मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा: अक्षरधारा वाचनालय चिपळूण यांच्यातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धा, स्पर्धा - दि. 27 फेब्रुवारी, वेळ - स. 10.00 - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:  

अक्षरधारा वाचनालय

चिपळूण
यांच्यातर्फे

शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धा
स्पर्धा - दि. 27 फेब्रुवारी, वेळ - स. 10.00
स्थळ - अक्षरधारा सभागृह, चिपळूण.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ - दुपारी 4.00
संपर्क - ग्रंथपाल, अक्षरधारा वाचनालय
ई-मेल - [email protected]

यश/इरा गुप्ते वक्तृत्वस्पर्धेत सहभागी होण्यासाठी विनंती करणारे पत्र ग्रंथपालांना लिहा.

लेखन कौशल्य
Advertisements

उत्तर

दिनांक - १५ फेब्रुवारी २०२५

प्रति,
माननीय ग्रंथपाल,
अक्षरधारा वाचनालय,
चिपळूण,
ई-मेल: [email protected]

विषय: वक्तृत्व स्पर्धेत सहभागी करून घेण्याबाबत.

महोदय,

मी यश गुप्ते, सरस्वती विद्यालय, चिपळूण येथे इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. आपल्या अक्षरधारा वाचनालयाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी भव्य वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मला मिळाली.

ही स्पर्धा 27 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. 27 फेब्रुवारी हा कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन असून हा दिवस ‘मराठी दिन’ म्हणून साजरा केला जातो. अशा महत्त्वाच्या दिवशी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून आपण मराठी भाषेचा गौरव केला आहे, असे मला वाटते.

या स्पर्धेत सहभागी होण्याची माझी तीव्र इच्छा आहे. तरी मला या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी द्यावी, अशी नम्र विनंती आहे.

कळावे,

आपला विश्वासू,
यश गुप्ते,
इ. ९ वी,
सरस्वती विद्यालय,
चिपळूण.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×