हिंदी

खालील पंक्तीमधून सूचित होणारा अर्थ लिहा. शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।। - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील पंक्तीमधून सूचित होणारा अर्थ लिहा.

शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।
घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।।

विस्तार में उत्तर
Advertisements

उत्तर

‘स्वप्न करू साकार’ या कवितेत कवी किशोर पाठक यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न चित्रित केले आहे. प्रस्तुत कवितेत कृषिसंस्कृती, श्रमप्रतिष्ठा, एकतेचे सामर्थ्य या मूल्यांचे महत्त्व स्पष्ट केले आहे.

या देशात उगवणारी फुले, येथील मुले यांच्या प्रसन्नतेतून जणू येथला श्रावण खुलतो. येथील माती ही मंगलमय आहे. सर्वत्र जणू चैतन्यमयी वातावरण असते. येथील सुजलाम्, सुफलाम् धरतीतून आम्ही धान्यरूपी धन भरभरून पिकवू. त्यातून भरपूर संपत्ती प्राप्त होईल, असा प्रेरणादायी आशय प्रस्तुत काव्यपंक्तींतून कवी व्यक्त करू पाहतात. येथे कवी धान्याला मोत्यांची उपमा देतात. शेतीच्या विकासामुळेच देशाची भरभराट होईल, समृद्धी नांदेल ही महत्त्वाची गोष्ट ते ठळकपणे दाखवून देतात. कृषिसंस्कृतीचे दर्शन यातून आपल्याला घडते. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून शेत जणू मोती पिकवेल आणि त्यातून कधीही न संपणारे असे अपरंपार धन मिळेल, असे देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न कवी प्रस्तुत ओळींतून नेमकेपणाने मांडतात.

तसेच दुसऱ्या ओळीतून कवी एकजुटीचे व नव्या पिढीच्या कर्तृत्वाचे सामर्थ्य सांगू पाहत आहे. संख्येने अनेक असलो तरी आम्हां सर्व देशवासियांच्या मनगटांत एकीची शक्ती सामावली आहे. या शक्तीच्या बळावर आम्ही विजय मिळवत पुढे पुढे जात आहोत. येणारी नवी पिढीदेखील या देशाच्या उज्ज्वल भविष्याकरता उमेदीने, उत्साहाने कार्य करणारी अशी घडेल. घराघरांतून जन्मणारे प्रत्येक मूल तेजस्वी असेल. प्रत्येक घरात जणू तेजच नवा अवतार धारण करेल, अशी अनोखी कल्पना कवी करत आहे. या तेजस्वी पिढीमुळे देशाचे भवितव्य घडणार आहे, तिचे सामर्थ्य प्रस्तुत काव्यपंक्तीद्वारे कवीला मांडायचे आहे.

shaalaa.com
स्वप्न करू साकार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 16.1: स्वप्न करू साकार - कृती [पृष्ठ ६०]

APPEARS IN

बालभारती Marathi Aksharbharati [English] Standard 10 Maharashtra State Board
अध्याय 16.1 स्वप्न करू साकार
कृती | Q (३)(आ) | पृष्ठ ६०

संबंधित प्रश्न

खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा.

हस्त शुभंकर - 


खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा.

आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार-


आकृतिबंध पूर्ण करा.


आकृतिबंध पूर्ण करा.


खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार
नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।


या कवितेत कवीने बघितलेले स्वप्न तुमच्या शब्दांत लिहा.


कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार स्पष्ट करा.


खालील पंक्तीमधून सूचित होणारा अर्थ लिहा.

शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।


पद्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०८)

आकलन कृती

 १. जोड्या जुळवा. (०२)

क्र. 'अ' 'ब'
१. सुदर्शन चक्र शुभंकर
२. मंत्र शक्ती
३. नौबत चैतन्य
४. हस्त श्रमशक्ती

 

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार

नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।

फुलामुलांतून हसतो श्रावण

मातीचे हो मंगल तनमन

चैतन्याचे फिरे सुदर्शन

शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।

या हातांनी यंत्र डोलते

श्रमशक्तीचे मंत्र बोलते

उद्योगाचे चक्र चालते

आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार।।

हजार आम्ही एकी बळकट

सर्वांचे हो एकच मनगट

शक्तीचीही झडते नौबत

घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।।

या विश्वाची विभव संपदा

जपू वाढवू आम्ही लाखदा

हस्त शुभंकर हवा एकदा

भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।।

२. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२)

१. कोणाचे स्वप्न साकार करायचे आहे?

२. शेतातील धान्याला कशाची उपमा दिली आहे?

३. कवितेत आलेल्या खालील शब्दांचा अर्थ लिहा. (०२)

१. मंगल -

२. तन -

३. ललकार -

४. विभव -

४. खालील पंक्तींमधून सूचित होणारा अर्थ लिहा. (०२)

या विश्वाची विभव संपदा

जपू वाढवू आम्ही लाखदा

भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।।


खालील दोन कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुददे 'अंकिला मी दास तुझा' किंवा 'स्वप्न करू साकार'
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री    
2. प्रस्तुत कवितेचा विषय    
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. 'अग्निमाजि पडे बाळू । माता धांवें कनवाळू।।' 'हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट।।'
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण    
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. i. काज - 
ii. सवें -
iii. पाडस -
iv. धेनू -
i. विभव -
ii. मंगल -
iii. श्रम -
iv. हस्त -

किंवा

मुददे 'स्वप्न करू साकार'
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
2. प्रस्तुत कवितेचा विषय  
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. 'हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट।।'
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. i. विभव -
ii. मंगल -
iii. श्रम -
iv. हस्त -

खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे 'स्वप्न करू साकार'
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
2. प्रस्तुत कवितेचा विषय  
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. 'हजार आम्ही एकी बळकट।
सर्वांचे हो एकच मनगट।।'
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. i. विभव -
ii. मंगल -
iii. श्रम -
iv. हस्त -

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘स्वप्न करू साकार’
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री  
(ii) प्रस्तुत कवितेचा विषय  
(iii) प्रस्तुत ओळींचा सरळ अर्थ लिहा ‘घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।’
(iv) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(v) प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा (i) शुभंकर -
(ii) उज्जवल -
(iii) विभव -
(iv) अमुचा -

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.

१. चौकटी पूर्ण करा. (2)

  1. शक्तीचीही झडते - ______
  2. चैतन्याचे फिरे - ______

या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार
नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।

फुलामुलांतून हसतो श्रावण
मातीचे हो मंगल तनमन
चैतन्याचे फिरे सुदर्शन
शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।

या हातांनी यंत्र डोलते
श्रमशक्तीचे मंत्र बोलते
उद्योगाचे चक्र चालते
आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार।।

हजार आम्ही एकी बळकट
सर्वांचे हो एकच मनगट
शक्तीचीही झडते नौबत
घराघरांतून जन्म घेतसे तेज नवा अवतार।।

या विश्वाची विभव संपदा
जपू वाढवू आम्ही लाखदा
हस्त शुभंकर हवा एकदा
भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जयजयकार।।

२. आकृती पूर्ण करा. (2)

३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)

  1. बळकट - 
  2. आभाळ -
  3. संपदा -
  4. अपरंपार -

४. काव्यसौंदर्य: (2)

‘घराघरांतून जन्म घेतले तेज नवा अवतार।’ या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.


खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

मुद्दे ‘स्वप्न करू साकार’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -  
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -  
(3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. ‘या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार’
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण  
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. (i) ललकारणे -
(ii) नौबत - 
(iii) विभव - 
(iv) श्रम - 

खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.

कृती ‘स्वप्न करू साकार’
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री -   
(2) प्रस्तुत कवितेचा विषय -   
(3) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण -   
(4) दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ - 

‘या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार

नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार’

(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ -  (i) विभव -
(ii) शक्ती -
(iii) विश्‍व -
(iv) हस्त -

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×