Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:
|
अक्षरधारा वाचनालय चिपळूण शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धा |
यश/इरा गुप्ते वक्तृत्वस्पर्धेत सहभागी होण्यासाठी विनंती करणारे पत्र ग्रंथपालांना लिहा.
Advertisements
उत्तर
दिनांक - १५ फेब्रुवारी २०२५
प्रति,
माननीय ग्रंथपाल,
अक्षरधारा वाचनालय,
चिपळूण,
ई-मेल: [email protected]
विषय: वक्तृत्व स्पर्धेत सहभागी करून घेण्याबाबत.
महोदय,
मी यश गुप्ते, सरस्वती विद्यालय, चिपळूण येथे इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. आपल्या अक्षरधारा वाचनालयाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मला मिळाली.
ही स्पर्धा 27 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. 27 फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन असून हा दिवस ‘मराठी दिन’ म्हणून साजरा केला जातो. अशा महत्त्वाच्या दिवशी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून आपण मराठी भाषेचा गौरव केला आहे, असे मला वाटते.
या स्पर्धेत सहभागी होण्याची माझी तीव्र इच्छा आहे. तरी मला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी द्यावी, अशी नम्र विनंती आहे.
कळावे,
आपला विश्वासू,
यश गुप्ते,
इ. ९ वी,
सरस्वती विद्यालय,
चिपळूण.
