटांचा होय. त्यानंतर कृष्णधवल (ब्लॅक अँड व्हाईट) चित्रपट आणि नंतर रंगीत चित्रपट निर्माण होऊ लागले. आर्थिक दृष्ट्या ज्यांना परवडते ते चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहतात, काहीजण घरीच दूरदर्शनवर चित्रपट पाहतात. चित्रपटांच्या कथांनी सर्वांचे मनोरंजन होते. चित्रपटांतून, कल्पना, विचारधारा, शोकांतिका, एखादा विशिष्ट, विषय किंवा मूल्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जातात. आता सगळेजण आंतरजालावर (इंटरनेट) किंवा मोबाईल फोनवरही चित्रपट पाहू शकतात. चित्रपटांतून प्रेक्षकांना काही सुप्त अथवा थेट संदेश द्यावयाचे असतात. काहींच्या हे संदेश लक्षात येतात तर काहींच्या येत नाहीत. “चित्रपटात भूमिका साकारण्याचे कसब असलेला/असलेली नट/नटी यांखेरीज चित्रपटनिर्मिती आणि चित्रपटाचे विपणन यामध्ये अनेकांचा हातभार लागतो. यामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक, पटकथालेखक, रचनाकार, वेषभूषाकार, ध्वनी संयोजक, मेकअप करणारे कलाकार, उत्कृष्ट रचना उभी करण्यात प्रावीण्य असणारे, भूमिकांसाठी कलाकारांची निवड करणारे, संगीतकार, इत्यादींचा समायेश असतो. असे अनेक पैलू अभ्यासण्यासाठी दृक समाजशास्त्र, जन संप्रेषण समाजशास्त्र आणि विपणन समाजशास्त्र असे विषय उपयुक्त ठरतात. माहितीचा स्त्रोत म्हणून आजही चित्रपटांची अनेकांगी भूमिका आहे. चित्रपट कथा आणि चित्रपटाचे प्रकार वाढतच आहेत. आता चित्रपट केवळ ठराविक साच्याच्या प्रेमकथा किंवा लिंगभावात्मक साचेबद्ध प्रतिमा घेऊन केल्या जाणाऱ्या कथापुरते गर्यादित नाहीत. चित्रपटांगुळे एकीकडे गोठी उलथापालथ होऊ शकते किंवा नव्या विषयाकरिता रूचीही निर्गाण होऊ शकते. आता चित्रपटांच्या यादीमध्ये प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटांची भर पडली आहे. त्यामुळे विविध विषयांवर चित्रपट निघत असल्याने अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. |
प्रश्नः
- चित्रपट निर्मिती है सांघिक कार्य कसे आहे? [1]
- चित्रपटांच्या समाजातील भूमिकेची चर्चा करा. [1]
Advertisements
उत्तर
- चित्रपट निर्मितीच्या कार्यात अनेक जणांचा समावेश असतो. कोणा एका व्यक्तीच्या कामातून चित्रपट निर्मिती प्रक्रिया अशक्य आहे. ‘चित्रपटात भूमिका साकारण्याचे कसब असलेला/असलेली नट/नटी’ यांखेरीज चित्रपट निर्मिती आणि चित्रपटाचे विपणन यांमध्ये अनेकांचा हातभार लागतो. यांमध्ये चित्रपटांचे दिग्दर्शक, पटकथा लेखक, रचनाकार, वेषभूषाकार, ध्वनी संयोजक, मेकअप करणारे कलाकार, उत्कृष्ट रचना उभी करण्यात प्रावीण्य असणारे, भूमिकांसाठी कलाकारांची निवड करणारे, संगीतकार इत्यादींचा समावेश असतो. या सर्वांच्या सांधिक कार्याशिवाय चित्रपट निर्मिती अशक्य आहे.
- चित्रपटांच्या समाजातील भूमिका:
- चित्रपटांतून कल्पना, विचारधारा, शोकांतिका, एखादा विशिष्ट विषय किंवा मूल्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जातात. या सर्व घटकांचा परिणाम प्रेक्षकांच्या विचारसरणीवर आणि वागणुकीवर होतो.
- चित्रपटांमुळे एकीकडे मोठी उलथापालथ होऊ शकते किंवा नव्या विषयांकरिता रुचीही निर्माण होऊ शकते.
- चित्रपटातून दिल्या जाणाऱ्या स्पष्ट, सरळ व पूर्ण संदेशामुळे लोकांच्या विचारसरणीवर चांगला अथवा वाईट परिणाम होऊ शकतो.
