हिंदी

खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेखाच्या विषयांचे स्त्रोत लिहा: वृत्त किंवा बातमी ............ व्यक्तिगत अनुभव ............ भेटीगाठी ............ मुलाखती ............ निरीक्षणे. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील मुद्द्यांच्या आधारे वृत्तलेखाच्या विषयांचे स्त्रोत लिहा:

वृत्त किंवा बातमी ............ व्यक्तिगत अनुभव ............ भेटीगाठी ............ मुलाखती ............ निरीक्षणे.

विस्तार में उत्तर
Advertisements

उत्तर

  1. वृत्त किंवा बातमी: वर्तमानपत्रात प्रकाशित होणारी बातमी, नियतकालिकात लिहिले गेलेले विशेष वृत्त/वृत्तमाला वाचल्यानंतर; तसेच दूरचित्रवाणीवर दाखविलेली घटना पाहिल्यानंतर त्या अनुषंगाने मनात वृत्तलेखासंबंधी विचारांचे बीज तयार होत असते. त्या बातमीच्या मागे असलेल्या गोष्टी, संदर्भ, मुलाखत घेऊन त्या बातमीच्या संबंधाने उत्तम वृत्तलेखाची निर्मिती करता येते. बातमीकडे विविध अंगांनी पाहिले आणि त्या घटनेचा परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला वृत्तलेखासाठी अनेक विषय सहज मिळू शकतात.उदा., “विजेशिवाय वाहनांच्या ट्यूबचे पंक्चर काढणे” अशी बातमी प्रकाशित झाल्यावर पंक्चर नेमके कसे काढले जाते? असे का करावे वाटले? त्यामागील प्रेरणा कोणती? त्यामुळे काय परिणाम साधला जाणार आहे? लोकांची सोय, विजेची बचत, त्यातून मिळालेला रोजगार अशा अंगाने हा वृत्तलेख लिहिला जाऊ शकतो.
  2. व्यक्तिगत अनुभव: पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्‍तीला अनेक घटना/प्रसंगांना सामोरे जावे लागते. बातमी मिळवताना अनेक अनुभव मिळत जातात. त्यातील काही अनुभव बातमीला मदत करतात. तर काही केवळ अनुभवाची शिदोरी वाढविण्यास मदत करतात; पण ते अनुभव वाया जात नाहीत. गतकाळातील असे अनुभव भविष्यातील एखाद्या वृत्तलेखासाठी मदत करणारे ठरतात. ‘बसस्थानकावरील फेरीवाल्यांच्या संघटनेची स्थापना’ अशी बातमी जेव्हा येते, तेव्हा त्यावर वृत्तलेख लिहितांना फेरीवाल्यांची संख्या, त्यांच्या व्यवसायातील कष्ट, वेळ, त्यांच्या कुटुंबांचे उदरभरण, रोजगाराचे उत्पन्न अशा मुद्द्यांवर वृत्तलेख लिहिला जाऊ शकतो. यात केवळ तपशिलाची नोंद अपेक्षित नसते तर त्यामधून त्यांच्या जीवनानुभवाचे दर्शन घडणे आवश्यक असते.
  3. भेटीगाठी: पत्रकारिता करणाऱ्या व्यक्‍तीला उत्तम लिहिता येण्यासाठी त्याचे भाषाज्ञान उत्तम हवे. तसेच व्यवसायाची गरज म्हणून उत्तम संवाद कौशल्य हवे असते. त्याला अनेक क्षेत्रात जाऊन बातमी मिळवावी लागते. त्यामुळे अनेकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधावा लागतो, तर कधी शेतकरी, शेतमजूर, कलाकार, खेळाडू, विविध कंपन्यांचे व्यवस्थापक, लोकप्रतिनिधी यांच्याशी बोलताना अनेक मुद्द्यांना स्पर्श करावा लागतो. कधी कधी काही माणसे बोलत नाहीत तेव्हा त्यांना बोलते करण्याचे कौशल्य पत्रकारांकडे असावे लागते. त्यांच्याशी बोलताना अनेक विषय सहजतेने मिळून जातात. या संभाषणातून एखाद्या व्यक्तीचे अनेक पैलू सहजतेने समोर येतात. विदर्भातील जमीन विकून भाताच्या जातीचे संशोधन करणारे दादाजी खोब्रागडे यांची शोधकथा वृत्तलेखासाठी विषय देऊन जाते. एखादा अधिकारी अशी घटना सहजपणे चर्चेत सांगून जातो. अशा व्यक्तींना, कुटुंबातील सदस्य, सहकारी यांना प्रत्यक्ष भेटून आणखी काही पैलू समोर येतात.
  4. मुलाखती: विविध क्षेत्रांतील तज्ञ, अधिकारी, समाजसेवक, कलाकार किंवा संबंधित व्यक्तींची घेतलेली मुलाखत ही वृत्तलेखाचा महत्त्वाचा स्त्रोत असतो. मुलाखतीतून त्या व्यक्तीचे विचार, अनुभव, मतमतांतरे आणि संबंधित घटनेची सविस्तर माहिती मिळते. त्यामुळे वृत्तलेख अधिक विश्वासार्ह, माहितीपूर्ण व प्रभावी बनतो.
  5. निरीक्षणे: पत्रकाराने चौकस असायला हवे. पत्रकाराला बातमीचे धागेदोरे मिळवावे लागतात. वृत्तलेखासाठी सूक्ष्म दृष्टी असावी लागते. आपल्या अवतीभोवती अनेक घटना घडत असतात. त्या घटनांचे बारकाईने निरीक्षण करता येणे, त्यातील बातमी शोधता येणे व वृत्तलेखाचे विषय निवडता येणे महत्त्वाचे असते. वृत्तलेखासाठी निरीक्षणातून आणि अनुभवातून विवेचन, संदर्भ, कारणमीमांसा, परिणाम यांसारख्या गोष्टी समोर आणल्या जातात. अंत्यविधीच्या ठिकाणी ‘प्रेत जाळण्याचे काम करणारी महिला’ ही बातमी आहे; पण त्या बातमीची अधिक माहिती घेतली तर आपल्याला वृत्तलेखाचा विषय मिळू शकतो. ‘शेतीसाठी बैलांऐवजी माणंसांचा वापर’, ‘खानावळ चालवून मुलाला केले जिल्हाधिकारी’, ‘बांधकामाचे साहित्य वरती नेण्यासाठी टाकाऊ मोटारसायकलाचा वापर’ अशा कितीतरी गोष्टी आपल्या अवतीभोवती आपण पाहत असतो. त्यामधून वृत्तलेखाचे विषय मिळतात. मात्र त्यासाठी निरीक्षणात सातत्य ठेवावे लागते.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2025-2026 (March) Official Question Paper
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×