हिंदी

खालील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा. 'शेला हिरवा पांघरमालकांच्या स्वप्नांवर - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

'शेला हिरवा पांघर
मालकांच्या स्वप्नांवर'

टिप्पणी लिखिए
Advertisements

उत्तर

'प्राणसई' या कवितेमध्ये कवयित्री इंदिरा संत यांनी मेघमालेला 'प्राणसई' असे संबोधले आहे. कडक उन्हामुळे शेते उजाड झाली आहेत, म्हणून कवयित्री मेघमालेला भावपूर्ण शब्दांत आर्जव करत आहेत.
कडक उन्हामुळे घरादारातील माणसे व्यथित आहेत. बाळांचे चेहरे हिरमुसले आहेत. कामाअभावी बैल गोठ्यात बांधून ठेवले आहेत. शेतकरी निराश झाले आहेत. अशा भीषण परिस्थितीत कवयित्री पावसाळी ढगांना विनवते आहे की, आधी धावतपळत, लगबगीने माझ्या शेतावर बरस. माझ्या धन्याच्या मनातली स्वप्ने कोमेजून गेली आहेत. धनधान्याने भरलेली हिरवी शेते त्याला पाहायची आहेत. म्हणून कवयित्री म्हणतात की, हे प्राणसई, तू दौडतधावत ये आणि मालकांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर हिरवा शेला पांघर. हिरवीगार शेती बहरू दे.

अतिशय भावविभोर शब्दांमध्ये कवयित्रींनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. हिरव्या शेतांना हिरव्या शेल्याचे योजलेले प्रतीक अनोखे व चपखल आहे.

shaalaa.com
प्राणसई
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.02: प्राणसई - कृती [पृष्ठ १०]

APPEARS IN

बालभारती Marathi Yuvakbharati [English] Standard 11 Maharashtra State Board
अध्याय 1.02 प्राणसई
कृती | Q (३) (अ) (२) | पृष्ठ १०

संबंधित प्रश्न

चौकटी पूर्ण करा.

कवयित्रीने जिला विनंती केली ती - _________


चौकटी पूर्ण करा.

कवयित्रीच्या मैत्रिणीला सांगावा पोहोचवणारी - _________.


चौकटी पूर्ण करा.

शेतात रमणारी व्यक्ती - _________.


कारण लिहा.

बैलांचे मालक बेचैन झाले आहेत; कारण ..........


कारण लिहा.

बाळांची तोंडे कोमेजली; कारण .............


कृती करा.

कवयित्रीने प्राणसईच्या आगमनानंतर व्यक्त केलेल्या अपेक्षा :


पुढील काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करा:

ये ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर


पुढील काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करा :

तशी झुलत झुलत ये ग माझिया घराशीं


पुढील काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करा :

विहिरीच्या तळीं खोल दिसूं लागलें ग भिंग


खालील तक्त्यात  सुचवल्यानुसार कवितेच्या ओळी लिहा.

प्राणसईला कवयित्री विनंती करते त्या ओळी प्राणसई न आल्याने कवयित्रीच्या अस्वस्थ मनाचे वर्णन करणाऱ्या ओळी प्राणसई हीच कवयित्रीची मैत्रीण आहे हे दर्शवणाऱ्या ओळी मालकाच्या स्वप्नपूर्तीसाठी आवाहन करणाऱ्या ओळी
       

खालील ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.

‘कां ग वाकुडेपणा हा, 
कां ग अशी पाठमोरी?
ये ग ये ग प्राणसई
वाऱ्यावरून भरारी’


'कवयित्री आणि प्राणसई यांच्यातील नाते जिव्हाळ्याचे आहे,' हे स्पष्ट करा.


अभिव्यक्ती

तुमच्या परिसरातील पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करा.


अभिव्यक्ती.

पावसानंतर तुमच्या परिसरात होणाऱ्या बदलाचे वर्णन करा.


अभिव्यक्ती.

पावसानंतर कोणाकोणाला कसाकसा आनंद होतो, ते लिहा.


प्राणसई’ या कवितेचे रसग्रहण करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×